मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Raj Thackeray: वेडात मराठे वीर दौडले चाळीस... राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांसमोरच मिश्किल टोलेबाजी

Raj Thackeray: वेडात मराठे वीर दौडले चाळीस... राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांसमोरच मिश्किल टोलेबाजी

Nov 03, 2022, 08:37 AM IST

    • Raj Thackeray on CM Eknath Shinde: ‘वेडात वीर दौडले सात’ या चित्रपटाच्या शुभारंभ सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थिती दर्शविली.
राज ठाकरेंची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर मिश्कील टिप्पणी

Raj Thackeray on CM Eknath Shinde: ‘वेडात वीर दौडले सात’ या चित्रपटाच्या शुभारंभ सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थिती दर्शविली.

    • Raj Thackeray on CM Eknath Shinde: ‘वेडात वीर दौडले सात’ या चित्रपटाच्या शुभारंभ सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थिती दर्शविली.

Raj Thackeray at vedat marathe veer daudale saat launch: महेश मांजरेकर, वसीम कुरेशी आणि कुरेशी प्रॉडक्शन प्रस्तुत 'वेडात वीर दौडले सात' या सिनेमाची घोषणा आज २ नोव्हेंबर रोजी मुंबईत झाली. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावेळी महेश मांजरेकर याच कौतुक केलं. याच वेळी राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर चित्रपटाच्या नावाच्या अनुषंगाने एक मिश्किल टिप्पणी केली. त्यांनी वेडात मराठे वीर दौडले ४० चे प्रोड्युसर, दिग्दर्शक आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, असा उल्लेख केला आणि मंचावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

ट्रेंडिंग न्यूज

Chiplun Cloudburst Rains: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी! अर्ध्या तासात धडकी भरवणारा पाऊस, मे महिन्यातच नद्यांना पूर

Mumbai Lok sabha : मतदानाच्या पूर्वसंध्येलाच मुंबईत प्रिसायडिंग ऑफिसरचा मृत्यू, होमगार्डला हृदयविकाराचा धक्का

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

Pune Crime : धक्कादायक.. प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या

या हटके टिप्पणी शिवाय या कार्यक्रमातील अजून एक हटके गोष्ट चर्चेचा विषय बनला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या चित्रपटाचा नारळ वाढवण्यात आला. तर राज ठाकरेंच्या हस्ते सिनेमाला क्लॅप देण्याची विनंती करण्यात आली. यावेळी राज ठाकरेंनी सिनेमाला क्लॅप देताना थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यासमोर क्लॅप दिला.

या सिनेमात काम करणाऱ्या कलाकारांची ओळख कार्यक्रमात करण्यात आली. या चित्रपटात बिग बॉस मराठीचा विजेता विशाल निकम आणि स्प्लिट्सविला विजेता जय दुधाणे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याखेरीज प्रवीण तरडे, हार्दिक जोशी, विराट मडके,सत्या मांजरेकर, डॉ. उत्कर्ष शिंदे आणि नवाब शहा हे कलाकार दिसणार आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटात अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या