मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Tejas Thackeray : तेजस ठाकरेंनी शोधली सापाची नवी प्रजाती; पश्चिम घाटातल्या नव्या सापाचा फोटो पाहिलात का?

Tejas Thackeray : तेजस ठाकरेंनी शोधली सापाची नवी प्रजाती; पश्चिम घाटातल्या नव्या सापाचा फोटो पाहिलात का?

Aug 23, 2023, 03:35 PM IST

    • Tejas Thackeray New Snake Species : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे पूत्र तेजस ठाकरे यांनी पश्चिम घाटात नव्या सापाची प्रजाती शोधून काढली आहे. दुर्मिळ सापाला नवं नावही देण्यात आलं आहे.
Tejas Thackeray Sahyadriofis Snake (HT)

Tejas Thackeray New Snake Species : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे पूत्र तेजस ठाकरे यांनी पश्चिम घाटात नव्या सापाची प्रजाती शोधून काढली आहे. दुर्मिळ सापाला नवं नावही देण्यात आलं आहे.

    • Tejas Thackeray New Snake Species : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे पूत्र तेजस ठाकरे यांनी पश्चिम घाटात नव्या सापाची प्रजाती शोधून काढली आहे. दुर्मिळ सापाला नवं नावही देण्यात आलं आहे.

Tejas Thackeray Sahyadriofis Snake : शिवसेनेचे (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे दुसरे चिरंजीव तेजस ठाकरे यांनी कोकणातील पश्चिम घाटात नव्या सापाच्या प्रजातीचा शोध घेतल्याची माहिती समोर आली आहे. तेजस ठाकरे आणि त्यांच्या टीमने सह्याद्रीच्या खोऱ्यात मोठी कामगिरी केली आहे. शोधण्यात आलेल्या नव्या सापाच्या प्रजातीला नावही देण्यात आलं आहे. ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनच्या माध्यमातून नव्या सापाचा शोध घेण्यात आला आहे. या संस्थेकडून पश्चिम घाटात सुरू असलेल्या संशोधनावेळी नव्या सापाच्या प्रजातीचा शोध लागला आहे. त्यामुळं आता ठाकरेंच्या पुत्राने शोधलेल्या नव्या सापाला सह्याद्रीओफिस असं नाव देण्यात आलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

HSC Result 2024: महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता बारावीचा निकाल उद्या, एका क्लिकवर पाहा तुमचं रिझल्ट

Mumbai Constable Death : 'त्या' पोलिसाचा मृत्यू विषारी इंजेक्शनमुळे नाही; फॉरेन्सिक रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड

Kolhapur Murder : भरदिवसा आईच्या डोळ्यादेखत तरुणाला संपवलं; सैन्य दलातील जवानासह तिघे आरोपी फरार

Pune porsche Accident : दोघांना चिरडणाऱ्या बिल्डरच्या मुलाला जामीन; न्यायालयाने आरोपीला लिहायला लावला ३०० शब्दांचा निबंध

राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सह्याद्रीच्या पर्वतरांगेत ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनच्या माध्यमातून संशोधन सुरू आहे. त्यावेळी तेजस ठाकरे यांच्या टीमला एक सापाची नवी प्रजाती आढळून आली आहे. यासंदर्भात तेजस ठाकरे यांनी लंडनमधील लंडनमधील नॅशनल हिस्ट्री म्युझियम आणि जर्मनीतील प्लँक इन्स्टिट्यूटमध्ये एक शोधनिबंध सादर केला आहे. त्यानंतर आता टीमकडून शोधण्यात आलेल्या नव्या सापाला सह्याद्रीओफिस उत्तराघाटी असं नाव देण्यात आलं आहे. त्यामुळं आता तेजस ठाकरेंचं अनेकांनी कौतुक केलं आहे. तेजस ठाकरे यांनी यापूर्वी देखील एका नव्या सापाच्या प्रजातीचा शोध लावला होता.

पश्चिम घाटात शोधण्यात आलेल्या नव्या सापाला संस्कृत शब्द असलेल्या सह्याद्री आणि ग्रीक शब्द असलेल्या ओफिस या दोन नावांचा संगम घडवून सह्याद्रीओफिस असं नाव देण्यात आलं आहे. याशिवाय मराठीत या सापाला उत्तराघाटी असं नाव देण्यात आलं आहे. उत्तर दिशा दर्शवणारी आणि घाटी म्हणजे पर्वत अशा अर्थाने नव्या सापाला नाव देण्यात आल्याची माहिती आहे.

उद्धव ठाकरे तसेच तेजस ठाकरे यांना वन्यजीव संशोधनाची आवड आहे. त्यामुळं ते एका टीमच्या माध्यमातून सह्याद्री पर्ततरांगेत संशोधनाचं काम करत असतात. तेजस ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील टीमने मासे, खेकडे, पाल आणि साप यांच्यासह अनेक वन्य प्राण्यांच्या ११ पेक्षा जास्त प्रजाती शोधून काढलेल्या आहे. त्यामुळं आता तेजस ठाकरे यांच्या नव्या शोधकार्यामुळं त्यांची युरोपात दखल घेण्यात आली आहे.

पुढील बातम्या