मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  VIDEO: शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' बंगल्यात का आले? मुख्यमंत्र्यांनी सांगितलं भेटीचं कारण

VIDEO: शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' बंगल्यात का आले? मुख्यमंत्र्यांनी सांगितलं भेटीचं कारण

Jun 01, 2023, 08:56 PM IST

  • Sharad pawar meet Eknath shinde : शरद पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यात जवळपास ४० मिनिटे चर्चा झाली. मात्र, या भेटीमागील कारण समोर आले आहे.

शरद पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेट

Sharad pawar meet Eknath shinde : शरद पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यात जवळपास४०मिनिटे चर्चा झाली. मात्र,या भेटीमागील कारण समोर आले आहे.

  • Sharad pawar meet Eknath shinde : शरद पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यात जवळपास ४० मिनिटे चर्चा झाली. मात्र, या भेटीमागील कारण समोर आले आहे.

राज्यातील राजकीय घडामोडी व राजकारणामधील अनिश्चितता पाहता शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला वर्षा बंगल्यावर दाखल झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार वर्षा या निवासस्थानी दाखल होऊन त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. कोणत्या कारणासाठी पवार यांनी मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली याचे कारण गुलदस्त्यात होते. शरद पवार काही कागदपत्रे घेऊन मुख्यमंत्री शिंदेंना भेटल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. आता मुख्यमंत्री शिंदे यांनी शरद पवार वर्षा बंगल्यावर का आले याचे कारण सांगितले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

SSC Board result 2024 : पुढच्या आठवड्यात जाहीर होणार दहावीचा निकाल, बारावीचा कधी?

Pune Traffic change : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, मेट्रो कामामुळे 'या' प्रमुख मार्गावरील वाहतुकीत आजपासून मोठा बदल

Pune Aircraft : टग ट्रकच्या धडकेत विमानाला पडले भगदाड! पुणे विमानतळावर रोखले उड्डाण; पुणे- दिल्ली विमानाचा अपघात टळला

Mahayuti mumbai rally : महायुतीच्या सभेसाठी मुंबईतील वाहतुकीत मोठा बदल! जाणून घ्या कोणते रस्ते राहणार बंद?

शरद पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे परदेश दौऱ्यावर असताना शरद पवार वर्षावर दाखल झाले आहे.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यात जवळपास ४० मिनिटे चर्चा झाली. मात्र, या भेटीमागील कारण समोर आले आहे. शरद पवार अध्यक्ष असलेल्या मराठा मंदिर संस्थेच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमंत्रण देण्यात आले. या आमंत्रणासाठी पवार स्वत: वर्षा बंगल्यावर दाखल झाले होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की,शरद पवार यांनी आज घेतलेली भेट ही सदिच्छा भेट होती. शरद पवार हे अध्यक्ष असलेल्या मराठा मंदिर संस्थेच्या अमृत महोत्सव कार्यक्रमासाठीचे आमंत्रण देण्यासाठी शरद पवार वर्षा बंगल्यावर आले होते. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

पुढील बातम्या