मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mohan Bhagwat: अनेक वर्षे शांत असलेल्या मणिपूरमध्ये हिंसाचार कुणी सुरू केला; सरसंघचालक मोहन भागवत यांचा सवाल

Mohan Bhagwat: अनेक वर्षे शांत असलेल्या मणिपूरमध्ये हिंसाचार कुणी सुरू केला; सरसंघचालक मोहन भागवत यांचा सवाल

Oct 24, 2023, 11:49 AM IST

  • Mohan Bhagwat speech at RSS Vijayadashmi mela 2023 : आज नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सवाचे मंगळवारी नागपुरातील रेशीमबाग मैदानावर आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सरसंघ चालक मोहन भागवत यांनी देशातील अनेक मुद्यांवर भाष्य केले.

RSS Chief Mohan Bhagwat On Muslims (HT)

Mohan Bhagwat speech at RSS Vijayadashmi mela 2023 : आज नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सवाचे मंगळवारी नागपुरातील रेशीमबाग मैदानावर आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सरसंघ चालक मोहन भागवत यांनी देशातील अनेक मुद्यांवर भाष्य केले.

  • Mohan Bhagwat speech at RSS Vijayadashmi mela 2023 : आज नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सवाचे मंगळवारी नागपुरातील रेशीमबाग मैदानावर आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सरसंघ चालक मोहन भागवत यांनी देशातील अनेक मुद्यांवर भाष्य केले.

Mohan Bhagwat speech in Nagpur: काही असामाजिक ततत्वांकडून देशातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सामाजिक विद्वेष पसरवला जात आहे. यामुळे एखादी छोटी घटना मोठे रूप घेते आणि देशात अशांतता निर्माण होण्यास कारणीभूत ठरते. देशविदेशातून हिंसा भडकवणारे "टूल किट" सक्रिय केले जात आहे. यामुळे अपप्रचाराच्या या जीवघेण्या मायाजाळातून बाहेर पडणे गरजेचे आहे. गेल्या दशकभरापासून मणीपुर शांत होते. अचानक असे काय झाले की येथे हिंसाचार सुरू झाला. त्या मागे परदेशी शक्तिंचा हात असण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही, असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सवाचे मंगळवारी नागपुरातील रेशीमबाग मैदानावर आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी देशातील अनेक मुद्यांवर भाष्य केले.

ट्रेंडिंग न्यूज

Maharashtra Weather Update:राज्यावर अवकाळीचे संकट! पुणे, नाशिक, नगरसह बहुतांश जिल्ह्यात बरसणार! बाहेर पडतांना काळजी घ्या

Konkankanya express : कोकणात जाणाऱ्या गाड्यांमध्ये तुफान गर्दी; ‘कोकणकन्ये’तून पडून तरुणाचा मृत्यू

Mumbai Goa Highway Traffic Jam: सलग सुट्ट्यांमुळे मुंबई-गोवा मार्गावर ट्रॅफिक जाम; वाहनांच्या अनेक किमी लांबच लांब रांगा

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर भेंडवळची घट मांडणी; पावसापासून शेतीपर्यंत केले महत्वाचे भाकीत; वाचा

Cyclone Hamoon : तेज नंतर आता हमून चक्रीवादळाचा धोका! किनारपट्टीवर धडकणार, 'या' राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध गायक व संगीतकार शंकर महादेवन उपस्थित होते. यावेळी विदर्भ प्रांत संघचालक राम हरकरे, नागपूर महानगर संघचालक राजेश लोया यावेळी उपस्थित होते.

भागवत म्हणाले, मणीपुर हे जवळपास दशकभर शांत होते. मात्र, या ठिकाणी अचानक हिंसाचार हा कसा उफाळून आला? या मागे कुणाचा हात आहे? सीमेपलीकडील अतिरेकीही या मागे होते का? आपल्या अस्तित्वाच्या भवितव्याबाबत धास्तावलेल्या मणिपुरी मैतेई समाज आणि कुकी समाजाच्या संघर्षाला जातीय तसेच धार्मिक स्वरूप देण्याचा हा प्रयत्न का केला जात आहे ? देशात उद्भवलेली ही दुर्दैवी परिस्थिती सोडवण्यासाठी व्यापक प्रयत्न आज गरजेचे आहे. या साठी राजकीय इच्छाशक्ती, अनुरूप सक्रियता आणि कार्यक्षमता गरजेची आहे, असे भागवत म्हणाले.

State Drugs racket: खळबळजनक! नाशिकच्या गिरणा नदीत सापडले कोट्यवधी रुपयांचे ड्रग्स; मध्यरात्रीपासून शोधमोहीम सुरू

भागवत म्हणाले, समाजाचे विघटन आपापसातील संघर्ष वाढवण्यासाठी काही बाह्य शक्ति या प्रयत्न करत आहेत. देशात आपल्या राजकीय स्वार्थासाठी प्रतिस्पर्ध्याला पराभूत करण्याच्या हेतूने देखील काही अनिष्ट शक्ती युती करण्याचा अविवेक करत आहे, ही चिंतेची बाब आहे.

खेळाडू, वैज्ञानिकांचे मोहन भागवत यांनी केले कौतुक

सरसंघचालक मोहन भागवत यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताच्या ऐतिहासिक कामगिरीचा उल्लेख करत यात चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचे कौतुक केले. तर चांद्रयान यशस्वी करणाऱ्या वैज्ञानिकांचे देखील कौतुक केले. भागवत म्हणाले, देशात एकता टिकविण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात एकतेचेच तत्व दिले आहे. त्यांच्या आदर्शांवर देशाला चालावे लागेल. संविधान प्रदान करताना आदरणीय डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेत दिलेल्या दोन भाषणांकडे लक्ष दिले तर यातील मर्म आपल्या लक्षात येईल. सर्वांनी त्या भाषणांचा अभ्यास केला पाहिजे, असे प्रतिपादन मोहन भागवत यांनी केले.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या