मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ahmednagar crime : अहमदनगर हादरलं ! चार महिलांच्या खून प्रकरणातून निर्दोष सुटलेल्या एकाची जमावानं ठेचून केली हत्या

ahmednagar crime : अहमदनगर हादरलं ! चार महिलांच्या खून प्रकरणातून निर्दोष सुटलेल्या एकाची जमावानं ठेचून केली हत्या

Dec 11, 2023, 10:14 AM IST

    • ahmednagar crime : अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चार महिलांच्या हत्येप्रकरणी निर्दोष सुटलेल्या एकाने मुलीची छेड काढल्याने संतत्प झालेल्या जमावाने त्याची ठेचून हत्या केली.
ahmednagar crime

ahmednagar crime : अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चार महिलांच्या हत्येप्रकरणी निर्दोष सुटलेल्या एकाने मुलीची छेड काढल्याने संतत्प झालेल्या जमावाने त्याची ठेचून हत्या केली.

    • ahmednagar crime : अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चार महिलांच्या हत्येप्रकरणी निर्दोष सुटलेल्या एकाने मुलीची छेड काढल्याने संतत्प झालेल्या जमावाने त्याची ठेचून हत्या केली.

ahmednagar crime : अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातिल सुगाव येथून एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. चार महिलांच्या खून प्रकरणी निर्दोष सुटलेल्या आरोपीने जेल बाहेर येताच मुलींची छेड काढल्याने संतप्त जमावाने त्याच्या घरावर हल्ला करून त्याची ठेचून हत्या केली.

ट्रेंडिंग न्यूज

Rain News : प्रचारसभांत पावसाचे विघ्न! राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाचे थैमान, पिकांचे मोठे नुकसान

Pune News : साचलेल्या पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्याने शाळकरी मुलाचा मृत्यू, पुण्यातील हडपसर येथील घटना

Maharashtra Weather Update:राज्यावर अवकाळीचे संकट! पुणे, नाशिक, नगरसह बहुतांश जिल्ह्यात बरसणार! बाहेर पडतांना काळजी घ्या

Konkankanya express : कोकणात जाणाऱ्या गाड्यांमध्ये तुफान गर्दी; ‘कोकणकन्ये’तून पडून तरुणाचा मृत्यू

Pune news: पुण्यात आज पादचारी राजा! विशेष दिनानिमित्त पीएमपीच्या जादा गाड्या; लक्ष्मी रस्त्याच्या पीएमपीच्या मार्गात बदल

मच्छिंद्र उर्फ अण्णा वैद्य (वय ५८) असे हत्या करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना रविवारी संध्याकाळी ५ च्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अकोले तालुक्यातील सुगाव येथील चार महिलांच्या खून प्रकरणात शिक्षा भोगलेला व काही गुन्ह्यांत निर्दोष मुक्त झालेला मच्छिंद्र उर्फ अण्णा वैद्य (वय ५८) याने रविवारी सायंकाळी एका अल्पवयीन मुलीची छेड काढली. ही घटना स्थानिकांना समजल्यावर संतप्त झालेल्या जमावानं अण्णा वैद्य याच्या घरावर हल्ला केला. दरम्यान, पोलिस ठाण्यात छेडछाडीचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. याच वेळी जमावाने आक्रमक होत वैद्य याला चोप दिल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी संगमनेर रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.

Ayodhya Ram Temple : अयोध्येचं राम मंदिर नाही पाहिलं तर काय पाहिलं! मंदिराच्या गर्भगृहाचे बांधकाम पूर्णत्वास; पाहा फोटो

वैद्य याने चार महिलांचा खून केला होता. तसेच त्यांचे मृतदेह शेतात पुरले होते. संगमनेरच्या ताराबाई आसाराम राऊत (वय ४५) या महिलेचा देखल वैद्य याने खून करून पुरावा नष्ट केला होता. या प्रकरणी त्याला संगमनेर न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा दिली होती. विद्युत मोटार केबल चोरी प्रकरणात गावकऱ्यांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर हे हत्याकांड उघड झाले होते. दरम्यान, जन्मठेपेची शिक्षा झाल्यावर त्याची निर्दोष मुक्तता देखील झाली होती. यानंतर तो सुगावात राहत होता.

रविवारी सायंकाळी अल्पवयीन मुलीची त्याने छेड काढली. त्यामुळे संतप्त जमावाने त्यास मारहाण केली व पोलिसांत फिर्याद दिली. या प्रकरणी अकोले पोलिसांत पोक्सो, ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या