Junnar Pune Accident : नगर-कल्याण मार्गावर भीषण अपघात, दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Junnar Pune Accident : नगर-कल्याण मार्गावर भीषण अपघात, दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू

Junnar Pune Accident : नगर-कल्याण मार्गावर भीषण अपघात, दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू

Sep 21, 2023 06:36 AM IST

Junnar Pune Accident : रस्त्याने चालत असलेल्या दोन महिलांना भरधाव वेगाने येणाऱ्या पिकअपने चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Junnar Pune Accident News
Junnar Pune Accident News (HT)

Junnar Pune Accident News : पुणे जिल्ह्यातील जुन्नरमधून धक्कादायक बातमी समोर येत आहे. जुन्नरच्या ओतूर परिसरात भीषण अपघात झाला असून त्यात दोन्ही महिलेचा मृत्यू झाला आहे. नगर- कल्याण महामार्गावर ही घटना घडली असून भरधाव कंटेनरने दोन्ही महिलांना जोरदार धडक दिली. कोळमाथा परिसरातून दोन्ही महिला प्रवास करत होत्या. त्यावेळी मागच्या बाजूने आलेल्या वाहनानं दोघांनाही धडक दिली. त्यात दोन्ही महिलांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. ऋतुजा अशोक डुंबरे आणि सविता गीताराम तांबे अशी मृत महिलांची नावं आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नगर-कल्याण महामार्गावरून ऋतुजा अशोक डुंबरे ही १९ वर्षीय तरुणी घराच्या दिशेने पायी चालत निघाली होती. याशिवाय सविता तांबे या पतीसोबत दुचाकीने प्रवास करत होत्या. त्याचवेळी मागून आलेल्या एका भरधाव पिकअपने ऋतुजाला धडक दिली, त्यानंतर पिकअप सविता यांच्या दुचाकीला धडकली. विचित्र आणि तितक्याच या भीषण अपघातात दोन्ही महिलांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. मृतांची घरं अपघातस्थळापासून जवळच असल्याने ओतूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दोन्ही महिलांना उडवल्यानंतर भरधाव पिकअप रस्त्याच्या कडेला पलटी झाला. त्यानंतर ड्रायव्हर गाडी सोडून घटनास्थळावरून फरार झाला. अपघाताची माहिती मिळताच ओतूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. आरोपी चालकाचा शोध घेतला जात असून त्याच्या चुकीमुळंच दोन महिलांचा मृत्यू झाल्याने स्थानिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहनं रस्त्यावरून हटवलं आहे. त्यानंतर दोन्ही महिलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या अपघातामुळं नगर-कल्याण महामार्गावर काही वेळ वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं.

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर