मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Rain : 'त्या' वादळामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील फायली उडल्याच नाहीत'; जिल्हाधिकारी कार्यालयाचे स्पष्टीकरण

Pune Rain : 'त्या' वादळामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील फायली उडल्याच नाहीत'; जिल्हाधिकारी कार्यालयाचे स्पष्टीकरण

Oct 04, 2022, 06:06 PM IST

    • Pune collector office : पुण्यात ३० तारखेला झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि वादळी वाऱ्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील फायली उडत बाहेर पडल्या असल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. या वादळी वाऱ्यात कोणत्याही प्रकारच्या फायली या उडाल्या नसल्याचे स्पष्टीकरण आज देण्यात आले.
पुणे जिल्हाधिकारी कार्यालय

Pune collector office : पुण्यात ३० तारखेला झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि वादळी वाऱ्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील फायली उडत बाहेर पडल्या असल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. या वादळी वाऱ्यात कोणत्याही प्रकारच्या फायली या उडाल्या नसल्याचे स्पष्टीकरण आज देण्यात आले.

    • Pune collector office : पुण्यात ३० तारखेला झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि वादळी वाऱ्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील फायली उडत बाहेर पडल्या असल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. या वादळी वाऱ्यात कोणत्याही प्रकारच्या फायली या उडाल्या नसल्याचे स्पष्टीकरण आज देण्यात आले.

पुणे : पुण्यात ३० तारखेला झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी देखील साचले होते. तब्बल १०० हून अधिक ठिकाणी झाडी कोसळली होती. या पावसाचा जिल्हाधिकारी कार्यालयातील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. वादळी वाऱ्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील फायली आणि कागदपत्रे उडत असल्याचे दिसत होते. या व्हिडिओ बद्दल तीन दिवसानंतर खुलासा करण्यात आला आहे. या वादळात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छताचे पॅनल्स उडून इमारतीच्या परिसरात पडले असले तरी या वादळामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील कोणतीही कागदपत्रे अथवा नस्त्या उडाल्या नाहीत, असे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी कार्यालय तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने देण्यात आले.

ट्रेंडिंग न्यूज

mahadev betting app : महादेव बुक बेटींग ॲपमधून नारायणगावात कोट्यवधी रुपयांची उलाढाल; गैरकारभारासाठी पैसा वळवला परदेशात

Pune Urulikanchan news : वीज कडाडल्याच्या आवाजाने पुण्यात तीन महिला पडल्या बेशुद्ध! एकीचा मृत्यू

Malad Woman Found Dead: मालाडमध्ये राहत्या घरात कुजलेल्या अवस्थेत सापडला महिलेचा मृतदेह

Pune BGF jewellers daroda : वानवडीतील वाडकर मळा येथील बीजीएफ ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा; ३०० ते ३५० ग्रॅम दागिने लंपास

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वास्तुमध्ये ‘अ’, ‘ब’, ‘क’ आणि ‘ड’ अशा चार विंग आहेत. ‘अ’ आणि ‘ब’ विंगमध्ये विविध कार्यालये ‘क’ विंगमध्ये जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी यांची दालने व ३५० आसन क्षमतेचे प्रेक्षागृह आणि ‘ड’ विंगमध्ये ४ मजली वाहनतळ अशा इमारती आहेत. वाहनतळाच्या इमारतीमधून कर्मचारी व अभ्यागतांना विविध कार्यालयामध्ये येण्यासाठी ५ मजल्यावर कॉरीडॉर्स ची व्यवस्था केलेली आहे. सदर कॉरीडॉर्स च्या आर.सी.सी स्लॅबखाली आभासी छत (फॉल्स सिलींग) केलेले आहे.

कॉरीडॉर्स दोन्ही बाजूस ५ मजली असून ३ मी रुंदीचे आहेत व आभासी छताचे एकूण क्षेत्रफळ ८ हजार चौरस फूट आहे. आभासी छतामध्ये ६० सें.मी. बाय ६० सें.मी. आकाराचे पॅनल्स हे अल्युमिनियम फ्रेमवर तंरगते म्हणजेच आवश्यक तेव्हा काढता येण्यासारखे ठेवलेले असतात. आरसीसी छत व आभासी छत यामधील सेवा वाहिन्याच्या देखभालीच्यादृष्टीने सदरचे पॅनल्स हे अडकवलेल्या स्थितीत ठेवलेले असतात.

३० सप्टेंबर रोजी आलेल्या वादळामध्ये वाऱ्याच्या प्रचंड वेगामुळे या आभासी छताचे बरेचसे पॅनल्स उडून इमारतीच्या परिसरात पडले. हे पॅनल्स वादळात उडतानाचा व्हिडिओ समाज माध्यमावर प्रसारित (व्हायरल) झाली. वादळात उडणारे पॅनल्स नसून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नस्ती (फाईल्स) उडाल्या असा गैरसमज सर्वत्र पसरला. तथापि, या वादळामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातील कोणत्याही कागदपत्रे, फाईल्स उडाल्या नाही तसेच इमारतीस कुठेही बाधा पोहोचलेली नाही.

आता कॉरिडॉर्समधील सर्व आभासी छत फ्रेमवर्कसह व्यावस्थितरित्या काढून घेण्यात येतील. त्यातील क्षतिग्रस्त झालेले पॅनल्स वगळता उर्वरित चांगले पॅनल्स सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत नजीकच्या भविष्यात बांधकामे प्रगतीत असलेल्या इमारतींच्या कार्यालयीन कक्षामध्ये आवश्यकता असेल त्या ठिकाणी वापरण्यात येतील, असे देखील सांगण्यात आले आहे.

 

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या