मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  sharad pawar : शरद पवारांनी पुन्हा केले गौतम अदानींचे कौतुक; २५ कोटींच्या चेकचा विषय काढत जाहीर मानले आभार

sharad pawar : शरद पवारांनी पुन्हा केले गौतम अदानींचे कौतुक; २५ कोटींच्या चेकचा विषय काढत जाहीर मानले आभार

Dec 24, 2023, 09:44 AM IST

    • sharad pawar again praised gautam adani : पुणे जिल्ह्यातील बारामती येथे नवीन तंत्रज्ञान केंद्राच्या उभारणीसाठी आर्थिक मदत केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी उद्योगपती गौतम अदानी यांचे आभार मानले.
sharad pawar again praised gautam adani

sharad pawar again praised gautam adani : पुणे जिल्ह्यातील बारामती येथे नवीन तंत्रज्ञान केंद्राच्या उभारणीसाठी आर्थिक मदत केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी उद्योगपती गौतम अदानी यांचे आभार मानले.

    • sharad pawar again praised gautam adani : पुणे जिल्ह्यातील बारामती येथे नवीन तंत्रज्ञान केंद्राच्या उभारणीसाठी आर्थिक मदत केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी उद्योगपती गौतम अदानी यांचे आभार मानले.

sharad pawar again praised gautam adani : पुणे जिल्ह्यातील बारामती येथे नवीन तंत्रज्ञान केंद्राच्या उभारणीसाठी आर्थिक मदत केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी उद्योगपती गौतम अदानी यांचे तोंड भरून कौतुक केले. यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांच्या भुवया पुन्हा उंचावल्या आहे. आखी दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे गटाने अदानींविरोधात मोर्चा काढला होता. मात्र, शरद पवार यांनी अडानी यांचे पुन्हा एकदा कौतुक केले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Chiplun Cloudburst Rains: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी! अर्ध्या तासात धडकी भरवणारा पाऊस, मे महिन्यातच नद्यांना पूर

Mumbai Lok sabha : मतदानाच्या पूर्वसंध्येलाच मुंबईत प्रिसायडिंग ऑफिसरचा मृत्यू, होमगार्डला हृदयविकाराचा धक्का

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

Pune Crime : धक्कादायक.. प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या

Maharashtra Weather update : राज्यात कुठे थंडी तर कुठे धुक्याची चादर; उत्तर भारतात थंडीची लाट, असे असेल आजचं हवामान

बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या अभियांत्रिकी विभागातील रोबोटिक लॅबच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना शरद पवार बोलत होते. या कार्यक्रमाला फिनोलेक्स जे पॉवर सिस्टम्स लिमिटेडचे ​​अध्यक्ष दीपक छाब्रिया देखील उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना संबोधित करताना शरद पवार म्हणाले की, विद्या प्रतिष्ठान संस्थेने नवीन प्रकल्प हाती घेतला आहे. तंत्रज्ञानामुळे अभियांत्रिकी क्षेत्र झपाट्याने बदलत आहे. पुढे जाण्यासाठी हे बदल स्वीकारण्यास तयार राहण्यासाठी तरुणांना प्रशिक्षित करणे गरजेचे आहे. आम्ही भारतात आर्टिफिशियल इंटेलिजेन्सचं पहिलं केंद्र तयार करत आहोत. त्याच्या उभारणीचं काम सुरू आहे. त्यासाठी अदानी यांनी २५ कोटी रुपयांचा धनादेश दिला. तर फर्स्ट सिफोटेक कंपनीनं या प्रकल्पासाठी १० कोटी रुपये दिले. त्यासाठी त्यांचे खूप खूप आभार. या दोघांच्या मदतीमुळे आज आपण या ठिकाणी दोन्ही प्रकल्प उभारत आहोत. त्यासाठीचं काम सुरू झाले आहे. १७ ते २२ जानेवारी या कालावधीत कृषी विकास प्रतिष्ठानच्या सहकार्यानं बारामतीत एका कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात येत आहे. त्यात लाखो शेतकरी सहभागी होतील, असे देखील पवार म्हणाले.

Corona JN.1 Virus : सावधान! कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे जाऊ शकतो तुमच्या घशातील आवाज; नव्या संशोधनात धक्कादायक खुलासा

अदानी-हिंडेनबर्ग प्रकरण उघडकीस आल्यानंतर विरोधी पक्षांनी याची चौकशी करण्यासाठी संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) स्थापन करण्याची मागणी केली होती. त्यावेळीही शरद पवारांनी अदानींना पाठिंबा दिला होता. राष्ट्रवादीचा मित्रपक्ष काँग्रेसकडून वेगळा पवित्रा घेत पवार म्हणाले होते की, अदानी समूहावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने समिती स्थापन करण्यास आपला पाठिंबा आहे, कारण संयुक्त संसदीय समितीमध्ये सत्ताधारी पक्ष संख्यात्मकदृष्ट्या वरचढ आहे. भारतीय जनता पक्ष ( भाजप) यांचे वर्चस्व असेल, त्यामुळे तपासाबाबत साशंकता निर्माण होईल. तथापि, त्यांनी नंतर सांगितले की त्यांचा पक्ष अदानी समूहावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी जेपीसी स्थापन करण्याच्या भाजपविरोधी पक्षांच्या मागणीला समर्थन देत नाही, परंतु आम्ही एकत्र असल्याने त्यांच्या विरोधात जाणार नाही.

दरम्यान, तृणमूल काँग्रेस (TMC) खासदार महुआ मोईत्रा यांनी उद्योगपती गौतम अदानी यांच्या भेटीवरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या