मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Local Mega Block : मुंबईतील तिन्ही मार्गांवर आज रेल्वेचा मेगाब्लॉक, कसं असेल लोकलचं वेळापत्रक?

Mumbai Local Mega Block : मुंबईतील तिन्ही मार्गांवर आज रेल्वेचा मेगाब्लॉक, कसं असेल लोकलचं वेळापत्रक?

Jun 18, 2023, 07:08 AM IST

    • Mumbai Local Mega Block : ऐन रविवारीच रेल्वेने मेगाब्लॉक घेतल्याने वीकेंडला बाहेर पडणाऱ्या मुंबईकरांना मोठी अडचण होणार आहे.
Mumbai Local Mega Block Live Updates (HT)

Mumbai Local Mega Block : ऐन रविवारीच रेल्वेने मेगाब्लॉक घेतल्याने वीकेंडला बाहेर पडणाऱ्या मुंबईकरांना मोठी अडचण होणार आहे.

    • Mumbai Local Mega Block : ऐन रविवारीच रेल्वेने मेगाब्लॉक घेतल्याने वीकेंडला बाहेर पडणाऱ्या मुंबईकरांना मोठी अडचण होणार आहे.

Mumbai Local Mega Block Live Updates : वीकेंडला फिरण्याचा प्लॅन करत असलेल्या मुंबईकरांना रेल्वेने मोठा दणका दिला आहे. कारण आज रविवारी मुंबईतील तिन्ही प्रमुख रेल्वेमार्गांवर रेल्वे प्रशासनाकडून मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मुंबईतील मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेमार्गावर आज सकाळपासून मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वे रुळांची देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळं आता ऐन रविवारी फिरण्यासाठी बाहेर पडणाऱ्या मुंबईकरांची मोठी अडचण होण्याची शक्यता आहे. मेगाब्लॉकमुळं मुंबईतील अनेक लोकल रद्द करण्यात आल्या आहे. तसेच काही रेल्वेंचं वेळापत्रक बदलण्यात आल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

रिक्षाचालकाने भाडे नाकारले, जादा भाडे घेतल्यास करा व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार, तातडीने होणार कारवाई

Chiplun Cloudburst Rains: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी! अर्ध्या तासात धडकी भरवणारा पाऊस, मे महिन्यातच नद्यांना पूर

Mumbai Lok sabha : मतदानाच्या पूर्वसंध्येलाच मुंबईत प्रिसायडिंग ऑफिसरचा मृत्यू, होमगार्डला हृदयविकाराचा धक्का

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

कोणत्या मार्गांवर असेल मेगाब्लॉक?

ठाणे-कल्याण अप, डाऊन जलद मार्ग, पनवेल-वाशी अप आणि डाऊन मार्गावर, पश्चिम रेल्वे अंधेरी ते गोरेगाव अप आणि डाऊन धिम्या मार्गावर मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळं आता या मार्गांवर सातत्याने प्रवास करणाऱ्यांना पर्यायी मार्गांचा अवलंब करावा लागणार आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे-कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर रविवारी सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० पर्यंत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळं सीएसएमटीहून सुटणाऱ्या डाऊन जलद सेवा ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे. या लोकल केवळ मुंब्रा आणि दिवा या स्थानकांवरच थांबणार आहे. कल्याणमधून सुटणाऱ्या लोकल गाड्या धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे.

हार्बर मार्गावरील पनवेल-वाशी अप आणि डाऊन लाईनवर सकाळी ११.०५ ते दुपारी ०४.०५ पर्यंत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. पनवेलहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या आणि पनवेलहून बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील लोकल रद्द करण्यात येणार आहे. पनवेलहून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या लोकल आणि ठाण्यातून पनवेलकडे जाणारी ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकल सेवा रद्द करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावरील अंधेरी ते गोरेगावदरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावर रविवारी म्हणजेच उद्या सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यासाठी अंधेरी-गोरेगाव अप आणि डाऊन धिम्या मार्गावरील सर्व लोकल गाड्या जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे. तसेच राम मंदिर स्थानकात कोणत्याही रेल्वे थांबणार नाहीत. मेगाब्लॉकच्या वेळेत लोकल बोरिवली आणि गोरेगाव पर्यंतच धावणार आहे. याशिवाय अन्य काही लोकल गाड्या रद्द करण्यात येणार असल्याचंही रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

पुढील बातम्या