मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune traffic update : पुण्यात नववर्ष स्वागतासाठी उद्या जल्लोष! डेक्कन, लष्कर भागातील वाहतुकीत मोठे बदल

Pune traffic update : पुण्यात नववर्ष स्वागतासाठी उद्या जल्लोष! डेक्कन, लष्कर भागातील वाहतुकीत मोठे बदल

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Dec 30, 2023 02:54 PM IST

Pune traffic update : पुण्यात रविवारी जल्लोषात सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत केले जाणार आहे. पुण्यात दरवर्षी मोठा जल्लोष होत असल्याने डेक्कन आणि लष्कर परिसरात वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.

Pune traffic update
Pune traffic update

Pune traffic update : पुण्यात उद्या नवीन वर्षाच्या स्वागत जल्लोषात केले जाणार आहे. मोठ्या प्रमाणात तरुणाई लष्कर आणि डेक्कन परिसरात फर्ग्युसन रस्तावर एकत्र येत जल्लोष करत असते. या सोबतच महात्मा गांधी रस्ता, जंगली महाराज रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणात पुणेकरांची मोठी गर्दी होते. त्यामुळे उद्या वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे. उद्या रविवारी सायंकाळी पाचनंतर लष्कर आणि डेक्कन जिमखाना भागात वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.

Sanjog Waghere : अजित पवार गटाला धक्का; संजोग वाघेरेंचा अखेर ठाकरे गटात प्रवेश; श्रीरंग बारणे विरोधात लोकसभा लढणार

लष्कर भागातील वाहतूक ही वाय जंक्शनकडून महात्मा गांधी रस्त्याकडे येणारी वाहतूक १५ ऑगस्ट चौक येथे बंद करण्यात आली आली आहे. तर येथील वाहतूक कुरेशी मशीद आणि सुजाता मस्तानी चौकाकडे वळविण्यात येणार आहे. इस्कॉन मंदिराकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्ता, तसेच अरोरा टॉवरकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे. व्होल्गा चौकातून महंमद रफी चौकाकडे जाणारी वाहतूक देखील बंद ठेवण्यात येणार आहे. या मार्गवारील वाहतूक ही इस्ट स्ट्रीटवरुन इंदिरा गांधी चौकाकडे वळविण्यात येणार आहे. इंदिरा गांधी चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार असून या भागातील वाहतूक ही लष्कर पोलीस ठाण्याकडे वळवली जाणार आहे. सरबतवाला चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद आली आहे.

Mumbai Traffic: नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करताना वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबईत वाहतुकीत मोठे बदल; अशी असेल व्यवस्था

फर्ग्युसन रस्ता आणि जंगली महाराज रस्त्यावरील वाहतूक देखील बदलण्यात आली आहे. कोथरुड आणि कर्वे रस्त्याकडून येणारी वाहतूक खंडोजीबाबा चौक येथे बंद करण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक विधी महाविद्यालय रस्ता, प्रभात रस्ता, अलका चित्रपटगृहाकडे वळविण्यात येणार आहे.

जंगली महाराज रस्त्यावर होणारी गर्दी विचारात घेऊन झाशीची राणी चौकातून वाहतूक बंद करण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक गोखले स्मारक चौक, उपरस्ते, पुणे महापालिका भवन, ओंकारेश्वर मंदिर, छत्रपती शिवाजी रस्तामार्गे वळविण्यात आली आहे, लष्कर भागातील महात्मा गांधी रस्ता परिसरात रविवारी (३१ डिसेंबर) सायंकाळी पाचनंतर वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे. महात्मा गांधी १५ ऑगस्ट चौक ते अरोर टॉवर्स चौक दरम्यान वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे. फर्ग्युसन रस्त्यावरील गोखले स्मारक चौक ते फर्ग्युसन महाविद्यालय प्रवेशद्वारापर्यंत वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे. ही बंदी पहाटे पाचपर्यंत राहणार आहे.

WhatsApp channel

विभाग