मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Seat Belt Rules : आजपासून फक्त इशारा, सीटबेल्ट न लावल्यास ११ नोव्हेंबरपासून दंडात्मक कारवाई

Seat Belt Rules : आजपासून फक्त इशारा, सीटबेल्ट न लावल्यास ११ नोव्हेंबरपासून दंडात्मक कारवाई

Nov 01, 2022, 10:45 AM IST

    • Seat Belt New Rules In Mumbai : मुंबईत कारमध्ये प्रवास करताना सीट बेल्ट वापरणं बंधनकारक करण्यात आलं आहे. परंतु अजूनही अनेक वाहनचालकांनी कारमध्ये सीट बेल्ट बसवलेलं नाही.
SeatBelt New Ruls In Mumbai (HT)

Seat Belt New Rules In Mumbai : मुंबईत कारमध्ये प्रवास करताना सीट बेल्ट वापरणं बंधनकारक करण्यात आलं आहे. परंतु अजूनही अनेक वाहनचालकांनी कारमध्ये सीट बेल्ट बसवलेलं नाही.

    • Seat Belt New Rules In Mumbai : मुंबईत कारमध्ये प्रवास करताना सीट बेल्ट वापरणं बंधनकारक करण्यात आलं आहे. परंतु अजूनही अनेक वाहनचालकांनी कारमध्ये सीट बेल्ट बसवलेलं नाही.

Seat Belt New Rules In Mumbai : मुंबईत कारमध्ये प्रवास करताना सीट बेल्ट लावण्याची सक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हा नियम आजरपासून लागू करण्यात येणार होता. परंतु आता आजच्या दिवशी वाहनचालकांना केवळ समज देण्यात येणार असून येत्या ११ नोव्हेंबरपासून दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली आहे. शहरातील वाहनचालकांमध्ये सीट बेल्टबाबत अजूनही जागृती न झाल्यानं या नियमासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आल्यानं अनेक कारचालकांना दिलासा मिळाला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

10th Pass Job: दहावी उत्तीर्णांसाठी एसटी महामंडळात नोकरी; 'या' पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू!

Sharad Pawar : ...तर मला संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल! शरद पवार यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे इशारा

sakinaka : बर्थ-डे केक आणायला उशीर केला म्हणून बायको व मुलावर चाकूहल्ला, मुंबईतील साकीनाका येथील घटना

Vasai: वसईत घराबाहेर खेळायला गेलेल्या चिमुकल्याचा मृतदेह नाल्यात तरंगताना आढळला, परिसरात खळबळ!

मुंबईत अजूनही अनेक वाहनचालकांनी सीट बेल्ट बसवलेले नाहीत. त्यामुळं लोकांना या नियमाची माहिती व्हावी म्हणून वाहतूक पोलीस कारचालकांना आजपासून फक्त समज देणार आहेत. मु्ंबईच्या वाहतूक पोलिसांनी शहरातील सर्व ट्रॅफिक यूनिटला दहा दिवस जनजागृती करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर कुणी सीट बेल्ट घातला नाही तर त्याच्याविरोधात कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

परंतु मुंबईतील वाहतूक पोलिसांनी घेतलेल्या या निर्णयाविरोधात मुंबईतील टॅक्सी चालक संघटनेनं नाराजी व्यक्त केली आहे. शहरात काळी-पिवळी टॅक्सी चालकांना चार प्रवाशांची वाहतूक करण्याची परवानगी आहे. त्यामुळं टॅक्सीच्या मागच्या सीटवर तीन प्रवासी बसतात, परंतु मागे दोनच सीटबेल्ट असतात. त्यामुळं टॅक्सीची खासगी कारसोबत तुलना करू नये, अशा मागणीचं पत्र मुंबईतील टॅक्सी चालकांच्या संघटनेनं वाहतूक पोलिसांना दिलं आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या