मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sanjay Raut : सगळंच बेकायदेशीर आहे, तर हे सरकार कायदेशीर कसं?; कोर्टाच्या निकालानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचा सवाल

Sanjay Raut : सगळंच बेकायदेशीर आहे, तर हे सरकार कायदेशीर कसं?; कोर्टाच्या निकालानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचा सवाल

May 11, 2023, 01:34 PM IST

  • Sanjay Raut on SC Verdict : राज्यपाल, विधानसभा अध्यक्षांचे निर्णय बेकायदेशीर असतील तर हे सरकार कायदेशीर कसं, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

Sanjay Raut (Sanjay Sharma)

Sanjay Raut on SC Verdict : राज्यपाल, विधानसभा अध्यक्षांचे निर्णय बेकायदेशीर असतील तर हे सरकार कायदेशीर कसं, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

  • Sanjay Raut on SC Verdict : राज्यपाल, विधानसभा अध्यक्षांचे निर्णय बेकायदेशीर असतील तर हे सरकार कायदेशीर कसं, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

Sanjay Raut on SC Verdict : राज्यातील सत्तासंघर्षाच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठानं दिलेल्या निर्णयावर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी निकालावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. सगळंच बेकायदेशीर आहे तर मग हे सरकार कायदेशीर कसं, असा नेमका प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Maharashtra Heat Stroke Cases: महाराष्ट्रात ७४ दिवसांत २४१ जण उष्माघाताचे बळी, जालन्यात सर्वाधिक मृत्युची नोंद

Mumbai: मोदींच्या सभेपूर्वी अनुचित प्रकार घडणार, मुंबई पोलिसांना फोन करणाऱ्याला अटक; चौकशीत समजलं...

Weather Updates: विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा, अनेक भागांत उकाडा कायम!

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळं एकनाथ शिंदे यांना दिलासा मिळाला आहे, असं बोललं जात आहे. मात्र, संजय राऊत यांनी यास आक्षेप घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलेली निरीक्षणं लक्षात घेतली पाहिजेत. शिंदे गटानं नेमलेला व्हीप बेकायदेशीर ठरला आहे. सुनील प्रभू हेच कायदेशीर व योग्य व्हीप असल्याचं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं आहे. त्या व्हीपनुसार १६ आमदार बेकायदेशीर ठरलेले आहेत. त्यावर अंतिम निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यायचा असतो. विधानसभा अध्यक्ष बेकायदा व्हीपचं पालन करू शकत नाहीत. योग्य व्हीपची खातरजमा करून अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निर्णय घ्यायला हवा होता, असं राऊत म्हणाले.

राज्यपालांनी घेतलेले सर्व निर्णय बेकायदेशीर होते, याचा अर्थच सरकार बेकायदेशीर आहे. राज्यपालांच्या सूचनेनुसारच बहुमत चाचणी झाली. त्यानंतर व्हीप बजावण्यात आले. हे सगळंच जर बेकायदेशीर आहे तर मग कायदेशीर काय आहे. तुम्ही दिलासा कसा म्हणू शकता? या सरकारनं तात्काळ राजीनामा दिला पाहिजे, असं राऊत म्हणाले.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या