मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Supreme Court : देशात गाजलेल्या 'या' तीन प्रकरणांवर आज सुप्रीम कोर्ट देणार निर्णय!

Supreme Court : देशात गाजलेल्या 'या' तीन प्रकरणांवर आज सुप्रीम कोर्ट देणार निर्णय!

Aug 25, 2022, 09:39 AM IST

    • Rapid Fire Hearings In Supreme Court Today : सरन्यायाधीश रमण्णा हे उद्या निवृत्त होत आहेत. त्यामुळं आज सुप्रीम कोर्टात तीन महत्त्वपूर्ण प्रकरणं आज सुनावणीसाठी घेण्यात आली आहे.
Supreme Court On Maharashtra Political Crisis (HT_PRINT)

Rapid Fire Hearings In Supreme Court Today : सरन्यायाधीश रमण्णा हे उद्या निवृत्त होत आहेत. त्यामुळं आज सुप्रीम कोर्टात तीन महत्त्वपूर्ण प्रकरणं आज सुनावणीसाठी घेण्यात आली आहे.

    • Rapid Fire Hearings In Supreme Court Today : सरन्यायाधीश रमण्णा हे उद्या निवृत्त होत आहेत. त्यामुळं आज सुप्रीम कोर्टात तीन महत्त्वपूर्ण प्रकरणं आज सुनावणीसाठी घेण्यात आली आहे.

Supreme Court On Maharashtra Political Crisis : सरन्यायाधीश एनव्ही रमण्णा हे उद्या निवृत्त होणार असल्यानं आज सर्वोच्च न्यायालयात तीन महत्त्वपूर्ण प्रकरणांची सुनावणी होणार आहे. रमण्णा यांच्या कामकाजाचा आज आणि उद्याचा दिवस शेवटचा आहे. त्यामुळं देशात प्रचंड गाजलेल्या आणि तितक्याच महत्त्वपूर्ण प्रकरणांवर आज कोर्टात रॅपिड फायर सुनावण्या होणार असून त्यावर कोर्ट काय निर्णय देणार याकडं देशाचं लक्ष लागलेलं आहे, ती कोणती प्रकरणं आहेत, पाहूयात.

ट्रेंडिंग न्यूज

Viral News : चौथ्या मजल्यावर पडता पडला बचावला चिमुकला, तु काय करत होती? ट्रोलिंगला कंटाळून आईने संपवले आयुष्य

तेंदूच्या पानांची वाहतूक करणारे पिकअप वाहन दरीत कोसळले, १८ जणांचा मृत्यू; ४ जण जखमी

Gujarat News: एटीएसची मोठी कारवाई; अहमदाबाद विमानतळावर ISIS च्या ४ दहशतवाद्यांना अटक

Fact Check : प्रचार सभेत राहुल गांधींच्या हाती असलेली ही चीनची नव्हे तर भारतीय संविधानाची प्रत; फॅक्ट चेक मध्ये उघड

१. पेगॅसिस स्पायवेअर केस

देशातील अतिमहत्त्वाचे नेते आणि ४० पेक्षा अधिक पत्रकारांवर पाळत ठेवल्याची धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर देशात खळबळ उडाली होती, २०१७ साली केंद्र सरकारनं इस्रायल सरकारसोबत केलेल्या संरक्षण करारासोबत पेगॅसिस स्पायवेअर खरेदी करून हे कृत्य केल्याचं वृत्त 'न्यूयॉर्क टाईम्स'नं दिल्यानंतर मोदी सरकारवर विरोधकांनी जोरदार टीका केली होती. परंतु या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या स्वतंत्र समितीनं त्याचा अहवाल सुप्रीम कोर्टात सादर केला असून या प्रकरणावर आज कोर्टात सुनावणी होणार आहे.

२. राज्यातील सत्तासंघर्षावरील सुनावणी

शिवसेनेच्या ४० आमदारांसह बंड करत एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या पाठिंब्यानं राज्यात सत्ता स्थापन केली, परंतु त्यानंतर शिवसेना विरुद्ध शिंदे सेना असा वाद स्थानिक पातळीपासून तर सुप्रीम कोर्टापर्यंत सुरू झाला, त्यामुळं एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेसह इतर सर्व याचिकांची सुनावणी आज सुप्रीम कोर्टात होणार आहे. याशिवाय शिवसेना आणि शिंदे गटानं शिवसेनेच्या पक्षचिन्हावर ठोकलेल्या दाव्यावरही कोर्ट फैसला देणार आहे. त्यामुळं या सुनावणीकडं देशाचं लक्ष असणार आहे.

३. बिल्किस बानो बलात्कार प्रकरणातील आरोपींच्या सुटकेविरोधातील याचिका...

गुजरातमध्ये २००२ साली उसळलेल्या धार्मिक दंगलीत पाच महिन्यांची गर्भवती असलेल्या बिल्किस बानोवर ११ जणांनी सामूहिक बलात्कार केला होता, त्यानंतर दोषींना जन्मठेपेची शिक्षाही झाली, परंतु आरोपींची शिक्षा पूर्ण झाल्याचा आणि त्यांचं तुरुंगातील चांगल्या वर्तनाच्या आधारावर गुजरात सरकारनं सुटका केली होती. त्यानंतर गुजरात सरकारविरोधात पीडित बिल्कीस बानोनं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली असून आता आज त्यावर कोर्ट सुनावणी घेणार आहे.

पुढील बातम्या