मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Viral News : विसरभोळ्या प्रवाशांमध्ये मुंबई, पुणेकरांचाही नंबर! 'या' शहराने पटकावला पहिला क्रमांक

Viral News : विसरभोळ्या प्रवाशांमध्ये मुंबई, पुणेकरांचाही नंबर! 'या' शहराने पटकावला पहिला क्रमांक

Apr 26, 2024, 01:52 PM IST

    • Pune and Mumbai ranks in forgetful passengers: प्रवास म्हटले की गडबड आली. बस, ट्रेन, विमान वेळेत पकडण्यासाठी आपण धावपळ करत असतो. मात्र, याच धावपळीत आपण अनेक गोष्टी विसरत असतो. अशाच विसरभोळ्या प्रवाशांच्या शहाराच्या यादीत पुणे आणि मुंबईने क्रमांक पटकावला आहे.
विसरभोळ्या प्रवाशांमध्येही मुंबई, पुणेकरांचा नंबर! 'या' शहराने पटकावला पहिला क्रमांक

Pune and Mumbai ranks in forgetful passengers: प्रवास म्हटले की गडबड आली. बस, ट्रेन, विमान वेळेत पकडण्यासाठी आपण धावपळ करत असतो. मात्र, याच धावपळीत आपण अनेक गोष्टी विसरत असतो. अशाच विसरभोळ्या प्रवाशांच्या शहाराच्या यादीत पुणे आणि मुंबईने क्रमांक पटकावला आहे.

    • Pune and Mumbai ranks in forgetful passengers: प्रवास म्हटले की गडबड आली. बस, ट्रेन, विमान वेळेत पकडण्यासाठी आपण धावपळ करत असतो. मात्र, याच धावपळीत आपण अनेक गोष्टी विसरत असतो. अशाच विसरभोळ्या प्रवाशांच्या शहाराच्या यादीत पुणे आणि मुंबईने क्रमांक पटकावला आहे.

Pune and Mumbai ranks in forgetful passengers: प्रवास म्हटले की गडबड आली. बस, ट्रेन, विमान वेळेत पकडण्यासाठी आपण धावपळ करत असतो. मात्र, याच धावपळीत आपण अनेक गोष्टी विसरत असतो. अशाच विसरभोळ्या प्रवाशांच्या शहाराच्या यादीत पुणे आणि मुंबईने क्रमांक पटकावला आहे. या यादीत मुंबई दुसऱ्या तर पुणे पाचव्या क्रमांकावर आहे. विसरभोळे पुणेकर सर्वाधिक मोबाइल फोन आणि लॅपटॉप बॅग विसरत असल्याची माहिती एका अहवालात पुढे आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

रिक्षाचालकाने भाडे नाकारले, जादा भाडे घेतल्यास करा व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार, तातडीने होणार कारवाई

Chiplun Cloudburst Rains: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी! अर्ध्या तासात धडकी भरवणारा पाऊस, मे महिन्यातच नद्यांना पूर

Mumbai Lok sabha : मतदानाच्या पूर्वसंध्येलाच मुंबईत प्रिसायडिंग ऑफिसरचा मृत्यू, होमगार्डला हृदयविकाराचा धक्का

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

ऑनलाइन प्रवासी वाहतूक क्षेत्रातील आघाडीची कंपनी उबरने ‘लॉस्ट अँड फाऊंड निर्देशांक २०२४’ जाहीर केला आहे. यात ही माहिती पुढे अली आहे. या यादीत देशातील काही शहरातील विसरभोळ्या प्रवाशांची माहिती दिली आहे. त्या नुसार या शहरांना क्रमवारी दिली आहे. यात दोन शहरे ही महाराष्ट्रातील आहे. पुणे तिथे काय उणे असे नहेमीच म्हटले जाते. विसरभोळ्या प्रवाशांच्या यादीत पुण्याने पाचवा क्रमांक पटकावला आहे. तर देशाची आर्थिक राजधानी मुंबई या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिला क्रमांक हा दिल्लीने पटकावला आहे. तर बंगळुरूने हैदराबादला मागे टाकले असून या यादीत तिसरे स्थान मिळवले आहे.

या वस्तु प्रामुख्याने विसरल्या

विसरभोळ्या प्रवाशांनी काही खास वस्तु स्थानकावर विसरून सोडल्या आहेत. यात प्रामुख्याने मोबाइल फोन, लॅपटॉप बॅग, आणि कपड्यांचा समावेश आहे. या सोबतच , हेडफोन, पाकीट, चावी, पाण्याची बाटली, चष्मा अथवा गॉगल आणि दागिनेही प्रवासी विसरल्याचे अहवालात पुढे आले आहे. काही प्रवाशांनी तर विसारण्याची हद्द केली आहे. त्यांची आवडीचे वाद्य, नाण्यांचा संग्रह, प्रसाद, ट्रीमर तर पासपोर्ट सारखी महत्त्वाची कागदपत्रे देखील विसारण्याचे प्रकार घडले आहेत.

उबेरमध्ये वस्तु विसारण्याचे प्रकार सर्वाधिक

या अहवालात उबेरमध्ये प्रवासी सर्वाधिक वस्तु विसरत आसल्याचे पुढे आले आहेत. विसरलेल्या वस्तूंमध्ये प्रामुख्याने निळ्या रंगाच्या वस्तूंचे प्रमाण जास्त आहे. त्यानंतर लाल आणि गुलाबी रंगाच्या वस्तूं विसरण्याचे प्रमाण आहे. प्रवासी संध्याकाळी सातच्या सुमारास वस्तू विसरण्याचे प्रमाण जास्त आहे. तर गेल्या वर्षभरात दिवाळीच्या काळात प्रवाशांच्या वस्तू हरवण्याचे प्रमाण हे सर्वाधिक होते.

उबेरमध्ये वस्तु हरवल्यास 'हा' पर्याय

उबरची सेवा वापरताना प्रवासी वाहनात जर एखादी वस्तू विसरला तर त्याला ती वस्तु पुन्हा मिळवण्यासाठी ‘लॉस्ट अँड फाऊंड’चा पर्याय दिलेला असतो. याचा वापर करून हा व्यक्ति हरवलेली वस्तु पुन्हा मिळवू शकतो. उबरकडून ज्या गाडीत वस्तु विसरली आहे त्या गाडीच्या चालकाशी संपर्क साधून ती वस्तू परत प्रवाशांना मिळवून देतो.

सर्वाधिक विसरभोळी शहरांची यादी

१ – दिल्ली

२ – मुंबई

३- बंगळुरू

४ – हैदराबाद

५ – पुणे

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या