मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune University : पुणे विद्यापीठ अधिसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्या चुलत भावाने दुसऱ्यांदा मारली बाजी

Pune University : पुणे विद्यापीठ अधिसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्या चुलत भावाने दुसऱ्यांदा मारली बाजी

Nov 23, 2022, 06:50 PM IST

    • Pune University General Assembly Election : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत भाजप पुरस्कृत विद्यापीठ विकास मंच पॅनलने महाविकास आघाडी पुरस्कृत सावित्री बाई फुले प्रगती पॅनलचा धुव्वा उडवला आहे. या निवडणुकीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चुलत भाऊ प्रसेनजीत श्रीकृष्ण फडणवीस यांचा देखील विजय झाला आहे.
प्रसेनजीत फडणवीस- देवेंद्र फडणवीस

Pune University General Assembly Election : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत भाजप पुरस्कृत विद्यापीठ विकास मंच पॅनलने महाविकास आघाडी पुरस्कृत सावित्री बाई फुले प्रगती पॅनलचा धुव्वा उडवला आहे. या निवडणुकीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चुलत भाऊ प्रसेनजीत श्रीकृष्ण फडणवीस यांचा देखील विजय झाला आहे.

    • Pune University General Assembly Election : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत भाजप पुरस्कृत विद्यापीठ विकास मंच पॅनलने महाविकास आघाडी पुरस्कृत सावित्री बाई फुले प्रगती पॅनलचा धुव्वा उडवला आहे. या निवडणुकीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चुलत भाऊ प्रसेनजीत श्रीकृष्ण फडणवीस यांचा देखील विजय झाला आहे.

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा नोंदणीकृत पदवीधर गटाच्या निवडणुकीत अनेक दिग्गज उमेदवार रिंगणात उतरले होते. चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत भाजप पुरस्कृत विद्यापीठ विकास मंचने महाविघाडीच्या सावित्रीबाई फुले प्रगती पॅनलचा धुव्वा उडवला. या निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी सभा किंगमेकर ठरली. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सख्ये चुलत भाऊ प्रसेनजीत फडणवीस यांनी सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला आहे. २०१७ मध्ये देखील अतिततिच्या सामन्यात विजयी झाले होते.

ट्रेंडिंग न्यूज

Pandharpur Darshan : भाविकांसाठी आनंदवार्ता! पंढरपूरच्या विठुरायाचे पदस्पर्श दर्शन ‘या’ तारखेपासून पुन्हा होणार सुरू

mahadev betting app : महादेव बुक बेटींग ॲपमधून नारायणगावात कोट्यवधी रुपयांची उलाढाल; गैरकारभारासाठी पैसा वळवला परदेशात

Pune Urulikanchan news : वीज कडाडल्याच्या आवाजाने पुण्यात तीन महिला पडल्या बेशुद्ध! एकीचा मृत्यू

Malad Woman Found Dead: मालाडमध्ये राहत्या घरात कुजलेल्या अवस्थेत सापडला महिलेचा मृतदेह

मुख्यमंत्र्यांचे बंधू प्रसेनजीत फडणवीस यांनी विद्यापीठ विकास मंच पॅनल कडून उमेदवारी दाखल केला होता. २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत बंधू प्रसेनजीत फडणवीस यांना विजयासाठी बाराव्या फेरी पर्यन्त घाम गाळावा लागला होता. मात्र, यावर्षी झालेल्या निवडणुकीत पहिल्याच फेरीत ते निवडणून आले. खुल्या प्रवर्गातून फडणवीस यांना चार हजार ४४७ मते मिळाली. प्रसेनजीत हे व्यवस्थापन प्रतिनिधी म्हणून निवडून आले आहे. प्रसेनजीत हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी या माध्यमातून विद्यापीठाचे अनेक प्रश्न हाताळले आहेत. विद्यार्थ्यांच्या समस्या त्यांनी प्रभावीपणे मांडल्या आहेत. ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सख्ये चुलत भाऊ आहेत.

मंतमोजणीच्या पहिल्या फेरीतच विद्यापीठ विकास मंचचे अनुसूचित जमाती (एस.टी) प्रवर्गातून गणपत नांगरे हे १३ हजार ९९५ मतांनी निवडून आले. भटक्या जमाती (एन.टी) प्रवर्गातून विजय सोनवणे हे १४ हजार १०१ मतांनी निवडून आले. अनुसूचित जाती (एस.सी) प्रवर्गातून राहुल पाखरे हे १३ हजार ५१२ मतांनी, तर इतर मागास (ओबीसी) प्रवर्गातून सचिन गोर्डे-पाटील हे १३ हजार ३४२ मतांनी निवडून आले. हे निकाल हाती येताच विद्यापीठ विकास मंचने या निवडणुकीत आघाडी मिळवली हे स्पष्ट झाले. सावित्रीबाई फुले प्रगती पॅनलला एकही जागा पहिल्या फेरीत मिळवता आली नाही.

विजयी उमेदवार

१) प्रसेनजित श्रीकृष्णा फडणवीस

२) सागर अनिल वैद्य

३) युवराज माधवराव नरवडे

४) दादाभाऊ भिकाजी शिनलकर

५) बाकेराव बस्ते ( शिवसेना ठाकरे गट)

६) राहुल शिवाजी पाखरे, SC प्रवर्ग

७) विजय निवृती सोनवने, DTNT प्रवर्ग

८) सचिन शिवाजी गोर्डे, OBC प्रवर्ग

९) गणपत पोपट नांगरे,

१०) बागेश्री मिलिंद मंठाळकर

 

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या