मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Kolhapur Accident : कोल्हापुरात एसटी बसने स्कुटीवरून निघालेल्या शिक्षिकेला चिरडलं; १०० फूट नेलं फरफरटत

Kolhapur Accident : कोल्हापुरात एसटी बसने स्कुटीवरून निघालेल्या शिक्षिकेला चिरडलं; १०० फूट नेलं फरफरटत

Apr 20, 2024, 11:56 PM IST

  • Kolhapur News : हातकणंगले तालुक्यातील संजय घोडावत विद्यापीठाजवळ भरधाव एसटी बसने स्कुटीवरून जाणाऱ्या शिक्षिकेला चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. बसने शिक्षिकेला १०० फूट फरफटत नेले.

 कोल्हापुरात एसटी बसने स्कुटीवरून निघालेल्या शिक्षिकेला चिरडलं

Kolhapur News : हातकणंगले तालुक्यातील संजय घोडावत विद्यापीठाजवळ भरधाव एसटी बसने स्कुटीवरून जाणाऱ्या शिक्षिकेला चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. बसने शिक्षिकेला १०० फूट फरफटत नेले.

  • Kolhapur News : हातकणंगले तालुक्यातील संजय घोडावत विद्यापीठाजवळ भरधाव एसटी बसने स्कुटीवरून जाणाऱ्या शिक्षिकेला चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. बसने शिक्षिकेला १०० फूट फरफटत नेले.

राज्यात रस्ते अपघातात मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. अशीच एक धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात समोर आली आहे. हातकणंगले (Hatkanangale) तालुक्यातील संजय घोडावत विद्यापीठासमोर रस्ता क्रॉस करत असताना एसटी बसच्या धडकेत महिला ठार झाली. मृत महिला एका खासगी संस्थेत शिक्षिका होती. भरधाव एसटीने धडक दिल्यानंतर शिक्षिकेची स्कूटी जवळपास १०० फूट फरफटत नेली. 

ट्रेंडिंग न्यूज

maharashtra heat stroke cases : महाराष्ट्रात ७४ दिवसांत उष्माघाताचे २४१ बळी, जालन्यात सर्वाधिक मृत्यूंची नोंद

Mumbai: मोदींच्या सभेपूर्वी अनुचित प्रकार घडणार, मुंबई पोलिसांना फोन करणाऱ्याला अटक; चौकशीत समजलं...

Weather Updates: विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा, अनेक भागांत उकाडा कायम!

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

महिला एका बाजुने रस्ता ओलांडत होती. यावेळी भरधाव आलेल्या बसची दुचाकीला जोरात धडक बसली. ही शिक्षिका एका खासगी शिक्षण संस्थेत कामाला होती.

एसटीच्या धडकेत कामगार ठार, एकजण जखमी -

कोल्हापूर रोडवर एएससी कॉलेज चौकात एसटीच्या धडकेत सेंट्रिंग कामगार जागीच ठार झाला,  तर आणखी एक कामगार गंभीर जखमी झाला आहे. विनायक नीलकंठ मट्टीकल्ली (वय ४०, रा. हनुमाननगर, इचलकरंजी) असे मृताचे नाव आहे. कृष्णात धोंडीबा रजपूत (वय ५५, रा. जवाहरनगर) या गंभीर जखमीचे नाव आहे. जखमीवर कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

अपघातानंतर रुग्णवाहिका पोहोचण्यास विलंब झाल्याने अतिरक्तस्त्राव झाला. स्थानिक तरुणांनी दोन जखमींना आयजीएम रुग्णालयात दाखल केले. कृष्णात यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात हलविण्यात आले. अपघातानंतर मुख्य मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. याप्रकरणी एसटी चालक सुनील गवळी यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मुंबईतील महालक्ष्मी मंदिराजवळ भीषण अपघात -

मुंबईतील महालक्ष्मी मंदिराजवळ शनिवारी (१९ एप्रिल २०२४) भीषण अपघात झाला. रस्ता ओलांडणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींना भरधाव कारने उडवल्याची धक्कादायक घटना घडली. दोन्ही जखमी मुलींना नायर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, त्यांच्या प्रकृतीबाबात अद्याप समजू शकलेली नाही.

संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन अल्पवयीन मुली रस्ता ओलांडताना दिसत आहेत. त्याच क्षणी एका भरधाव कारने त्यांना धडक दिली आणि दोन्ही मुली रस्त्यावर खाली पडण्यापूर्वी हवेत उंच फेकल्या गेल्या. यानंतर कार घटनास्थळवरून गायब होते. अपघातातील कार पिवळ्या रंगाची सेडान आहे. ऐशानी जाधव (वय, १४) आणि जान्हवी कनोजिया (वय, १४) अशी जखमी मुलींची नावे असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या