मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर पाहिजे; शेतकरी महिलेच्या अनोख्या मागणीची शिरूरमध्ये सर्वत्र चर्चा, कारण काय?

शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर पाहिजे; शेतकरी महिलेच्या अनोख्या मागणीची शिरूरमध्ये सर्वत्र चर्चा, कारण काय?

Jul 24, 2023, 11:37 PM IST

  • shirur news : शेतात जाण्यासाठी रस्ताच नसल्याने शिरूर तालुक्यात लताबाई भास्कर हिंगे या शेतकरी महिलेने आगळीवेगळी मागणी करत चक्क हेलिकॉप्टर खेरदीची इच्छा व्यक्त केली आहे.

संग्रहित छायाचित्र

shirur news : शेतात जाण्यासाठी रस्ताच नसल्यानेशिरूर तालुक्यात लताबाई भास्कर हिंगे याशेतकरीमहिलेनेआगळीवेगळी मागणीकरतचक्क हेलिकॉप्टर खेरदीची इच्छा व्यक्त केली आहे.

  • shirur news : शेतात जाण्यासाठी रस्ताच नसल्याने शिरूर तालुक्यात लताबाई भास्कर हिंगे या शेतकरी महिलेने आगळीवेगळी मागणी करत चक्क हेलिकॉप्टर खेरदीची इच्छा व्यक्त केली आहे.

शिरुरमध्ये एका शेतकरी महिलेने शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर हवे अशी मागणी तहसिलदाराकडे केल्याने याची सर्वत्र चर्चा होत आहे. शेतकरी कुटुंबासाठी शेती हे उदरनिर्वाहाचे महत्वाचे साधन तर असतेच मात्र शेतकरी शेतीला आपली आई मानत असतो तसेच तो आपल्या जीवापेक्षा अधिक काळजी शेताची घेत असतो. शेतकऱ्यासमोर सगळ्यात मोठी समस्या असते शेतात जाण्यासाठी व शेतीमाल बाहेर काढण्यासाठी रस्ता. शेतात जाण्यासाठी रस्ताच नसल्याने  शिरूर तालुक्यात लताबाई भास्कर हिंगे या शेतकरी महिलेने आगळीवेगळी मागणी करत चक्क हेलिकॉप्टर खेरदीची इच्छा व्यक्त केली आहे.     

ट्रेंडिंग न्यूज

मुंबईकरांचे हृदय नाजूक! तब्बल १७ हजार नागरिकांना उच्च रक्तदाबाचा त्रास; तपासणीत धक्कादायक माहिती उघड

Fact Check: ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या रोड शोमध्ये पाकिस्तानचा झेंडा? हे खरं आहे काय?

Bank Holidays : बँकेची कामे आताच उरकून घ्या; ‘या’ कारणांमुळे पुढच्या आठवड्यात ४ दिवस बँका बंद

Mumbai Pune expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेने प्रवास करताय? शनिवारी व रविवारी 'या' वेळेत दोन तासांचा मेगा ब्लॉक

लताबाई हिंगे यांनी शेतात जाण्यासाठी रस्ता मिळावा यासाठी तहसिल कार्यालयात अर्ज केला होता. त्या अर्जावर तत्कालीन तहसीलदार यांनी एका तारखेची सुनावणी घेऊन संबंधित मंडळ अधिकारी यांना स्थळ पाहणी करण्याचे आदेश दिले होते. परंतु आदेश प्राप्त झाल्यापासून मंडळ अधिकारी यांनी कोणतीही ठोस कार्यवाही केली नाही. शेतकरी लताबाई हिंगे यांनी बऱ्याच वेळा त्यांच्या कार्यालामध्ये स्थळ पाहणी करण्यासाठी त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. परंतु अनेकवेळा आपले काम सोडुन हेलपाटे मारुनही ते महाशय त्यांना भेटले नाहीत. यावेळी त्यांना मोठा मनःस्तापही सहन करावा लागला .

एकदा मंडल अधिकारी भेटले मात्र मी नवीन बदली होऊन आलोय, मला वेळ मिळाला की येऊन बघतो अशी कारणे देत टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला. हिंगे यांच्या शेतामध्ये पिक काढणीला आलेले असतानाही त्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नाही. त्यामुळे तयार शेतमाल बाहेर काढायचा कसा असा प्रश्न त्यांना सतावत आहे. त्यामुळे नाईलाजाने शेतकरी लताबाई हिंगे शेतमाल बाहेर काढण्यासाठी मला हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. हे हेलिकॉप्टर खरेदी करण्यासाठी त्यांनी शिरूर तहसिदार यांचेकडे शासकीय अनुदान किंवा आर्थिक मदत मिळावी असा अर्ज केला आहे. दरम्यान या मागणीची सर्वत्र चर्चा होत आहे. 

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या