मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Samruddhi Highway accident : गौरी-गणपतीसाठी गावी जाणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; समृद्धी हायवेवरील अपघातात १ ठार, ३ जखमी

Samruddhi Highway accident : गौरी-गणपतीसाठी गावी जाणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; समृद्धी हायवेवरील अपघातात १ ठार, ३ जखमी

Sep 20, 2023, 09:22 AM IST

  • Samruddhi Highway accident news : समृद्धी महामार्गावर मंगळवारी संध्याकाळी एका वन्य प्राण्याला धडकुण एका कारचा अपघात झाला असून यात एक जण ठार तर तिघे जण जखमी झाले.

Samruddhi Mahamarg

Samruddhi Highway accident news : समृद्धी महामार्गावर मंगळवारी संध्याकाळी एका वन्य प्राण्याला धडकुण एका कारचा अपघात झाला असून यात एक जण ठार तर तिघे जण जखमी झाले.

  • Samruddhi Highway accident news : समृद्धी महामार्गावर मंगळवारी संध्याकाळी एका वन्य प्राण्याला धडकुण एका कारचा अपघात झाला असून यात एक जण ठार तर तिघे जण जखमी झाले.

Washim  : समृद्धी मार्गावर आपघाताचे सत्र सुरच आहे. मंगळवारी देखील या मार्गावर एक भीषण अपघात झाला. यात गौरीगणपतीला घरी जाण्याऱ्या कुटुंबावर काळाने घाला घातला. वाशिम जिल्ह्यात वनोजा कारंजा दरम्यान चॅनल क्रमांक १९६ जवळ पुण्याहून अमरावतीला जाणाऱ्या कारला वन्यप्राणी धडकून हा अपघात झाला. यात एकाचा जागीच मृत्यू झाला. तर तिघे जण गंभीर जखमी झाले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai News : मुंबईकरांचे हृदय नाजुक! तब्बल १७ हजार नागरिकांना उच्चरक्कदाबाचा आजार; तपासणीत धक्कादायक माहिती उघड

Fact Check: ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या रोड शोमध्ये पाकिस्तानचा झेंडा? हे खरं आहे काय?

Bank Holidays : बँकेची कामे आताच उरकून घ्या; ‘या’ कारणांमुळे पुढच्या आठवड्यात ४ दिवस बँका बंद

Mumbai Pune expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेने प्रवास करताय? शनिवारी व रविवारी 'या' वेळेत दोन तासांचा मेगा ब्लॉक

Maharashtra weather update: बाप्पा पावला! राज्यात पावसाचा जोर वाढणार; पुढील काही दिवस पावसाचे, वाचा हवामानाचा अंदाज

पुण्यात वास्तव्यास असणारे दुरतकर कुटुंबीय हे गौरी गणपतीसाठी पुण्याहून अमरावतीला जात होते. काल सकाळी ते निघाले. दरम्यान, संध्याकाळी ते वाशिम जवळील वनोजा कारंजा दरम्यान चॅनल क्रमांक १९६ या ठिकाणी आले असता अचानक महामार्गावर त्यांच्या गाडीपुढे वन्य प्राणी आला. त्याला त्यांची गाडी जोरदार धडकल्याने गाडीने पलटी खाऊन महामार्गावर उलटली. यात दुरतकर कुटुंबातील एकाचा मृत्यू झाला. तर तिघे जण जखमी झाले.

Bhusaval murder : भुसावळ हादरले! पतीने आणलेल्या दारूची पत्नीने केली पार्टी; संतापलेल्या पतीनं केलं भयंकर कृत्य

या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी गाडीतून प्रवाशांना बाहेर काढले. त्यांना तातडीने वाशिम येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

वन्य प्राण्यांसाठी बनवण्यात आलेले ओव्हरपास आणि अंडर पास ठरला फोल

समृद्धी महामार्ग हा अनेक अभयरण्यातून गेला आहे. येथील वन्यप्राणी रस्त्यावर येऊ नये या साठी ठीकठिकाणी ओव्हर पास आणि अंडर पास देखील बनवण्यात आले आहेत. मात्र, असे असतांनाही वन्य प्राणी महामार्गावर येत असतात. यापूर्वीही वन्य प्राणी महामार्गावर आल्याने त्यांची वाहनांना धडक अपघात झाले आहे. तसेच प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. हरणे, नीलगायी तसेच जंगली कुत्र्यांचा यात समावेश आहे. रात्रीच्या वेळी जर एखादा प्राणी रस्त्यात आडवे आल्यास मोठा अपघात होऊ शकतो.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या