मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज अकरावा स्मृतिदिन, हजारो शिवसैनिक अभिवादनासाठी शिवतीर्थावर

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज अकरावा स्मृतिदिन, हजारो शिवसैनिक अभिवादनासाठी शिवतीर्थावर

Nov 17, 2023, 09:13 AM IST

  • Balasaheb Thackeray Death Anniversary: शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज ११ स्मृतिदिन असून या निमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी हजारो शिवसैनिक शिवतीर्थावर दाखल होणार आहे. या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Balasaheb Thackeray Death Anniversary

Balasaheb Thackeray Death Anniversary: शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज ११ स्मृतिदिन असून या निमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी हजारो शिवसैनिक शिवतीर्थावर दाखल होणार आहे. या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

  • Balasaheb Thackeray Death Anniversary: शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज ११ स्मृतिदिन असून या निमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी हजारो शिवसैनिक शिवतीर्थावर दाखल होणार आहे. या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Balasaheb Thackeray Death Anniversary news update: शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज ११ वा स्मृतिदिन आहे. त्यांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून हजारो शिवसैनिक शिवतीर्थावर दाखल होणार आहे. या साथी शिवतीर्थावर जय्यत तयारी करण्यात आली आहे. शिवाजी पार्क येथे बाळासाहेब ठाकरे स्मृतिस्थळाला फुलांची आकर्ष सजावट करण्यात आली आहे. मध्यरात्री पासून या ठिकाणी येणाऱ्यांची रिघ लागली आहे. शिंदे गट, भाजप तसेच महाविकास आघाडीचे नेतेही बाळासाहेब ठाकरे यांच्या अभिवादनासाठी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

रिक्षाचालकाने भाडे नाकारले, जादा भाडे घेतल्यास करा व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार, तातडीने होणार कारवाई

Chiplun Cloudburst Rains: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी! अर्ध्या तासात धडकी भरवणारा पाऊस, मे महिन्यातच नद्यांना पूर

Mumbai Lok sabha : मतदानाच्या पूर्वसंध्येलाच मुंबईत प्रिसायडिंग ऑफिसरचा मृत्यू, होमगार्डला हृदयविकाराचा धक्का

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

Thackeray Vs Shinde: बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर जोरदार राडा, शिंदे-ठाकरे गटाचे कार्यकर्ते भिडले, VIDEO

बाळासाहेब ठाकरे यांची महाराष्ट्राच्या राजकारणातील भगवे वादळ आणि मराठी माणसाच्या हितासाठी लढणारा लढवय्या नेता अशी ख्याती होती. बाळासाहेबांनी राजकीय व कौटुंबिक जीवनात अनेक चढउतार अनुभवले. व्यंगचित्रकार म्हणून कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या बाळासाहेबांनी मराठी माणसांच्या न्याय्यहक्कांसाठी शिवसेना ही संघटना उभारली आणि वाढवली. या संघटनेनं लाखो मराठीजनांना एक आवाज दिला. शिवसेनाप्रमुख ठाकरे यांचे निधन १७ नोव्हेंबर २०१२ रोजी झाले.

बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळासमोरच शिवसेनेच्या दोन गटात राडा.. मुख्यमंत्री शिंदे अन् आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्तानं आज विविध कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले आहेत. त्यांना अभिवादन करण्यासाठी दादर शिवाजी पार्क स्मृतीस्थळ सज्ज झाले आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे कार्यकरते देखील या ठिकाणी अभिवादनासाठी येणार आहेत. यामुळे या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

शिंदे गट ठाकरे गटाच्या राड्यानंतर चोख बंदोबस्त

मुंबईतील दादर शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये गुरुवारी रात्री मोठा राडा झाला. एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते सामोरा समोर आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दोन्ही गटाने जोरदार घोषणाबाजी केली. या घटनेमुळे शिवतीर्थावर तानावाचे वातावरण निर्माण झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवाजी पार्कवर जावून बाळासाहेबांच्या स्मृतीला वंदन केल्यावर काही वेळाने हा प्रकार झाला होता. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज या ठिकाणी गैरप्रकार टाळण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा प्रकार दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन त्यांनी केले आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी देखील ही घटना चुकीची असून शांतता राखण्याचे आवाहन केले केले आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या