मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Saamana : राज्यसभा आणि विधान परिषदा मिळून किती कोटींचा धूर निघाला?

Saamana : राज्यसभा आणि विधान परिषदा मिळून किती कोटींचा धूर निघाला?

Jun 12, 2022, 09:07 AM IST

  • सामनामधून भाजपवर टीकेचे बाण सोडण्यात आलेत. त्याचवेळेस विधान परिषदेच्या निवडणुकीत योग्य ती खबरदारी शिवसेना आणि महाविकास आघाडी घेणार असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं.

सामनातनं भाजपवर टीकेचे बाण (हिंदुस्तान टाइम्स)

सामनामधून भाजपवर टीकेचे बाण सोडण्यात आलेत. त्याचवेळेस विधान परिषदेच्या निवडणुकीत योग्य ती खबरदारी शिवसेना आणि महाविकास आघाडी घेणार असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं.

  • सामनामधून भाजपवर टीकेचे बाण सोडण्यात आलेत. त्याचवेळेस विधान परिषदेच्या निवडणुकीत योग्य ती खबरदारी शिवसेना आणि महाविकास आघाडी घेणार असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं.

राज्यसभेच्या (Rajya Sabha) सहाव्या जागेसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या (Shiv Sena) संजय पवारांचा पराभव झाला आणि भाजपचे धनंजय महाडिक यांचा विजय झाला. देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadanvis) योग्य नियोजनाचं खुद्द शरद पवारांनी कौतुक केलं. मात्र हा विजय शिवसेनेच्या जिव्हारी लागला असल्याचं पाहायला मिळालं होतं. आज शिवसेनेचं मुखपृष्ठ सामनामधून आता भाजपवर टीकेचे बाण सोडले जात आहेत. आज सामना मधून त्याची आणखी एक झलक पाहायला मिळाली. काय म्हटलंय सामना मध्ये…पाहुया.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Weather Update: मुंबई, ठाण्यात आज उष्णतेची लाट! मतदारांनो सकाळच्या सत्रात उरकून घ्या मतदान

Maharashtra Weather Update : कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी पावसाचा तर मुंबई, ठाण्यात उष्णतेचा यलो अलर्ट!

रिक्षाचालकाने भाडे नाकारले, जादा भाडे घेतल्यास करा व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार, तातडीने होणार कारवाई

Chiplun Cloudburst Rains: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी! अर्ध्या तासात धडकी भरवणारा पाऊस, मे महिन्यातच नद्यांना पूर

काय म्हटलंय दैनिक सामनात?

दिल्लीतला सत्ताधारी पक्ष या निवडणुका जिंकण्यासाठी किती बेमालुमपणे केंद्रीय यंत्रणांचा वापर करतो हे पुन्हा एकदा पाहायला मिळालंय. महाराष्ट्र आणि हरियाणात याचं उत्तम उदाहरण पाहायला मिळालं. राज्यसभा निवडणुकांची मांडव परतणी सुरु असतानाच त्याच मांडवात विधान परिषदेचे ११ उमेदवार उभे राहिले आहेत. मतांचं गणित हाताशी नसताना भाजपने दोन जास्त उमेदवार उभे करावे याचा अर्थ त्यांना घोडेबाजारात हरभरे टाकायचे आहेत. महाराष्ट्राचं राजकारण बिघडवायचं आहे. राज्यसभा आणि विधान परिषदा मिळून किती कोटींचा धूर निघाला? विधान परिषदा व्हायच्या असल्या तरी यावर पैजा लागल्या आहेत. दिल्लीत व्यापाऱ्यांचं राज्य आल्यावर निवडणुका महाग झाल्याच पण निवडणुका जिंकण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर सुरु झाला. शिवसेनेनं संजय पवार या कट्टर कार्यकर्त्याला निवडणुकीत उभं केलं. मात्र धनशक्ती आणि केंद्रीय यंत्रणांपुढे त्यांना पराभव पत्करावा लागला. लोकशाही आणि क्रांतीची भाषा आपण नेहमी करतो. मात्र या दोन्ही गोष्टी आता राजकारणातनं बाद झाल्यात. भाजपचे विधान परिषदेचे एक एक उमेदवार निवडून येण्यासाठी कोटींची भाषा करतात. आधी कोणत्या पक्षात होतो, आता कोणत्या पक्षात आहोत याची जाणीव नसलेले लोकं आज भाजपमध्ये आहेत. राज्यसभा निवडणुकांच्या निमित्ताने अनेकांचे मुखवटे गळून पडले. विधान परिषदेच्या निवडणुकीत ते मुखवटे साफ फाटतील अशा शब्दात सामनाच्या रोखठोकमधून भाजपवर टीकेचे बाण सोडण्यात आले आहेत. एकीकडे सामनाच्या रोखठोकमधून भाजपवर टीकेचे बाण सोडले गेले तर दुसरीकडे शनिवारी रात्री वर्षा बंगल्यावर पराभवानंतर चिंतन बेठक घेतली गेली.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या