मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mass suicide : ब्रह्मपुरीत एकाच कुटुंबातील चौघांचा आत्महत्येचा प्रयत्न; आईचा मृत्यू; शहरात खळबळ

Mass suicide : ब्रह्मपुरीत एकाच कुटुंबातील चौघांचा आत्महत्येचा प्रयत्न; आईचा मृत्यू; शहरात खळबळ

Sep 26, 2022, 10:07 AM IST

    • Mass suicide attempt in Chandrapur : ब्रम्हपुरीत एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या करण्याच्या प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनेने चंद्रपूर हादरले आहे.
चंद्रपूर क्राइम

Mass suicide attempt in Chandrapur : ब्रम्हपुरीत एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या करण्याच्या प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनेने चंद्रपूर हादरले आहे.

    • Mass suicide attempt in Chandrapur : ब्रम्हपुरीत एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या करण्याच्या प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनेने चंद्रपूर हादरले आहे.

चंद्रपूर : एका पत्नीने आपल्या आजारी पतीचा प्रियकराच्या साह्याने खून केल्याची घटना ताजी असताना आता आणखी एका घटनेने चंद्रपूर हादरले आहे. ब्रम्हपुरी शहरातील एकाच कुटुंबातील चौघांनी तणनाशक पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. चौघांपैकी आईचा मृत्यू झाला असून इतर तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. या तिघांना तातडीने गडचिरोली येथील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. ही घटना सहकार कॉलनी या ठिकाणी घडली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मुंबईकरांचे हृदय नाजूक! तब्बल १७ हजार नागरिकांना उच्च रक्तदाबाचा त्रास; तपासणीत धक्कादायक माहिती उघड

Fact Check: ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या रोड शोमध्ये पाकिस्तानचा झेंडा? हे खरं आहे काय?

Bank Holidays : बँकेची कामे आताच उरकून घ्या; ‘या’ कारणांमुळे पुढच्या आठवड्यात ४ दिवस बँका बंद

Mumbai Pune expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेने प्रवास करताय? शनिवारी व रविवारी 'या' वेळेत दोन तासांचा मेगा ब्लॉक

रमाकांत दामोधर ठाकरे (वय ५५), गीता रमाकांत ठाकरे (वय ५०) राहुल रमाकांत ठाकरे (वय २८) आणि मनोज रमाकांत ठाकरे (वय २६) अशी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांची एकाच परिवारातील चौघांची नावे आहेत. यातील गीता ठाकरे यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. इतरांवर गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना रविवारी रात्री घडली. त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले या संदर्भात पोलिस तपास करत आहेत. आर्थिक अडचणीतून त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

दोन दिवसांपूर्वीच चंद्रपूरात एका महिलेने आपल्या शिक्षक प्रियकरच्या मदतीने तिच्या आजारी पतीचा खून केला होता. त्या नंतर पुन्हा एका डॉक्टर महिलेले आपल्या डॉक्टर पतीचा प्रियकराच्या साह्याने भुलीचे इंजेक्शन देऊन खून करण्याच्या प्रयत्न केला होता. आता पुन्हा एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात महिलेचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास ब्रम्हपुरी पोलिसांकडून सुरू आहे.

 

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या