मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Jaipur Express Firing : रेल्वेत गोळीबार करणाऱ्या आरपीएफचा जवानाला अटक; कोण आहे आरोपी चेतन कुमार?

Jaipur Express Firing : रेल्वेत गोळीबार करणाऱ्या आरपीएफचा जवानाला अटक; कोण आहे आरोपी चेतन कुमार?

Jul 31, 2023, 10:23 AM IST

    • Jaipur Mumbai Express Firing : जयपूर-मुंबई सुपरफास्ट पॅसेंजर एक्स्प्रेसमध्ये आरोपीने गोळीबार करत चार लोकांची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Jaipur Express Firing (HT)

Jaipur Mumbai Express Firing : जयपूर-मुंबई सुपरफास्ट पॅसेंजर एक्स्प्रेसमध्ये आरोपीने गोळीबार करत चार लोकांची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

    • Jaipur Mumbai Express Firing : जयपूर-मुंबई सुपरफास्ट पॅसेंजर एक्स्प्रेसमध्ये आरोपीने गोळीबार करत चार लोकांची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Jaipur Mumbai Superfast Passenger Express Firing News : आठवड्याच्या सुरुवातीलाच मुंबईतून धक्कादायक घटना समोर आली आहे. पालघरनजीक जयपूर-मुंबई सुपरफास्ट पॅसेंजर एक्स्प्रेसमध्ये आरपीएफच्या जवानाने तुफान गोळीबार केला आहे. त्यात एका पोलीस कर्मचाऱ्यासह अन्य तीन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. पहाचे साडेचार ते पाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून त्यानंतर आरोपी चेतन कुमार रेल्वेतून उडी मारून फरार झाला आहे. आतापर्यंत या गोळीबाराच्या घटनेत चार लोकांचा मृत्यू झाला असून फरार झालेल्या आरोपी चेतन कुमारला अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

रिक्षाचालकाने भाडे नाकारले, जादा भाडे घेतल्यास करा व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार, तातडीने होणार कारवाई

Chiplun Cloudburst Rains: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी! अर्ध्या तासात धडकी भरवणारा पाऊस, मे महिन्यातच नद्यांना पूर

Mumbai Lok sabha : मतदानाच्या पूर्वसंध्येलाच मुंबईत प्रिसायडिंग ऑफिसरचा मृत्यू, होमगार्डला हृदयविकाराचा धक्का

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

मिळालेल्या माहितीनुसार, जयपूर-मुंबई सुपरफास्ट पॅसेंजर एक्स्प्रेस ही मुंबई सेंट्रल स्थानकाकडे जात होती. त्यावेळी सुरक्षेत तैनात असलेला आरपीएफ जवान चेतन कुमार याने एएसआय टिकाराम मीना यांच्यावर तुफान गोळीबार केला. रेल्वेत गोळीबार झाल्याची घटना समजताच प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. आरोपी चेतन कुमारने केलेल्या गोळीबारात अन्य तीन प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. गोळीबार केल्यानंतर आरोपी चेतन कुमार याने रेल्वेचा वेग कमी झाल्यानंतर बोरिवली स्थानकापूर्वी ट्रेनमधून उडी मारली. त्यानंतर आता मुंबई पोलिसांनी भाईंदरमधून आरोपी चेतन कुमारला अटक केल्याची माहिती आहे.

आरोपी चेतन कुमार हा आरपीएफचा जवान आहे. तो गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईसह विविध राज्यांमध्ये सेवा देत होता. काही दिवसांपूर्वीच त्याची सुरक्षेसाठी रेल्वे विभागात नियुक्ती करण्यात आली होती. गोळीबाराच्या घटनेनंतर आरोपी चेतनची चौकशी केली जात असून त्याच्यावर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. चेतन कुमारने केलेल्या गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्या चौघांचे मृतदेह शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांच्या कुटुंबीयांशी संपर्क करण्यात येत असून रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी पोहचल्याची माहिती भारतीय रेल्वेकडून देण्यात आली आहे.

पुढील बातम्या