मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sanjay Raut ED Custody: संजय राऊत यांना चार ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी

Sanjay Raut ED Custody: संजय राऊत यांना चार ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी

Aug 01, 2022, 04:31 PM IST

    • Shiv Sena MP Sanjay Raut : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊतांना काल रात्री उशिरा ईडीनं अटक केली होती. त्यानंतर आज त्यांना येत्या चार ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे.
Shiv Sena MP Sanjay Raut Arrest By ED (PTI)

Shiv Sena MP Sanjay Raut : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊतांना काल रात्री उशिरा ईडीनं अटक केली होती. त्यानंतर आज त्यांना येत्या चार ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे.

    • Shiv Sena MP Sanjay Raut : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊतांना काल रात्री उशिरा ईडीनं अटक केली होती. त्यानंतर आज त्यांना येत्या चार ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे.

Shiv Sena MP Sanjay Raut Arrest By ED : पत्राचाळ घोटाळा प्रकरणात शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांची काल ईडीनं तब्बल नऊ तास चौकशी केल्यानंतर रात्री उशिरा त्यांना अटक केली होती. त्यानंतर आता त्यांना चार ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे. संजय राऊतांना आठ दिवसांची कोठडी मिळावी, अशी मागणी ईडीनं केली होती, परंतु न्यायालयानं राऊतांना चार ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावल्यानं या काळात ईडीला राऊतांविरोधात सबळ पुरावे सादर करावे लागणार आहेत. याशिवाय संजय राऊतांकडे असलेली सर्व संपत्ती ही वैध मार्गानं मिळवण्यात आल्याचा युक्तिवाद राऊतांच्या वकीलांनी न्यायालयात केला, संजय राऊत यांना ह्रदयविकाराचा आजार आहे, त्यामुळं त्यांना कमीत कमी दिवसांची कस्टडी देण्यात यावी, अशीही मागणी राऊतांच्या वकीलांनी कोर्टात केली होती. त्यानंतर आता कोर्टानं राऊतांना चार ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Boat sank in Bhima : वादळामुळे भीमा नदीत उजनी धरणात बोट उलटली; ६ जण बुडाले, एकाने पोहून वाचवले प्राण

Nashik News : इगतपुरीमध्ये धक्कादायक घटना, भावली धरणात बुडून ५ जणांचा मृत्यू, ३ तरुणींचा समावेश

Pune Porsche Car Case : पुण्यातील घटनेबाबत राहुल गांधीनी पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केला संताप; म्हणाले...

Gondia Accident : दारूच्या नशेनं घेतला आणखी एक बळी, गोंदियात कपडे धूत असलेल्या महिलेला ट्रॅक्टरनं चिरडलं

संजय राऊतांच्या वकिलांनी काय युक्तिवाद केला?

महाराष्ट्रात सत्तांतर झालं असल्यानं संजय राऊतांवर राजकीय आकसापोटी कारवाई केली जात असल्याचा युक्तिवाद राऊतांच्या वकिलांनी केला, २०२० मध्ये पत्राचाळ प्रकरणाचा तपास मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेनं केला होता, परंतु त्यात काहीही आढळलं नसल्याचा युक्तिवाद राऊतांच्या वकिलांनी केला. त्यानंतर आता संजय राऊतांना येत्या चार ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे.

ईडीच्या वकिलांनी कोर्टात काय सांगितलं?

शिवसेना नेते संजय राऊतांचा पत्राचाळ प्रकरणात थेट सहभाग असून त्यांनी प्रविण राऊत यांच्या माध्यमातून पैसा मिळवल्याचा आरोप ईडीच्या वकिलांनी न्यायालयात केला होता. याशिवाय राऊतांनी या प्रकरणातील दोन साक्षीदारांनाही धमकावल्याचं ईडीनं कोर्टात सांगितलं, त्यामुळं संजय राऊतांना सोडलं तर ते अशा प्रकारची कृत्य पुन्हा करू शकतात, त्यामुळं त्यांना किमान आठ दिवसांची ईडी कोठडी देण्यात यावी, अशी मागणी ईडीच्या वकिलांनी केली होती.

पुढील बातम्या