मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sushma Andhare : माणूस म्हणून आपण कसे नालायक आहोत हे दाखवायलाच हवं का?; सुषमा अंधारेंनी शरद पोंक्षेंना झोडपले!

Sushma Andhare : माणूस म्हणून आपण कसे नालायक आहोत हे दाखवायलाच हवं का?; सुषमा अंधारेंनी शरद पोंक्षेंना झोडपले!

Jul 29, 2023, 03:14 PM IST

  • Sushma Andhare On Sharad Ponkshe : कोणत्याही आरक्षणाशिवाय मुलगी विदेशात पायलट झाल्याची पोस्ट शरद पोंक्षे यांनी केली होती. त्याला ठाकरे गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

Sushma Andhare On Sharad Ponkshe (HT)

Sushma Andhare On Sharad Ponkshe : कोणत्याही आरक्षणाशिवाय मुलगी विदेशात पायलट झाल्याची पोस्ट शरद पोंक्षे यांनी केली होती. त्याला ठाकरे गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

  • Sushma Andhare On Sharad Ponkshe : कोणत्याही आरक्षणाशिवाय मुलगी विदेशात पायलट झाल्याची पोस्ट शरद पोंक्षे यांनी केली होती. त्याला ठाकरे गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

Sushma Andhare slams Sharad Ponkshe : कोणत्याही आरक्षणाशिवाय मुलगी पायलट झाली अशी खोचक पोस्ट करणारे अभिनेते शरद पोंक्षे यांच्यावर चहूकडून टीकेचा भडिमार होत आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी फेसबुक पोस्ट करत शरद पोंक्षेंना सुनावलं आहे. लेकीचं कौतुक करताना क्षुद्र किंवा नालायकपणा दाखवायलाच हवं का?, असा सवाल अंधारे यांनी केला आहे. जातविषयक पित्त वारंवार उफाळून येत असेल तर बुद्ध, गुरुनानक, महावीर, कबीर, संत ज्ञानेश्वर, तुकोबाराय यांच्या विचारांचा काढा नियमित घेत चला, असा बोचरा सल्लाही अंधारे यांनी पोंक्षेंना दिला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai dry day 2024: ‘या’ तीन दिवशी दारू विक्रीवर बंदी! मुंबईतील सर्व वाईन शॉप, बीअर बार राहणार बंद

Gondia : दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा बळी; शिक्षक आणि मुख्याध्यापकांमधील वाद सोडवायला गेलेल्या लिपिकाचा मृत्यू

Ghatkopar Hoarding Collapse : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडेला राजस्थानमधून अटक

मुंबईतील बोरिवली इथं २१ मे पासून वसंत व्याख्यानमाला; अभ्यासकांसाठी बौद्धिक मेजवानी

सुषमा अंधारेंची नेमकी पोस्ट काय?

फेसबुकवर केलेल्या पोस्टमध्ये सुषमा अंधारे म्हणाल्या की, माणसात भेद निर्माण करणारा सनातनी धर्म तुम्ही सांगत आहात तो मला मान्य होणार नाही. प्रबोधनकारांनी, बाळासाहेबांनी किंवा उद्धव ठाकरे सांगत असलेले सर्व समावेशक हिंदुत्व तुम्हाला कळणार नाही. तुमच्या लेकीचं कौतुक झालंच पाहिजे. परंतु कौतुक करताना माणूस म्हणून कसे आपण क्षुद्र किंवा नालायक आहोत हे दाखवायलाच हवे का?, अशी विचारणा अंधारे यांनी केली आहे.

भेकड आणि भित्र्या माणसाची अहिंसा ही अहिंसा मानली जात नाही. भल्या भल्यांना सहज धूळ चारण्याची धमक आहे पण तरीही जो आपल्या बलाचा प्रयोग निष्कारण करत नाही तो खऱ्या अर्थाने अहिंसा मानणारा व्यक्ती असतो. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना आणि कुठल्याही आरक्षणाशिवाय मी काय करू शकते, हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे, असं म्हणत सुषमा अंधारे यांनी पोंक्षेंच्या दाव्याचं खंडन करण्याचा प्रयत्न केला आहे.

कोणत्याही आरक्षणाशिवाय गुणवत्तेची पारख करत उद्धव ठाकरेंनी राज्यभर काम करण्याची संधी दिली. हा मानवतावादी दृष्टीकोन तुमच्यासारख्या माणूसद्वेष्ट्यांना अजिबात कळणार नाही, आरक्षणाचा लाभ घेणं मला शक्य असतानाही मी माझं संपूर्ण शिक्षण खुल्या प्रवर्गातून पूर्ण केल्याचा खुलासाही सुषमा अंधारे यांनी केला आहे. विद्यापीठ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील तब्बल पाच सुवर्णपदकांसह पूर्ण शिक्षण पूर्ण केलं आहे, आता तुम्ही माझं अभिनंदन करू शकाल का?, असाही सवाल अंधारेंनी केला आहे.

'तुम्ही एका दुर्धर आजारातून बरे झालात, तुम्ही रुग्णालयात असताना रक्त लघवी तपासण्याचं ठिकाण असेल, मेडिकल स्टोअरवर काम करणारी मुलं असतील, शस्त्रक्रिया दरम्यान आवश्यकता असणारे भुलतज्ञ , केमोथेरपी देणारे डॉक्टर्स, रक्ताची गरजच पडली असेल तर रक्तपेढीत काम करणारे कर्मचारी किंवा दिवस रात्र सेवा करणाऱ्या नर्सेस यांच्या कोणत्या जाती होत्या?, हे तुम्हाला माहितीय का?, असाही खोचक सवाल सुषमा अंधारे यांनी शरद पोंक्षेंना केला आहे.

'कुणी कोणत्या जातीत जन्माला यावं यासाठी कुठंही अर्ज केलेला नसतो. त्यामुळं जी गोष्ट मिळवण्यामध्ये आपलं कसलेही स्वकर्तृत्व नाही, त्याची जशी लाज असू नये, तसा माजही असू नये, असंही अंधारे यांनी सुनावलं आहे.

पुढील बातम्या