मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Task fraud: कॉलेज ड्रॉप आऊट मुलांनी ऑनलाइन टास्क फ्रॉडमधून अवघ्या ३ महिन्यात कमावले ६० कोटी

Task fraud: कॉलेज ड्रॉप आऊट मुलांनी ऑनलाइन टास्क फ्रॉडमधून अवघ्या ३ महिन्यात कमावले ६० कोटी

Dec 30, 2023, 03:36 PM IST

    • online Task fraud : गुजरातमधील दोन कॉलेज ड्रॉप आऊट मुलांना ऑनलाइन टास्क फ्रॉड प्रकरणी अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून धक्कादायक माहिती पुढे आली आहे. केवळ तीन महिन्यात या मुलांनी ६० कोटी रुपये कमावले.
crime

online Task fraud : गुजरातमधील दोन कॉलेज ड्रॉप आऊट मुलांना ऑनलाइन टास्क फ्रॉड प्रकरणी अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून धक्कादायक माहिती पुढे आली आहे. केवळ तीन महिन्यात या मुलांनी ६० कोटी रुपये कमावले.

    • online Task fraud : गुजरातमधील दोन कॉलेज ड्रॉप आऊट मुलांना ऑनलाइन टास्क फ्रॉड प्रकरणी अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून धक्कादायक माहिती पुढे आली आहे. केवळ तीन महिन्यात या मुलांनी ६० कोटी रुपये कमावले.

मुंबई : देशभरात ऑनलाइन टास्क फ्रॉडच्या प्रकरणात मोठी वाढ झाली आहे. ऑनलाइन कामे कारण्यासाठी चांगल्या पैशाचे आमिष दाखवून मोठ्या प्रमाणात नागरिकांना गंडा घालण्याच्या घटना वाढल्या आहेत. दरम्यान, गुजरात येथील दोन कॉलेज ड्रॉप आऊट विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आले. त्यांच्याकडून धक्कादायक माहिती पुढे आली आहे. ऑनलाइन टास्क फ्रॉडच्या माध्यमातून ३ महिन्यात ६० कोटी रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

Dadar Illegal Hoardings: दादर येथील टिळक पुलावर ८ बेकायदेशीर होर्डिंग, मुंबई महानगरपालिकेची माहिती

Pune Hoarding Collapse: पुणे-सोलापूर मार्गावर मंगल कार्यालयासमोर होर्डिंग कोसळलं; बँड पथकासह नवरदेवाचा घोडाही अडकला

Worli Rape: नोकरीचे आमिष दाखवत तरुणीला जाळ्यात अडकवलं, भेटायला बोलवून बलात्कार; वरळीतील घटना

Sanjog Waghere : अजित पवार गटाला धक्का; संजोग वाघेरेंचा अखेर ठाकरे गटात प्रवेश; श्रीरंग बारणे विरोधात लोकसभा लढणार

या ऑनलाइन टास्कचा सूत्रधार हा लंडनमधून सूत्र हलवत असल्याची माहिती पुढे आली आहे. रुपेश प्रविकुमार ठक्कर (वय ३३) आणि पंकजभर गोवर्धन ओड (वय ३४) या दोघांना गुजरातमधून अटक करण्यात अलायी आहे. त्यांच्याकडे असलेल्या बँक खात्यात असलेले १.१ कोटी रुपये पोलिसांनी गोठवली आहेत.

पोलिसांनी या प्रकरणी तब्बल ३२ बँक खात्यांची तपासणी करून त्यांचे वर्गीकरण केले आहे. यात गेल्या दोन ते तीन महिन्यांत तब्बल ६० कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचे आढळले आहेत. अकट करण्यात आलेल्या दोघांकडून ३३ डेबिट आणि क्रेडिट कार्ड, संपूर्ण भारतात ३२ बँक खाती, सहा मोबाईल फोन, २८ सिम कार्ड, रबर स्टॅम्प, बनावट करारपत्र आणि इतर विविध कागदपत्रे जप्त केली आहेत. २.४५ लाख रुपयांच्या ऑनलाइन फसवणुकीच्या प्रकरणाचा पोलिसांना तपास करत असतांना या घोटाळ्याचा छडा लागला आहे. आरोपींनी देशभरातील अनेकांची फसवणूक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, भारतभरातील अनेक भोळ्या व्यक्तींनी कष्टाने कामावलेले पैसे त्यांना ऑनलाइन काम करण्याच्या बहाण्याने त्यांची फसवणूक करण्यात आली आहे.

Pune traffic update : पुण्यात नववर्ष स्वागतासाठी उद्या जल्लोष! डेक्कन, लष्कर भागातील वाहतुकीत मोठे बदल

व्हीजेटीआयचा विद्यार्थी असलेल्या १९ वर्षीय क्रिश याने ऑक्टोबरमध्ये फसवणूक झाल्याबाबत तक्रार दाखल केली होती. त्याला काम करून शिक्षण करायचे होते. या साठी तो ऑनलाइन कामाच्या शोधात होता. आरोपींनी त्याला ऑनलाइन टास्क फ्रॉडच्या माध्यमांतून फसवत त्याला ३ ते ५ हजार रुपयांचे आमिष दाखवून १० हजार रुपये देऊन ऑनलाइन बँकिंगद्वारे त्यांच्या खात्यातून पैसे उडवण्यात आले होते.

आरोपींनी क्रिशला लिंक पाठवून ती उघडण्यास सांगितली. या लिंक द्वारे एका महिलेने त्याला काम दिले. हे काम दिल्यावर त्याच्या खात्यात १००० रुपये पाठवण्यात आले. मात्र, पुढील कामासाठी त्याला ३०० रुपये नफा मिळेल असे सांगितले. जर त्याने २ हजार रुपये गुंतवले तर त्याला ६०० रुपये नफा मिळेल असे सांगितले. क्रिश ने ३ हजार रुपये यात गुंतवले होते. क्रिशने १ रुपयांची गुंतवणूक केली. सुरवातीला नफ्याचे पैसे देण्यात आले. यानंतर त्याने गुंतवणुकीच्या बदल्यात विविध हप्त्यांमध्ये क्रिशने २.४५ लाख रुपये गुंतवले. सुरवातीला त्याला नफ्याचे पैसे देण्यात आले. मात्र, काही वेळातच त्याला हे पैसे मिळणे बंद झाले. यावरून आपली फसवणूक झाल्याचे त्याच्या लक्षात आल्यावर त्याने पोलिसांत धाव घेत या प्रकरणी तक्रार दिली होती, असे माटुंगा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक दीपक चव्हाण यांनी सांगितले.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या