मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Varun Sardesai : ‘शीतल म्हात्रे व्हिडिओ प्रकरणी आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलाला अटक करा’

Varun Sardesai : ‘शीतल म्हात्रे व्हिडिओ प्रकरणी आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलाला अटक करा’

Mar 14, 2023, 04:28 PM IST

  • Varun Desai on Sheetal Mhatre Viral Video : शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडिओ प्रकरणात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर आरोप करणाऱ्या शिंदेंच्या शिवसेनेची आता कोंडी होताना दिसत आहे.

Prakash Surve - Varun Sardesai

Varun Desai on Sheetal Mhatre Viral Video : शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडिओ प्रकरणात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर आरोप करणाऱ्या शिंदेंच्या शिवसेनेची आता कोंडी होताना दिसत आहे.

  • Varun Desai on Sheetal Mhatre Viral Video : शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडिओ प्रकरणात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर आरोप करणाऱ्या शिंदेंच्या शिवसेनेची आता कोंडी होताना दिसत आहे.

Sheetal Mhatre Viral Video Row : शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे व माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांच्या व्हायरल व्हिडिओचा वाद चिघळला आहे. या प्रकरणी शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या काही कार्यकर्त्यांना अटक झाल्यामुळं युवा सेना आक्रमक झाली आहे. युवा सेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे याच्यावर ठपका ठेवला असून सर्वात आधी त्याला अटक करण्याची मागणी केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

Pune Crime : धक्कादायक.. प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या

Pune Weather Updates: उष्णतेच्या लाटेनंतर पुण्यातील तापमानात घट, मे महिन्यात सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद!

Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधाव पोर्शे कारनं दोघांना चिरडलं, जागीच ठार

मागील आठवड्यात मुंबईतील पश्चिम उपनगरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक कार्यक्रम झाला होता. या कार्यक्रमादरम्यानचा प्रकाश सुर्वे व शीतल म्हात्रे यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाला. हा व्हिडिओ मॉर्फ करून विरोधकांनी व्हायरल केल्याचं सांगत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले व काही जणांना अटक करण्यात आली. मात्र, आता हे प्रकरण शिंदे गटाच्याच अंगलट येत असल्याचं दिसत आहे.

व्हिडिओ मॉर्फ केलेला असेल तर मूळ व्हिडिओ कुठं आहे, अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं केली आहे. आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे यानं मूळ व्हिडिओ स्वत:च्या फेसबुक पेजवर अपलोड केला होता. मात्र, प्रकरण चिघळताच त्यानं हा व्हिडिओ व्हायरल केला. त्यावरून युवा सेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी शिंदे गटाला घेरलं आहे.

'हा व्हिडिओ मॉर्फ झालाय की नाही ते पोलिसांनी आधी शोधायला पाहिजे. हा व्हिडिओ मॉर्फ झाला असेल तर मूळ व्हिडिओ समोर आला पाहिजे. आमच्या माहितीनुसार, प्रकाश सुर्वे यांचे चिरंजीव राज सुर्वे यांनी हा संपूर्ण व्हिडिओ फेसबुकवर लाइव्ह केलेला होता. त्यामुळं या प्रकरणात कोणाला अटक करायची असेल तर मुख्य आरोपी राज सुर्वे यांना करावी, अशी मागणी सरदेसाई यांनी केली. मुंबई पोलीस हे अत्यंत सक्षम आहेत, असंही ते शेवटी म्हणाले.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या