मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Supreme Court : वॉर्ड रचनेत हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; याचिकाकर्त्यांना हायकोर्टात दाद मागण्याची मुभा

Supreme Court : वॉर्ड रचनेत हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; याचिकाकर्त्यांना हायकोर्टात दाद मागण्याची मुभा

Oct 19, 2022, 02:40 PM IST

    • Supreme Court on Municipal Corporation Elections : मुंबई पालिकेच्या वॉर्ड रचनेत हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाने नकर दिला आहे. याचिकरर्त्यांना त्यांनी या संदर्भात हायकोर्टात जाण्याची मुभा दिली आहे.
The Supreme Court of India. (ANI File Photo) (HT_PRINT)

Supreme Court on Municipal Corporation Elections : मुंबई पालिकेच्या वॉर्ड रचनेत हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाने नकर दिला आहे. याचिकरर्त्यांना त्यांनी या संदर्भात हायकोर्टात जाण्याची मुभा दिली आहे.

    • Supreme Court on Municipal Corporation Elections : मुंबई पालिकेच्या वॉर्ड रचनेत हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाने नकर दिला आहे. याचिकरर्त्यांना त्यांनी या संदर्भात हायकोर्टात जाण्याची मुभा दिली आहे.

नवी दिल्ली : शिंदे सरकारने बदललेल्या वॉर्ड रचनेच्या संदर्भात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने या संदर्भात हस्तक्षेप करण्यास नकार दिला असून याचिकाकर्त्यांना मुंबई हायकोर्टात दाद मागण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Jayant patil : “लढाई संपलेली नाही, तर आता..’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावनिक पत्र

Mumbai-Pune Trains: मुंबई ते पुणे गाड्या रद्द, २८ मे ते २ जूनपर्यंत 'या' गाड्या धावणार नाहीत, वाचा संपूर्ण यादी

Mumbai Lok Sabha : वरळीत पोलिंग बूथवर काम करणाऱ्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याचा मृत्यू

Bhiwandi Accident: भिवंडीत कारच्या धडकेत ५२ वर्षीय कामगाराचा मृत्यू, चालकाविरोधात गुन्हा दाखल

राज्यात महानगर पालिकेच्या निवडणूका या रखडल्या आहेत. शिंदे सरकारने तयार केलेली वॉर्ड रचना ही रद्द केली होती.या बाबत सुप्रीम कोर्टात याचिका करण्यात आली होती. मुंबईतले वॉर्ड महाविकासआघाडी सरकारने २२७ चे २३६ केले. त्यानंतर सत्तेत आल्यानंतर शिंदे सरकारच्या अध्यादेशानंतर वॉर्ड संख्या पुन्हा २२७ वर आली. या विरोधात सुप्रीम कोर्टात दाखल याचिकेवर हस्तक्षेप करण्यास नकार देत या संदर्भात मुंबई हायकोर्टात दाद मागण्यास सुप्रीम कोर्टाने याचिका कर्त्यांना सांगितले आहे. हे प्रकरण आता मुंबई हायकोर्टात जाणार असून यावर लवकर निकाल लागून निवडणुकीचा मार्ग हा पुन्हा खुला होईल अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

मविआ सरकारने वाढविलेले वॉर्ड संख्या नियमबाह्य पद्धतीने केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. यामुले ही वॉर्ड रचना शिंदे सरकारने रद्द केली होती. जुन्या पद्धतीने २०१७ ला ठेवण्यात आलेली वॉर्ड संख्या त्यांनी कायम केली होती. पुन्हा मुंबई महानगर पालिकेचे २१७ वॉर्ड बनवण्यात आले होते. महाविकास आघाडीने वाढवलेले वॉर्ड हे शिवसेनेच्या फायद्याचे असल्याचा आरोपी करण्यात आला होता.

 

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या