मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  salman khan firing case : सलमानच्या घरासमोर गोळीबार प्रकरणात मोठी माहिती! दोन हल्लेखोरांचे फोटो आले पुढे, ओळखही पटली

salman khan firing case : सलमानच्या घरासमोर गोळीबार प्रकरणात मोठी माहिती! दोन हल्लेखोरांचे फोटो आले पुढे, ओळखही पटली

Apr 15, 2024, 06:43 AM IST

    • salman khan firing case update : सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबारप्रकरणी पोलीस ॲक्शन (Mumbai Police) मोडमध्ये आहेत. पोलिसांनी हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज पुढे आले असून दोन हल्लेखोरांची ओळख देखील पटली आहे.
सलमानच्या घरासमोर गोळीबार प्रकरणात मोठी माहिती! हल्लेखोर दोन आरोपींचे फोटो आले पुढे

salman khan firing case update : सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबारप्रकरणी पोलीस ॲक्शन (Mumbai Police) मोडमध्ये आहेत. पोलिसांनी हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज पुढे आले असून दोन हल्लेखोरांची ओळख देखील पटली आहे.

    • salman khan firing case update : सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबारप्रकरणी पोलीस ॲक्शन (Mumbai Police) मोडमध्ये आहेत. पोलिसांनी हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज पुढे आले असून दोन हल्लेखोरांची ओळख देखील पटली आहे.

salman khan firing case update : बॉलीवूडचा स्टार अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील इमारतीवर रविवारी पहाटे दोन दुचाकीस्वार हल्लेखोरांनी गोळीबार केला. हल्लेखोर हे दुचाकीवरून आले होते. गोळीबार केल्यानंतर दोघेही हल्लेखोर पळून गेले होते. दोघांनी हेल्मेट घातले असल्याने त्यांची ओळख पटू शकली नव्हती. या घटनेत कुणी जखमी अथवा मृत्यूमुखी पडले नसले तरी या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. यानंतर पोलिस अॅक्शनमोड मध्ये आले असून दोन्ही हल्लेखोरांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे. दोन्ही हल्लेखोरांचे फोटो पुढे आले असून त्या दृष्टीने पोलिस आता तपास करत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Parbhani News : परभणी हादरली! तू माझ्या पत्नीसारखीच म्हणत सासऱ्याचा सुनेवर बलात्कार

HSC Result 2024: महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता बारावीचा निकाल उद्या, एका क्लिकवर पाहा तुमचं रिझल्ट

Mumbai Constable Death : 'त्या' पोलिसाचा मृत्यू विषारी इंजेक्शनमुळे नाही; फॉरेन्सिक रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड

Kolhapur Murder : भरदिवसा आईच्या डोळ्यादेखत तरुणाला संपवलं; सैन्य दलातील जवानासह तिघे आरोपी फरार

Salman Khan: मनसे प्रमुख राज ठाकरेंनी घेतली सलमान खानची भेट; गोळीबार प्रकरणी केली चौकशी

मुंबई पोलिसांनी हल्लेखोरांविरुद्ध खुनाचा प्रयत्न आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी हल्लेखोरांची दुचाकीही ताब्यात घेतली आहे. दोन्ही हल्लेखोरांचे फोटोही समोर आले आहेत. एकाने पांढरा आणि काळा टी-शर्ट घातला आहे. दुसरी व्यक्ती लाल टी-शर्टमध्ये दिसत आहे. सीसीटीव्ही फुटेजवरून हे छायाचित्र मिळाले आहे. त्याआधारे पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.

Pune kondhwa Crime : स्वर्गात जागा देण्याच्या आमिषाने डॉक्टरला पाच कोटी रुपयांनी गंडवले

गोळीबार झाला तेव्हा सलमान होता घरी

वांद्रे पोलिसांनी आयपीसी कलम ३०७ (हत्येचा प्रयत्न) आणि आर्म्स ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, दोन्ही दुचाकीस्वारांनी वांद्रे परिसरातील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर पहाटे ४.५५ वाजता गोळीबार केला. त्यानंतर दोघेही घटनास्थळावरून पळून गेले. पोलिसांनी सांगितले की, घटनेच्या वेळी सलमान त्याच्या घरी उपस्थित होता.

पोलिसांनी गुन्हा दाखल केला

मुंबईचे डीसीपी राज तिलक रोशन यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, 'पहाटे पाचच्या सुमारास दोन अज्ञात लोकांनी अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील घराबाहेर गोळीबार केला. तीन राऊंड गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. या गोळीबारात कोणीही जखमी झाले नाही.

मुख्यमंत्र्यांनी सलमानशी चर्चा केली

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमानशी फोनवर चर्चा केली. तसेच मुख्यमंत्र्यांनी सलमानची घरी जाऊन त्याची भेट देखील घेतली. त्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना सलमानची सुरक्षा वाढवण्याच्या सूचना दिल्या. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर सुरक्षेचा आढावा घेतला जात आहे. मुख्यमंत्री म्हणाले, ही दुर्दैवी घटना आहे. पोलीस त्याचा तपास करत आहेत. आरोपींना पकडून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या