मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  महिलांकडून झालेली मारहाण जिव्हारी.. रिक्षा चालकाने खाणीत उडी घेऊन संपवले जीवन, पुण्यातील घटना

महिलांकडून झालेली मारहाण जिव्हारी.. रिक्षा चालकाने खाणीत उडी घेऊन संपवले जीवन, पुण्यातील घटना

Mar 27, 2023, 05:51 PM IST

  • Rickshaw Driver Suicide : महिलांकडून झालेली मारहाण व शिवीगाळ जिव्हारी लागल्याने एका रिक्षाचालकाने धानोरी येथील खाणीत उडी मारून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

सांकेतिक छायाचित्र

Rickshaw Driver Suicide : महिलांकडून झालेली मारहाण व शिवीगाळ जिव्हारी लागल्याने एका रिक्षाचालकाने धानोरी येथील खाणीत उडी मारून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

  • Rickshaw Driver Suicide : महिलांकडून झालेली मारहाण व शिवीगाळ जिव्हारी लागल्याने एका रिक्षाचालकाने धानोरी येथील खाणीत उडी मारून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

महिलांकडून झालेली मारहाण व शिवीगाळ जिव्हारी लागल्याने एका रिक्षाचालकाने खाणीत उडी मारून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना पुण्यातील धानोरी येथे घडली आहे. अजय शिवाजी टिंगरे (वय ४१, रा. धानोरी) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून तो रिक्षा चालकाचे काम करत होता. 

ट्रेंडिंग न्यूज

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

Pune Crime : धक्कादायक.. प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या

Pune Weather Updates: उष्णतेच्या लाटेनंतर पुण्यातील तापमानात घट, मे महिन्यात सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद!

Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधाव पोर्शे कारनं दोघांना चिरडलं, जागीच ठार

मिळालेल्या माहितीनुसार अजयने दोन दिवसापूर्वी धोनोरी परिसरातील खाणीमध्ये उडी मारून आत्महत्या केली होती. त्याचे कारण आता समोर आले आहे. शेजारच्या लोकांनी महिलांसह त्यांच्या घरात शिरून मारहाण केली होती. दारू पिऊन शिवीगाळ केल्याच्या रागातून शेजाऱ्यांनी त्याला जबर मारहाण केली होती. याबाबत अजयच्या पत्नीने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

अजय टिंगरे रिक्षा चालकाचे काम करत होता. चार दिवसापूर्वी (२३ मार्च) रात्री अजय दारू पिऊन आला होता व त्याने घरासमोर उभं राहून शिवीगाळ करू लागला. त्यानंतर अजय घरात जाऊन झोपला. मात्र  दुसऱ्या दिवशी सकाळी  शेजारचे लोक त्याच्या घरात शिरले व त्याला झोपेतून उठवून मारहाण करत घराबाहेर ओढून आणले. अजयच्या पत्नीने त्याला त्यांच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न केला मात्र चार-पाच जणांनी त्याला चांगलंच बदडून काढलं. 

या प्रकारानंतर अजय मनातल्या मनात कुढत होता. महिलांनी मारल्याचा प्रकार त्याच्या जिव्हारी लागला होता. याच नैराश्येतून त्यांने विश्रांतवाडी धानोरी रस्त्यावरील खाणीत उडी मारून आपले जीवन संपवले.

या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या