मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sambhaji Nagar Accident: संभाजीनगरात ट्रकची दुचाकीला जोरदार धडक, पती-पत्नीचा जागीच मृत्यू

Sambhaji Nagar Accident: संभाजीनगरात ट्रकची दुचाकीला जोरदार धडक, पती-पत्नीचा जागीच मृत्यू

Mar 05, 2023, 01:56 PM IST

  • Road Accident: छत्रपती संभाजीनगरात ट्रकच्या धडकेत दुचाकीवरून जाणाऱ्या दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

Two Wheeler Accident (HT)

Road Accident: छत्रपती संभाजीनगरात ट्रकच्या धडकेत दुचाकीवरून जाणाऱ्या दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

  • Road Accident: छत्रपती संभाजीनगरात ट्रकच्या धडकेत दुचाकीवरून जाणाऱ्या दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

Accident: छत्रपती संभाजीनगर- नाशिक महामार्गावरील देवगाव रंगारी गावाजवळ ट्रकच्या धडकेत एका दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला आहे. हे दाम्पत्य छत्रपती संभाजीनगर शहरातील काम आटोपून आपल्या गावाकडे निघाले होते. मात्र, रस्त्यात मालवाहू ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दाम्पत्य ट्रकच्या मागच्या चाकाखाली चिरडले गेले. या घटनेची माहिती होताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपासाला सुरुवात करण्यात आली.

ट्रेंडिंग न्यूज

Konkankanya express : कोकणात जाणाऱ्या गाड्यांमध्ये तुफान गर्दी; ‘कोकणकन्ये’तून पडून तरुणाचा मृत्यू

Mumbai Goa Highway Traffic Jam: सलग सुट्ट्यांमुळे मुंबई-गोवा मार्गावर ट्रॅफिक जाम; वाहनांच्या अनेक किमी लांबच लांब रांगा

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर भेंडवळची घट मांडणी; पावसापासून शेतीपर्यंत केले महत्वाचे भाकीत; वाचा

Mumbai Crime : नाश्ता बनवला नाही म्हणून पत्नीच्या डोक्यात मारला हातोडा; कुर्ला येथील धक्कादायक घटना

राजेंद्र पंडित कुलकर्णी (वय, ४५) आणि सीमी राजेंद्र कुलकर्णी अशी अपघातात मरण पावलेल्यांची नावे आहेत. कुलकर्णी दाम्पत्य वैयक्तिक कामानिमित्त त्यांच्या दुचाकीने छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आले होते. शहरातील काम आटोपून हे दांम्पत्य संध्याकाळी आपल्या घराकडे निघाले. मात्र, देवगाव रंगारीच्या दोन किलोमीटर अंतरावर एका मालवाहू ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक जोरदार धडक दिली. या धडकेत राजेंद्र कुलकर्णी आणि त्यांची पत्नी खाली जमिनीवर पडताच ट्रकच्या चाकाखाली चिरडले गेले, ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या अपघातानंतर आरोपी ट्रक चालकाने घटना स्थळावरून पळ काढला. गावकऱ्यांनी त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला पण तो पळून जाण्यात यशस्वी झाला. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन कुलकर्णी दाम्पत्याचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपासाला सुरुवात करण्यात आली आहे.

पुढील बातम्या