मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  धाराशिवमध्ये ज्योती क्रांती मल्टीस्टेट बँकेवर सशस्त्र दरोडा; बंदुकीच्या धाकावर कर्मचाऱ्यांना डांबून २ कोटींचा ऐवज लुटला

धाराशिवमध्ये ज्योती क्रांती मल्टीस्टेट बँकेवर सशस्त्र दरोडा; बंदुकीच्या धाकावर कर्मचाऱ्यांना डांबून २ कोटींचा ऐवज लुटला

Dec 23, 2023, 10:34 PM IST

  • Dharashiv Robbery : धाराशीवमधील जिल्हा स्टेडिअमवर असलेल्या ज्योती क्रांती मल्टीस्टेट बँकेवर पाच जणांनी दरोडा टाकून २ कोटींचा ऐवज लुटला आहे.

Robbery in jyoti Kranti multi state bank

Dharashiv Robbery : धाराशीवमधील जिल्हा स्टेडिअमवर असलेल्या ज्योती क्रांती मल्टीस्टेट बँकेवर पाच जणांनी दरोडा टाकून २ कोटींचा ऐवज लुटला आहे.

  • Dharashiv Robbery : धाराशीवमधील जिल्हा स्टेडिअमवर असलेल्या ज्योती क्रांती मल्टीस्टेट बँकेवर पाच जणांनी दरोडा टाकून २ कोटींचा ऐवज लुटला आहे.

धाराशिव : धाराशिव शहरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या ज्योती क्रांती मल्टीस्टेट बँकेवर (Jyoti Kranti Multistate Bank) सशस्त्र दरोडा टाकून लाखोंच्या सोने चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास केली आहे. चोरलेल्या मुद्देमालाची किंमत २ कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. शनिवारी पाच वाजण्याच्या सुमारास हा दरोडा पडला. बंदूक आणि चाकूचा धाक दाखवून दरोडा घातल्याचा प्रकार समोर येताच शहरात खळबळ माजली आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai: मुंबईतील करी रोड, माटुंगा, महालक्ष्मी उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद होणार, जाणून घ्या कारण

Mumbai Dry days List: मुंबईत 'या' महिन्यात कोणकोणत्या दिवशी मिळणार नाही दारू, किती दिवस दुकान बंद?

Fact Check: लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरे आणि शिंदे गट भाजपमध्ये विलिन होणार? सत्य काय? वाचा!

Navi Mumbai: नववीत शाळा सोडली, युट्यूबवर पाहून नोटा छापायचं शिकला, 'असा' अडकला पोलिसांच्या जाळ्यात!

मिळालेल्या माहितीनुसार दरोडेखोरांनी सांयकाळच्या सुमारास बँकेच प्रवेश केला. व बंदुकीचा धाक दाखवून सर्व कर्मचाऱ्यांना डांबून घातले. त्यानंतर सोन्यासह सुमारे दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या सर्व थरार बँकेतील  सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. चार दरोडेखोर सीसीटीव्हीत दिसत आहेत. 

धाराशिव शहरातील श्री तुळजाभवानी क्रीडा संकुलाजवळ ज्योती क्रांती सहकारी क्रेडिट सोसायटी लि. बँक आहे. सायंकाळच्या सुमारास या बॅंकेतील कर्मचारी काम करीत असतानाच अज्ञात पाच व्यक्ती बँकेत घुसले. त्यांनी आपल्याकडील पिस्तुल तसेच चाकूचा धाक दाखवित कर्मचाऱ्यांना डांबून ठेवले. यानंतर काही क्षणातच सोने-चांदीचे दागिने तसेच रोकड घेऊन पसार झाले. पाचपैकी चार दरोडेखोर सीसीटीव्हीत कैद झाले आहेत

या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक गोहर हसन, उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल राठोड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक. वासुदेव मोरो, आनंदनगर ठाण्याचे पोलीस बांगर घटनास्थळी दाखल झाले. यानंतर श्वान पथक ठसे तज्ज्ञांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे. 

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या