मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Bhiwandi Fire : भिवंडीत अग्नितांडव, यंत्रमाग कारखाना आगीत भस्मसात

Bhiwandi Fire : भिवंडीत अग्नितांडव, यंत्रमाग कारखाना आगीत भस्मसात

Feb 17, 2023, 06:44 AM IST

    • Bhiwandi Fire : भिवंडी येथील देवजीनगर येथे एका कापड उद्योगाला भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण कारखाना भस्मसात झाल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे.
Bhiwandi Fire

Bhiwandi Fire : भिवंडी येथील देवजीनगर येथे एका कापड उद्योगाला भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण कारखाना भस्मसात झाल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे.

    • Bhiwandi Fire : भिवंडी येथील देवजीनगर येथे एका कापड उद्योगाला भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण कारखाना भस्मसात झाल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे.

भिवंडी : भिवंडीत येथे आग लागण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. येथील देवजीनगर परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास ए.डी. टेक्सटाईल या यंत्रमाग कारखान्याला भीषण आग लागली असून या घटनेत संपूर्ण कारखाना हा भस्मसात झाला आहे. कारखान्यातील कच्चे कापड आणि यंत्रमाग साहित्य जळल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. नंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश

ट्रेंडिंग न्यूज

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

Pune Crime : धक्कादायक.. प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या

Pune Weather Updates: उष्णतेच्या लाटेनंतर पुण्यातील तापमानात घट, मे महिन्यात सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद!

Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधाव पोर्शे कारनं दोघांना चिरडलं, जागीच ठार

या घटनेचे वृत्त असे की, भिवंडी येथील औद्योगिक वसाहतीत ए.डी. टेक्सटाईल यंत्रमाग कारखाना आहे. या कारखान्याला मध्यरात्री अचानक आग लागली. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण समजू शकले नाही. हा परिसर गजबजला असल्याने ही आग उग्र रूप धारण करून पसरते की काय, अशी शक्यता होती. आगीचे लोळ दूर पर्यंत दिसत होते. 

या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. भिवंडी अग्निशमन दलाच्या चार बंब हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र, आगीने उग्र रूप धारण केल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात अपयश आले. तब्बल तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या