मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  व्यापाऱ्यांना तारा आणि शेतकऱ्यांना मारा असा सरकारचा नारा; कांदा निर्यातीवरून जयंत पाटलांची टीका

व्यापाऱ्यांना तारा आणि शेतकऱ्यांना मारा असा सरकारचा नारा; कांदा निर्यातीवरून जयंत पाटलांची टीका

Feb 21, 2024, 12:36 PM IST

    • Jayant Patil Slams Modi Government: कांदा निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
Jayant Patil (हिंदुस्तान टाइम्स)

Jayant Patil Slams Modi Government: कांदा निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

    • Jayant Patil Slams Modi Government: कांदा निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

Onion Export Ban to Continue Till March 31: केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी उठवल्यामुळे आता कांद्याला चांगला भाव मिळेल, अशा अपेक्षेने शेतकऱ्यांनी आनंद साजरा केला. मात्र, त्यांचा हा आनंद काही जास्त काळ टिकला नाही. केंद्रीय सचिव रोहित कुमार सिंह यांनी आज सकाळी ३१ मार्चपर्यंत कांदा निर्यात बंदी कायम राहील असे स्पष्ट केले. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर हल्लाबोल केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai college bans hijab: मुंबईतील आचार्य मराठे कॉलेजमध्ये हिजाब, बुरख्यावर बंदी कायम, ड्रेसकोडचा नियम 'जैसे थे' राहणार

Railway megablock : महत्त्वाची बातमी! छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील प्लॅटफॉर्म विस्तारासाठी १५ दिवसांचा मेगा ब्लॉक

Pune yerwada Crime : मुलगा झाला सैतान! दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने लाकडी दांडक्याने मारहाण करून आईचा खून

Maharashtra Weather Update : मुंबईकरांचा निघणार घाम! तर पुणे, कोल्हापूरसह राज्यात अवकाळी पावसाचे पुढील तीन दिवस धुमशान

कांदा निर्यात बंदी उठवली गेली असे सगळीकडे बोलले जात आहे. पण सत्य परिस्थिती पाहता कांदा निर्यात बंदी उठवली गेलेली नाही, व्यापाऱ्यांना तारा आणि शेतकऱ्यांना मारा अशा शब्दात जयंत पाटलांनी भाजपवर टीकास्त्र सोडले आहे.

कांदा निर्यात बंदीवरून जयंत पाटलांनी नुकतेच केलेल्या ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, "कांदा निर्यातबंदी उठवली म्हणून काही जण उगाच टाळ्या वाजवत होते. सत्य परिस्थिती ही आहे की, कांदा निर्यातबंदी उठवलीच गेली नाही. राज्यात चालू रब्बी हंगामात चार लाख ३२ हजार ७९८ हेक्टरवर कांदा लागवड झाल्याची माहिती आहे. त्यातून हंगाम अखेर सुमारे ८६ लाख टन कांदा उत्पादनाचा अंदाज आहे. सरकार निर्यातबंदी कायम ठेवत असेल तर कांद्याच्या दरात आणखी घसरण होऊ शकते व शेतकऱ्यांचे पुन्हा नुकसान होऊ शकते. व्यापाऱ्यांना तारा आणि शेतकऱ्यांना मारा असा या सरकारचा नारा!"

Sharad Pawar : भ्रष्टाचाऱ्यांचा नारा, तुरुंगापेक्षा भाजप बरा; शरद पवारांची टोलेबाजी, अजित पवारांचाही घेतला समाचार

देशातील सर्वात मोठी घाऊक कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगावमध्ये त्याची घाऊक किंमत १९ फेब्रुवारीला ४०.६२% ने वाढून १ हजार ८०० रुपये प्रति क्विंटल झाली, जी १७ फेब्रुवारीला १ हजार २८० रुपये प्रति क्विंटल होती. कांद्याच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी ३१ मार्च २०२४ च्या आधीच जाहीर केलेल्या मुदतीपर्यंत त्याच्या निर्यातीवर बंदी कायम राहील, अशी माहिती रोहित कुमार सिंह यांनी दिली. कांद्याचे भाव वाढल्याने केंद्र सरकारने ८ डिसेंबर २०२३ रोजी कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या