2 Labourers Dies In Slab Collapsed: मीरा भाईंदर येथील वेणू नगर परिसरात आज (१४ एप्रिल २०२४) सकाळी दुर्दैवी घटना घडली. एका इमारतीतील दुकानाचे दुरुस्तीचे काम सुरू असतान स्लॅब कोसळून दोन मजुरांचा मृत्यू झाला आहे. तर, एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती.
श्रीनाथ ज्योती इमारतीत सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. दुरुस्तीचे काम करताना दुकानाचा स्लॅब कोसळला. त्यावेळी तीन मजुर ढिगाऱ्याखाली अडकले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत तिन्ही मजुरांना ढिगाऱ्याखालून काढले. मात्र, हरिराम चौहान (वय,५५) आणि माखनलाल यादव (वय, २६) यांचा जागीच मृत्यू झाला. तर, आकाश कुमार यादवला गंभीर दुखापत झाली असून जवळच्या रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहे. या घटनेत आकाशच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
दुकानाचे मालक विनय कुमार त्रिपाठी याने दुरुस्ती आणि नूतनीकरणाच्या कामासाठी मजुरांना कामावर ठेवले होते. दरम्यान, नवघर पोलीस ठाण्यात मालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे.
मुंबईच्या गोरेगाव येथील रहिवासी सोसायटीत राहणारा मुलगा बागेत खेळण्यासाठी गेला असता वीजेचा धक्का लागून त्याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी मुलाच्या वडिलांनी शनिवारी सोसायटीतील चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यांच्या निष्काळजीपणामुळे आपल्या मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप वडिलांकडून करण्यात आला. आर्यवीर चौधरी (वय, ९) असे वीजेचा धक्का लागून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. आर्यवीर शनिवारी संध्याकळी ७.३० वाजताच्या सुमारास सोसायटीच्या बागेत खेळण्यासाठी गेला. त्यावेळी त्याला वीजेचा धक्का लागला. यानंतर आर्यवीरच्या वडिलांनी त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी सोसायटीचे अध्यक्ष, सचिव, खजिनदार यांच्यासह आणि एका जणाविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३०४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या