मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ganesh Visarjan 2023 : विसर्जनासाठी गेले अन् वैतरणा नदीत बुडाले; पालघरमध्ये तीन गणेशभक्तांचा मृत्यू

Ganesh Visarjan 2023 : विसर्जनासाठी गेले अन् वैतरणा नदीत बुडाले; पालघरमध्ये तीन गणेशभक्तांचा मृत्यू

Sep 21, 2023, 07:18 AM IST

    • Palghar News Marathi : दीड दिवसांच्या गणपतीचं विसर्जन करण्यासाठी गेलेल्या तीन गणेशभक्तांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Ganesh Visarjan 2023 News Palghar (HT)

Palghar News Marathi : दीड दिवसांच्या गणपतीचं विसर्जन करण्यासाठी गेलेल्या तीन गणेशभक्तांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

    • Palghar News Marathi : दीड दिवसांच्या गणपतीचं विसर्जन करण्यासाठी गेलेल्या तीन गणेशभक्तांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Ganesh Visarjan 2023 News Palghar : मुंबईत गणेशोत्सवाचा जल्लोष सुरू असतानाच आता पालघरमधून अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. दीड दिवसांच्या गणपतीचं विसर्जन करायला गेलेल्या तीन गणेशभक्तांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. पालघर जिल्ह्यातील वैतरणा नदीत ही घटना घडली असून त्यानंतर आता पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे. जगत मौर्य, सूरज प्रजापती आणि प्रेम रतन अशी तिन्ही मृतांची नावं आहे. हे सर्व उत्तर प्रदेशातील असून पालघरमध्ये ते कामाच्या निमित्ताने आलेले होते.

ट्रेंडिंग न्यूज

maharashtra heat stroke cases : महाराष्ट्रात ७४ दिवसांत उष्माघाताचे २४१ बळी, जालन्यात सर्वाधिक मृत्यूंची नोंद

Mumbai: मोदींच्या सभेपूर्वी अनुचित प्रकार घडणार, मुंबई पोलिसांना फोन करणाऱ्याला अटक; चौकशीत समजलं...

Weather Updates: विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा, अनेक भागांत उकाडा कायम!

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

मिळालेल्या माहितीनुसार, पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात कोनसई या गावात राहणाऱ्या तीन परप्रांतीय मजुरांनी दीड दिवसांचा गणपती बसवला होता. दीड दिवस संपल्यानंतर गणेशभक्तांनी गणपतीच्या विसर्जनाची योजना आखली. त्यासाठी जगत, प्रेम आणि सूरज हे वैतरणा नदीत उतरले. गणपतीचं विसर्जन केल्यानंतर नदीतील खोलीचा अंदाज न आल्याने तिघेही नदीच्या धारेत बुडाले. त्यानंतर या प्रकरणाची माहिती समजताच स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परंतु तोपर्यंत तिन्ही गणेशभक्तांचा मृत्यू झालेला होता.

स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने बुडालेल्या तिन्ही गणेशभक्तांना नदीतून बाहेर काढण्यात यश आलं आहे. पोलिसांनी तिघांच्याही मृतदेहांची ओळख पटवली आहे. तसेच गणेशभक्तांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. मुंबई, ठाण्यासह उपनगरांच्या भागांमध्ये पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी हौद आणि तलावांची सोय केली जात आहे. त्यामुळं नागरिकांनी नदी, समुद्र किंवा तलावातील धोकादायक ठिकाणी जाणं टाळण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

पुढील बातम्या