मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Kharadi Crime News : मोबाइल हिसकावून नोकरदारावर धारदार शस्त्रानं हल्ला; घटना सीसीटीव्हीत कैद

Kharadi Crime News : मोबाइल हिसकावून नोकरदारावर धारदार शस्त्रानं हल्ला; घटना सीसीटीव्हीत कैद

Sep 06, 2022, 01:20 PM IST

    • Kharadi Crime News Marathi : दहिफळे हे खराडी भागात मोबाईलवर बातम्या पाहत होते, त्यावेळी चोरट्यांनी त्यांचा मोबाईल हिसकावत त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला.
Kharadi Pune Crime News Marathi (HT_PRINT)

Kharadi Crime News Marathi : दहिफळे हे खराडी भागात मोबाईलवर बातम्या पाहत होते, त्यावेळी चोरट्यांनी त्यांचा मोबाईल हिसकावत त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला.

    • Kharadi Crime News Marathi : दहिफळे हे खराडी भागात मोबाईलवर बातम्या पाहत होते, त्यावेळी चोरट्यांनी त्यांचा मोबाईल हिसकावत त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला.

Kharadi Pune Crime News Marathi : सकाळी मॉर्निंग वॉक करत असताना बातम्या ऐकणाऱ्या एका निवृत्त सरकारी नोकरदाराचा मोबाईल हिसकावून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळं पुण्यातील खराडी भागामध्ये खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध घेतला जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Malad Woman Found Dead: मालाडमध्ये राहत्या घरात कुजलेल्या अवस्थेत सापडला महिलेचा मृतदेह

Pune BGF jewellers daroda : वानवडीतील वाडकर मळा येथील बीजीएफ ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा; ३०० ते ३५० किलोचे दागिने लंपास

Mumbai Water Supply: मुंबईकरांना मोठा दिलासा; गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी आणि विलेपार्ले भागांतील पाणीकपातीचा निर्णय रद्द

मुंबईकरांचे हृदय नाजूक! तब्बल १७ हजार नागरिकांना उच्च रक्तदाबाचा त्रास; तपासणीत धक्कादायक माहिती उघड

मिळालेल्या माहितीनुसार, खराडीतील शांतीनगर परिसरात राहणारे निवृत्त नोकरदार बबन दहिफळे सकाळी चालायला गेलेले असताना ते मोबाईलवर बातम्या ऐकत होते, त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांनी त्यांच्या हातातला मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. परंतु दहिफळे यांनी हल्लेखोराचा हात पकडून त्याला दुचाकीवरून खाली खेचलं, त्यावेळी तिघेही चोरटे दुचाकीवरून खाली पडले, परंतु त्यामुळं संतापलेल्या चोरट्यांनी दहिफळे यांच्यावर धारदार शस्त्रानं वार केले. त्यामुळं त्यांच्या हातातून मोबाईल सुटला.

या हल्ल्यात त्यांच्या हाताला गंभीर जखम झाल्यानं चोरट्यांनी त्यांचा मोबाईल घेऊन घटनास्थळावरून पळ काढला. दहिफळे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याचं स्थानिक लोकांच्या लक्षात येताच त्यांनी त्यांना उपचारासाठी तातडीनं रुग्णालयात हलवलं. परंतु हातावर मोठे घाव पडल्यानं त्यांना २० टाके पडले आहेत. त्यानंतर त्यांनी चोरट्याविरोधात येरवडा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

येरवडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्हाला या चोरीची आणि प्राणघातक हल्ल्याची माहिती मिळाली आहे. त्यानंतर आता आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून तिघेही हल्लेखोर २५ ते २७ वयोगटातील आहेत. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या