मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Chhagan Bhujbal: कुणबी प्रमाणपत्र वाटपावरून छगन भुजबळांनी पुन्हा सरकारला डिवचलं, यंदा काय म्हणाले? वाचा

Chhagan Bhujbal: कुणबी प्रमाणपत्र वाटपावरून छगन भुजबळांनी पुन्हा सरकारला डिवचलं, यंदा काय म्हणाले? वाचा

Feb 16, 2024, 09:36 PM IST

  • Chhagan Bhujbal On Kunbi Certificates: राज्य मागास आयोगाने आपला अहवाल सादर केल्यानंतर काही तासांतच मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जोरदार टीका केली आहे

Chhagan Bhujbal

Chhagan Bhujbal On Kunbi Certificates: राज्य मागास आयोगाने आपला अहवाल सादर केल्यानंतर काही तासांतच मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जोरदार टीका केली आहे

  • Chhagan Bhujbal On Kunbi Certificates: राज्य मागास आयोगाने आपला अहवाल सादर केल्यानंतर काही तासांतच मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जोरदार टीका केली आहे

मुंबई : इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाच्या लाभाचे अतिक्रमण थांबवावे आणि गेल्या तीन महिन्यांत कुणबी प्रमाणपत्र घेतलेल्यांना वेगळ्या मराठा कोट्यात वर्ग करण्यात यावा, अशी मागणी ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी शुक्रवारी केली. या समाजाला स्वतंत्र मराठा आरक्षण मिळायला हवे. त्यामुळे ओबीसी कोट्यातील लाभासाठी कुणबी प्रमाणपत्र घेतलेल्या सर्वांना आता मराठा कोट्यात स्थलांतरित करण्यात यावे. ओबीसी कोट्यावर अतिक्रमण होता कामा नये,' असे मत महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष सुनील शुक्रे यांनी व्यक्त केल्यानंतर ओबीसींचा प्रमुख चेहरा असलेल्या भुजबळ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

रिक्षाचालकाने भाडे नाकारले, जादा भाडे घेतल्यास करा व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार, तातडीने होणार कारवाई

Chiplun Cloudburst Rains: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी! अर्ध्या तासात धडकी भरवणारा पाऊस, मे महिन्यातच नद्यांना पूर

Mumbai Lok sabha : मतदानाच्या पूर्वसंध्येलाच मुंबईत प्रिसायडिंग ऑफिसरचा मृत्यू, होमगार्डला हृदयविकाराचा धक्का

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाचा लाभ मिळावा, यासाठी मराठा समाजाचे मागासलेपण दर्शविणारी आकडेवारी गोळा करण्याचे काम या आयोगावर सोपविण्यात आले होते. मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २० फेब्रुवारी रोजी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्याची घोषणा केली. या अहवालावर विधिमंडळात चर्चा होणार असून मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देणारा नवा कायदा संमत होण्याची शक्यता आहे.

गेल्या महिन्यात मुंबईकडे निघालेला मोर्चा मागे घेताना दिलेल्या आश्वासनांची तातडीने अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी मध्य महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात उपोषणाला बसलेले मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आंदोलनानंतर मराठा समाजाच्या मागासलेपणाचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे आदेश आयोगाला देण्यात आले होते.

कुणबी पार्श्वभूमी सिद्ध करू शकणाऱ्या सर्व मराठ्यांना ओबीसी प्रवर्गात मोडणारी मराठा समाजाची पोटजात कुणबी म्हणून प्रमाणपत्र देण्यात यावे आणि सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात आरक्षण मिळावे. या जरांगे पाटील यांच्या मागणीला राज्यातील ओबीसी नेत्यांनी विरोध केला आहे. मराठ्यांना आरक्षणाचा लाभ दिल्यास ओबीसी आरक्षण धोक्यात येईल, असा ओबीसी नेत्यांनी युक्तिवाद केला आहे.

विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या काही दिवस आधी भुजबळ यांनी आपला विरोध तीव्र केला. “मराठा समाज हा सत्ताधारी समाज आहे, मग तो मागास कसा असू शकतो? त्यामुळे राज्यात मोठी अस्वस्थता निर्माण होणार आहे. शैक्षणिक आरक्षण ठीक आहे. मराठा समाजासाठी जारी करण्यात आलेल्या सग्या सोयरे अधिसूचनेविरोधात आतापर्यंत लाखो हरकती नोंदविण्यात आल्या आहेत. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण असेल, तर त्यांना ओबीसीअंतर्गत आरक्षण देण्यासाठी खोटी कागदपत्रे देण्याचे कारण काय?” असा प्रश्न भुजबळ यांनी केला. तसेच जरांगे पाटील यांना या प्रकरणातील कायदेशीर बाबी समजल्या का? असा प्रश्न उपस्थित करत आयोगाने मराठा कुटुंबांचे सर्वेक्षण १५ दिवसांत पूर्ण केल्याने भुजबळ यांनी आश्चर्य व्यक्त केले.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या