मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Railway Mega Block : मनमाड-दौंड मार्गावर तीन दिवसांचा मेगाब्लॉक; अनेक रेल्वे रद्द, प्रवाशांचा संताप

Railway Mega Block : मनमाड-दौंड मार्गावर तीन दिवसांचा मेगाब्लॉक; अनेक रेल्वे रद्द, प्रवाशांचा संताप

Jul 19, 2023, 10:57 AM IST

    • Manmad-Daund Railway Mega Block : दौंड-मनमाड मार्गावर धावणाऱ्या अनेक रेल्वे रद्द करण्यात आल्या आहे. तर अनेक गाड्यांचं वेळापत्रक बदलण्यात आलं आहे.
Manmad-Daund Railway Mega Block (HT)

Manmad-Daund Railway Mega Block : दौंड-मनमाड मार्गावर धावणाऱ्या अनेक रेल्वे रद्द करण्यात आल्या आहे. तर अनेक गाड्यांचं वेळापत्रक बदलण्यात आलं आहे.

    • Manmad-Daund Railway Mega Block : दौंड-मनमाड मार्गावर धावणाऱ्या अनेक रेल्वे रद्द करण्यात आल्या आहे. तर अनेक गाड्यांचं वेळापत्रक बदलण्यात आलं आहे.

Manmad-Daund Railway Mega Block : रविवारी मध्य रेल्वेकडून दिवसभर मुंबईत मेगाब्लॉक घेण्यात आला होता. त्यानंतर आता दौंड आणि मनमाड या मार्गावर रेल्वेकडून तीन दिवसांचा जम्बो मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळं अनेक रेल्वे अचानक रद्द करण्यात आल्या असून काही रेल्वेगाड्यांचं वेळापत्रक बदलण्यात आल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे. रेल्वे रुळांची देखभाल, पाहणी आणि दुरुस्तीच्या कामांसाठी तीन दिवसांचा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. तसेच मनमाड आणि दौंड दरम्यान रेल्वे लाईनचे दुहेरीकरण केलं जाणार आहे. त्यामुळं आता या मार्गावर नेहमी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागणार आहे. लांब पल्ल्याच्या अनेक रेल्वे रद्द करण्यात आल्याने प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Weather Update:मुंबईत उष्णतेची लाट! मतदारांनो सकाळच्या सत्रात उरका मतदान! आज मुंबई, ठाणे, पालघरमध्ये उष्णतेची लाट

Maharashtra Weather Update : कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी पावसाचा तर मुंबई, ठाण्यात उष्णतेचा यलो अलर्ट!

रिक्षाचालकाने भाडे नाकारले, जादा भाडे घेतल्यास करा व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार, तातडीने होणार कारवाई

Chiplun Cloudburst Rains: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी! अर्ध्या तासात धडकी भरवणारा पाऊस, मे महिन्यातच नद्यांना पूर

गेल्या महिन्याभरापासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळं रेल्वेकडून सातत्याने रुळांची पाहणी आणि तपासणी करण्यात येत असते. अर्धा पावसाळा संपत आलेला असतानाच दौंड आणि मनमाड दरम्यान रुळांची पाहणी, दुरुस्ती आणि रेल्वे लाईनच्या दुहेरीकरणाचं काम रेल्वेकडून हाती घेण्यात आलं आहे. त्यासाठी या मार्गावर तीन दिवसांचा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. परिणामी या मार्गावर धावणाऱ्या दौंड आणि निजामाबाद, पुणे-भुसावळ आणि निजामबाद-दौंड या तीन रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहे. तर अन्य चार रेल्वेंचं वेळापत्रक बदलण्यात आल्याची माहिती आहे.

दौंड आणि मनमाड दरम्यान चार महत्त्वाच्या रेल्वेगाड्या नाशिकमार्गे अन्य मार्गांवर वळवण्यात आल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे. तीन दिवसांचा मेगाब्लॉक घेण्यात आल्याने पुणे-अहमदनगर, पुणे-मनमाड दरम्यानच्या गाड्याही तीन दिवसांसाठी रद्द करण्यात येणार आहे. त्याचबरोबर जम्मुतावी एक्स्प्रेस, कर्नाटका एक्स्प्रेस आणि गोवा एक्स्प्रेस या सुपरफास्ट रेल्वे नाशिकमार्गे उत्तर भारताच्या दिशेने प्रवास करणार असल्याची माहिती आहे. त्यामुळं आता पुढील तीन दिवस प्रवाशांना रेल्वेच्या मेगाब्लॉकमुळं मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

पुढील बातम्या