मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मुंबई-पुणे रेल्वे सेवा सोमवारपर्यंत बंद; मध्य रेल्वेचा आजपासून २७ तासांचा मेगाब्लॉक

मुंबई-पुणे रेल्वे सेवा सोमवारपर्यंत बंद; मध्य रेल्वेचा आजपासून २७ तासांचा मेगाब्लॉक

Nov 19, 2022, 03:05 PM IST

  • Central Railway MegaBlock : मध्य रेल्वेनं रुळांची दुरुस्ती आणि देखभालीच्या कामांसाठी तब्बल २७ तासांचा मेगाब्लॉक घेतला आहे. त्यामुळं आता सोमवारपर्यंत मुंबई-पुणे मार्गावरील रेल्वे बंद राहणार आहेत.

Central Railway Megablock

Central Railway MegaBlock : मध्य रेल्वेनं रुळांची दुरुस्ती आणि देखभालीच्या कामांसाठी तब्बल २७ तासांचा मेगाब्लॉक घेतला आहे. त्यामुळं आता सोमवारपर्यंत मुंबई-पुणे मार्गावरील रेल्वे बंद राहणार आहेत.

  • Central Railway MegaBlock : मध्य रेल्वेनं रुळांची दुरुस्ती आणि देखभालीच्या कामांसाठी तब्बल २७ तासांचा मेगाब्लॉक घेतला आहे. त्यामुळं आता सोमवारपर्यंत मुंबई-पुणे मार्गावरील रेल्वे बंद राहणार आहेत.

Mumbai-Pune Railway Route : मध्य रेल्वेनं मुंबई-पुणे लोहमार्गावर तब्बल २७ तासांचा मेगाब्लॉक घेतला आहे. त्यामुळं या मार्गावरील सर्व रेल्वेगाड्या सोमवारपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. परिणाम पुढील दोन दिवस प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. याशिवाय शनिवार आणि रविवार हे दोन्ही दिवस वीकेंडचे असल्यानं या दोन दिवसांत रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि देखभालीचं काम पूर्ण करण्याचं आव्हान रेल्वे प्रशासनासमोर असणार आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वेनं मुंबई आणि पुणे रेल्वे स्थानकांवर काही अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून एक टोल-फ्री हेल्पलाईन नंबरही जारी केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Fact Chack:मुंबईत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल देसाईंच्या रोड शोमध्ये पाकिस्तान झेंडा ? व्हायरल व्हिडिचे सत्य उघड

Bank Holidays : बँकेची कामे आताच उरकून घ्या; ‘या’ कारणांमुळे पुढच्या आठवड्यात ४ दिवस बँका बंद

Mumbai Pune expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेने प्रवास करताय? शनिवारी व रविवारी 'या' वेळेत दोन तासांचा मेगा ब्लॉक

Pune Crime News : पुण्यात मुली असुरक्षित! आधी ड्रग्जसोबत दारु पाजली नंतर लॉजवर नेऊन केले कांड! दोघींवर बलात्कार

मुंबई-पुणे मार्गावरील रेल्वे सोमवारपर्यंत बंद राहणार असल्यानं प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून पुण्यातून मुंबईसाठी जादा बसेस सोडण्याची तयारी केली जात आहे. रेल्वे बंद झाल्यानं दोन्ही शहरांतील प्रवाशांनी आपल्या प्रवासाचं नियोजन बदललं आहे. रेल्वे स्थानकांवर मुंबईला जाण्यासाठी प्रवाशांनी गर्दी केल्यास त्यांना रेल्वे स्थानकावर बसेस उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनानं दिली आहे.

कोणत्या रेल्वेगाड्या झाल्या रद्द?

१. पुणे-मुंबई डेक्कन क्वीन (१२१२४)

२. पुणे-मुंबई प्रगती एक्स्प्रेस (१२१२६)

३. पुणे-मुंबई डेक्कन एक्स्प्रेस (११००८)

४. पुणे-मुंबई इंटरसिटी एक्स्प्रेस (१२१२८)

५. मुंबई-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस (१२१२७)

६. पुणे-मुंबई इंटरसिटी एक्स्प्रेस (१२१२८)

७. कोल्हापूर - मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेस (१७४१२)

८. मुंबई-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस (१२१२७)

९. मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेस (११००७)

१०. मुंबई-पुणे सिंहगड एक्स्प्रेस (११००९),

११. मुंबई-पुणे प्रगती एक्स्प्रेस (१२१२५)

१२. मुंबई-पुणे डेक्कन क्वीन एक्स्प्रेस (१२१२३)

१३. मुंबई-कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेस (१७४११)

१४. पुणे-मुंबई सिंहगड एक्स्प्रेस (११०१०)

 

 

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या