मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune University : पुणे विद्यापीठ अधिसभा निवडणुकीत भाजपच्या पॅनलची सरशी; महाविकास आघाडीचा धुव्वा

Pune University : पुणे विद्यापीठ अधिसभा निवडणुकीत भाजपच्या पॅनलची सरशी; महाविकास आघाडीचा धुव्वा

Nov 23, 2022, 06:34 PM IST

  • Pune University Election : पुणे विद्यापीठ अधिसभा (पदवीधर गट) निवडणुकीत भाजप पुरस्कृत पॅनलने महाविकास आघाडी पॅनलचा धुव्वा उडवत जवळपास सर्व जागांवर विजय मिळवला. महविकास आघाडीला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले.

Savitribai Phule Pune University (SPPU). (HT FILE PHOTO) (HT_PRINT)

Pune University Election : पुणे विद्यापीठ अधिसभा (पदवीधर गट) निवडणुकीत भाजप पुरस्कृत पॅनलने महाविकास आघाडी पॅनलचा धुव्वा उडवत जवळपास सर्व जागांवर विजय मिळवला. महविकास आघाडीला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले.

  • Pune University Election : पुणे विद्यापीठ अधिसभा (पदवीधर गट) निवडणुकीत भाजप पुरस्कृत पॅनलने महाविकास आघाडी पॅनलचा धुव्वा उडवत जवळपास सर्व जागांवर विजय मिळवला. महविकास आघाडीला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले.

पुणे : पुणे विद्यापीठ अधिसभा निवडणुकीत भाजप-शिंदे गटाने महाविकास आघाडीपुरस्कृत पॅनलचा धुव्वा उडवला आहे. विद्यापीठाच्या अधिसभा नोंदणीकृत पदवीधर गटाच्या निवडणुकीत विद्यापीठ विकास मंचने सावित्रीबाई फुले प्रगती पॅनलचा पराभव केला आहे. १० जागांपैकी ९ जागांवर विद्यापीठ विकास मंचचे उमेदवार निवडणून आले आहेत. तब्बल २० तास ही मतमोजणी चालली. या निवडणुकीत महाविकासआघाडी शिवसेनेचे उमेदवार बाकेराव बस्ते या एकमेव उमेदवाराचा खुल्या गटातून विजय झाला.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai, Pune weather update : मुंबईत उष्णतेच्या लाटेने तर उन आणि पावसाने पुणेकर झाले हैराण!

Ghatkopar Hoarding : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेला ६० तास उलटूनही बचावकार्य सुरूच; मृतांचा आकडा वाढला

Maharashtra Weather Update: अवकाळी पाऊस काही थांबेना! रायगड, रत्नागिरी, नाशिकला वादळी वाऱ्यासह गारपीटीचा इशारा

गूड न्यूज! यंदा वेळेआधीच मान्सूनचे आगमन, ‘या’ दिवशी केरळात होणार दाखल, महाराष्ट्रात कधी येणार?

राज्यात सत्ताबदल होताच छोट्या निवडणुकांमध्येही भाजप महाविकास आघाडीला धक्का देत आहे. पुणे विद्यापीठाच्या अधिसभा नोंदणीकृत पदवीधर गटाच्या निवडणुकीच्या १० जागांसाठी रविवारी मतदान झाले. या निवडणुकीची मतमोजनी ही मंगळवारी विद्यापीठातील सभागृहात सकाळी ८ वाजता सुरू झाली. ही मतमोजणी बुधवारी पहाटे पर्यन्त सुरू होती. तब्बल २० ते २१ तास देखील भाजप पक्षप्रणित विद्यापीठ विकास मंचाने निर्विवाद वर्चस्व मिळवत. महाविकास आघाडीला धक्का दिला आहे.

मतमोजनीच्या पहिल्या फेरीतच १० पैकी ८ जागांवर विद्यापीठ विकास मंचचे उमेदवार निवडणून आले. तर दुसऱ्या फेरीत आणखी एक उमेदवार निवडणून आला. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पॅनलला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले.

पुणे विद्यापीठाची यंदाची निवडूक चुरशीची झाली. यात भाजप आणि महाविकास आघाडी दोघांनीही आपले थेट पॅनल उभे केले होते. त्यामुळे या निवडणुकीला राजकीय स्वरूप मिळाले होते. भाजपशी संबंधित आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्ष या गटातील उमेदवारांचे ‘विद्यापीठ विकास मंच’ पॅनल तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या महाविकास आघाडीचे सावित्रीबाई फुले प्रगती पॅनल, काँग्रेसने पाठिंबा दिलेले छत्रपती शाहू महाराज परिवर्तन पॅनल, आदी पक्ष, संघटनांचे एकूण ३७ उमेदवार या निवडणूक रिंगणात उतरले होते.

मंतमोजणीच्या पहिल्या फेरीतच विद्यापीठ विकास मंचचे अनुसूचित जमाती (एस.टी) प्रवर्गातून गणपत नांगरे हे १३ हजार ९९५ मतांनी निवडून आले. भटक्या जमाती (एन.टी) प्रवर्गातून विजय सोनवणे हे १४ हजार १०१ मतांनी निवडून आले. अनुसूचित जाती (एस.सी) प्रवर्गातून राहुल पाखरे हे १३ हजार ५१२ मतांनी, तर इतर मागास (ओबीसी) प्रवर्गातून सचिन गोर्डे-पाटील हे १३ हजार ३४२ मतांनी निवडून आले. हे निकाल हाती येताच विद्यापीठ विकास मंचने या निवडणुकीत आघाडी मिळवली हे स्पष्ट झाले. सावित्रीबाई फुले प्रगती पॅनलला एकही जागा पहिल्या फेरीत मिळवता आली नाही.

महिला प्रवर्गातून बागेश्री मंठाळकर यांनी सर्वाधिक १५ हजार ६४९ मते मिळवत निवडणूक आल्या. खुल्या प्रवर्गात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चुलत भाऊ प्रसेनजीत फडणवीस हे देखील पहिल्या फेरीतच निवडून आले. त्यांच्या सोबत खुल्या प्रवर्गातून सागर वैद्य आणि युवराज नरवडे हे देखील दुसऱ्या फेरीत विजयी झाले आहेत. बुधवारी सकाळी दोन निकाल लागले. यात महाविकास आघाडीच्या एक उमेदवार विजयी झाला. एकूण १० जागांवर ९ उमेदवार हे विद्यापीठ विकास मंच यांचे निवडणूक आले आहेत.

 

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या