मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  'ससून ड्रग्ज रॅकेटप्रकरणी दादा भुसेंचे कॉल डिटेल्स तपासा', सुषमा अंधारेंच्या आरोपावर भुसेंचा इशारा, म्हणाले..

'ससून ड्रग्ज रॅकेटप्रकरणी दादा भुसेंचे कॉल डिटेल्स तपासा', सुषमा अंधारेंच्या आरोपावर भुसेंचा इशारा, म्हणाले..

Oct 10, 2023, 10:22 PM IST

  • Sushma andhare on dada bhuse : ललित पाटील फरार होतानाचे दादा भुसे यांचे फोन कॉल्स तपासले तर सर्व सत्य समोर येईल, असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे. यावर दादा भुसे यांनी अंधारे यांना इशारा दिला आहे. 

Sushma andhare on dada bhuse

Sushmaandhare on dada bhuse : ललित पाटील फरार होतानाचे दादा भुसे यांचे फोन कॉल्स तपासले तर सर्व सत्य समोर येईल,असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे. यावर दादा भुसे यांनी अंधारे यांना इशारा दिला आहे.

  • Sushma andhare on dada bhuse : ललित पाटील फरार होतानाचे दादा भुसे यांचे फोन कॉल्स तपासले तर सर्व सत्य समोर येईल, असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे. यावर दादा भुसे यांनी अंधारे यांना इशारा दिला आहे. 

मुंबई - ड्रग्ज माफिया ललित पाटील याच्यावरून राज्याचे राजकारण तापलं आहे. ललित पाटील हा काही दिवसांपूर्वी ससूनमधून फरारी झाला होता. त्यावरून आता आरोप-प्रत्यारापांचा खेळ रंगला आहे. ड्रग्स माफिया ललित पाटील पळून जाण्यात शिंदे गटातील एका मंत्र्याचा हात असल्याचा आरोप कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला होता. त्यानंतर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेयांनी थेट दादा भुसे यांचं नाव घेत हल्लाबोल केला आहे. यावर दादा भुसे यांनी आरोप सिद्ध न झाल्यास अंधारेंवर मानहानीचा खटला दाखल करण्याचा इशारा दिला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

रिक्षाचालकाने भाडे नाकारले, जादा भाडे घेतल्यास करा व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार, तातडीने होणार कारवाई

Chiplun Cloudburst Rains: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी! अर्ध्या तासात धडकी भरवणारा पाऊस, मे महिन्यातच नद्यांना पूर

Mumbai Lok sabha : मतदानाच्या पूर्वसंध्येलाच मुंबईत प्रिसायडिंग ऑफिसरचा मृत्यू, होमगार्डला हृदयविकाराचा धक्का

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

दरम्यान, ललित पाटील याला ससूनमध्ये दाखल करण्यासाठी राज्याचे मंत्री दादा भुसे यांचा फोन गेला होता.ललित पाटील फरार होतानाचे दादा भुसे यांचे जिओग्राफीकल लोकेशन, फोन कॉल्स तपासले तर सर्व सत्य समोर येईल, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे. यावर दादा भुसे यांनी म्हटले आहे की, अंधारेंच्या आरोपांमध्ये तथ्य नाही. चौकशीतून सत्य बाहेर येईल, आरोप सिद्ध न झाल्यास सुषमा अंधारे यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचा इशाराही दादा भुसे यांनी दिला आहे.

दादा भुसे म्हणाले की, सुषमा अंधारे यांनी ऐकीव माहितीवर हा आरोप केला आहे. त्यांच्याकडे पुरावे किंवा ठोस माहिती नाही, सुषमा अंधारेंनी माहिती घेऊन आरोप करावेत. माझे कॉल रेकॉर्ड चेक करावेत, त्यासंबंधित सर्वांचे कॉल रेकॉर्डे चेक करावेत. असे आरोप करणे म्हणजे एखाद्याला आयुष्यातून उठवण्यासारखे आहे. चौकशीत सत्य समोर येईल आणि नंतर आरोप करणाऱ्यांना माफी मागावी लागेल. माझ्यावर करण्यात आलेले आरोप सिद्ध न झाल्यास मानहानीचा दावा दाखल करणार आहे, असे दादा भुसे म्हणाले.

 

काय आहे प्रकरण?

गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विभागाने ३० सप्टेंबर रोजी ससून रुग्णालयाबाहेर २ कोटींपेक्षा अधिक रकमेचे एम डी (मॅफेड्रॉन) पकडल्यानंतर यातील मुख्य आरोपी ललित पाटील आणि त्याचा भाऊ भूषण पाटील असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले होते. ललित पाटील २ ऑक्टोबर रोजी ससून रुग्णालयातून संध्याकाळी साडेसात ते आठच्या सुमारास पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेला होता.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या