मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune PMC: निलेश राणेच्या 'त्या' वक्तव्या विरोधात पुणे पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा संताप; काळ्या फिती लावून आंदोलन

Pune PMC: निलेश राणेच्या 'त्या' वक्तव्या विरोधात पुणे पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा संताप; काळ्या फिती लावून आंदोलन

Sep 05, 2023, 04:05 PM IST

    • Pune PMC worker protest: महापालिका प्रशासन आणि महापालिका अधिकाऱ्यांच्या बद्दल आमदार नितेश राणे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्त्यव्याच्या निषेधार्थ पुणे महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले.
पुणे महानगर पालिका (HT_PRINT)

Pune PMC worker protest: महापालिका प्रशासन आणि महापालिका अधिकाऱ्यांच्या बद्दल आमदार नितेश राणे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्त्यव्याच्या निषेधार्थ पुणे महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले.

    • Pune PMC worker protest: महापालिका प्रशासन आणि महापालिका अधिकाऱ्यांच्या बद्दल आमदार नितेश राणे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्त्यव्याच्या निषेधार्थ पुणे महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले.

पुणे: पुण्यातील कसबा पेठेतील पुण्येश्वर मंदिराच्या आवारातील अतिक्रमण हटवण्यात यावे यासाठी पुणे महापालिकेच्या बाहेर आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्त्वाखाली काल आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात त्यांनी महापालिका प्रशासन आणि महापालिका अधिकाऱ्यांच्या बद्दल वादग्रस्त वक्त्यव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याच्या निषेधार्थ पुणे महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले.

ट्रेंडिंग न्यूज

Chiplun Cloudburst Rains: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी! अर्ध्या तासात धडकी भरवणारा पाऊस, मे महिन्यातच नद्यांना पूर

Mumbai Lok sabha : मतदानाच्या पूर्वसंध्येलाच मुंबईत प्रिसायडिंग ऑफिसरचा मृत्यू, होमगार्डला हृदयविकाराचा धक्का

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

Pune Crime : धक्कादायक.. प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या

पुणे शहरातील कसबा पेठ भागात असलेल्या पुण्येश्वर मंदीर परिसरातील अतिक्रमण हटविण्यात यावे, या मागणीसाठी पुण्येश्वर पुनर्निर्माण समितीच्या वतीने पुणे महापालिकेच्या आमदार नितेश राणे यांनी सोमवारी आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान आमदार नितेश राणे आणि आमदार महेश लांडगे यांनी पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, नगर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्याबद्दल एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर खालच्या पातळीवर जावून टीका होती. वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका केली होती. त्यांच्या या विधानाच्या निषेधार्थ आज मंगळवारी पुणे महापालिकेमध्ये अधिकारी आणि कर्मचारी यांनी निलेश राणे आणि महेश लांडगे यांचा निषेध केला. कर्मचाऱ्यांनी पालिकेच्या बाहेर घोषणा दिल्या तसेच दिवसभर काळ्या फिती बांधून प्रतीकात्मक आंदोलन केले.

या आंदोलनात पुणे महापालिका नगर अभियंता प्रशांत वाघमारे, अतिक्रमण प्रमुख माधव जगताप यांच्यासह अधिकारी, कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले होते.

यावेळी प्रशांत वाघमारे म्हणाले की, पुण्येश्वर मंदिर परिसरातील अतिक्रमणाबाबत काल काही संघटनांनी आंदोलन केले. मात्र हे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे हे ते विसरले. आंदोलन करतांना त्यांनी अधिकार्‍यांबद्दल चुकीची भाषा वापरली. गेल्या अनेक वर्षांपासून अधिकारी म्हणून आम्ही येथे काम करत आहोत. कोणत्याही शहराचा विकास हा एका रात्रीत होत नाही. शहरात विकास झाला नाही. अनेक वर्षे काम केल्यानंतर शहर प्रगती पथावर गेले आहे. त्यामुळे अधिकारी असो वा अन्य कर्मचारी त्यांच्या बद्दल योग्य भाषा वापरणे गरजेचे आहे या प्रकरणी पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्यासह संबधित अधिकारी वर्गासोबत पुण्येश्वर मंदिराबाबत बैठक आयोजित करण्यात आली आहे

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या