मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Dahi Handi 2023 : पुण्यात दहीहंडी उत्सवाला वेळेचं बंधन, ‘या’ वेळेपर्यंतच डॉल्बीचा दणदणाट

Pune Dahi Handi 2023 : पुण्यात दहीहंडी उत्सवाला वेळेचं बंधन, ‘या’ वेळेपर्यंतच डॉल्बीचा दणदणाट

Sep 06, 2023, 04:59 PM IST

  • Krishna janmashtami 2023 : पुणे शहरातील काही सार्वजनिक मंडळांनी दहीहंडी उत्सवाला रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी देण्याची मागणी केली होती. मात्र राज्य सरकारने वेळ वाढवून दिला नसल्याने रात्री १० वाजेपर्यंतच दहीहंडी उत्सव साजरा करता येणार आहे.

Dahi Handi (file pic)

Krishna janmashtami 2023 : पुणे शहरातील काही सार्वजनिक मंडळांनी दहीहंडी उत्सवाला रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी देण्याची मागणी केली होती. मात्र राज्य सरकारने वेळ वाढवून दिला नसल्याने रात्री १० वाजेपर्यंतच दहीहंडी उत्सव साजरा करता येणार आहे.

  • Krishna janmashtami 2023 : पुणे शहरातील काही सार्वजनिक मंडळांनी दहीहंडी उत्सवाला रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी देण्याची मागणी केली होती. मात्र राज्य सरकारने वेळ वाढवून दिला नसल्याने रात्री १० वाजेपर्यंतच दहीहंडी उत्सव साजरा करता येणार आहे.

Pune Dahihandi festival 2023 : गुरुवारी राज्यभरात दहीहंडीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जाणार आहे. राज्य सरकारने दहीहंडीला खेळाचा दर्जा दिल्याने तसेच गोविंदांना विम्याचे कवच पुरवल्याने गोविंदा पथकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान पुण्यात हा उत्सव रात्री १० वाजेपर्यंतच साजरा करता येणार आहे. शहरातील काही सार्वजनिक मंडळांनी दहीहंडी उत्सवाला रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी देण्याची मागणी केली होती. पण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार डॉल्बी तसेच साउंड सिस्टीम वाजवण्यास १० ते सकाळी ६ या वेळेत बंदी आहे. सरकारकडून दहीहंडी उत्सवासाठी वेळ वाढवून दिलेला नसल्याने पुणे शहरात रात्री १० वाजेपर्यंतच दहीहंडी उत्सवाला परवानगी आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मुंबईकरांचे हृदय नाजूक! तब्बल १७ हजार नागरिकांना उच्च रक्तदाबाचा त्रास; तपासणीत धक्कादायक माहिती उघड

Fact Check: ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या रोड शोमध्ये पाकिस्तानचा झेंडा? हे खरं आहे काय?

Bank Holidays : बँकेची कामे आताच उरकून घ्या; ‘या’ कारणांमुळे पुढच्या आठवड्यात ४ दिवस बँका बंद

Mumbai Pune expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेने प्रवास करताय? शनिवारी व रविवारी 'या' वेळेत दोन तासांचा मेगा ब्लॉक

पुण्यात प्रत्येक चौकाचौकात दहीहंडी उत्सवाचा जल्लोष दिसून येतो. पुण्यातील बाजीराव रोड, मंडई, बाबूगेनू हे पुण्यातील मोठे दहीहंडी मंडळं आहेत. त्याशिवाय पुण्यातील विविध चौकात अनेक कार्यकर्त्यांकडून दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरा केला जातो. शहराच्या मध्यवर्ती भागातील छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्त्यावर दरवर्षीप्रमाणे यंदा विविध दहीहंडी उत्सव मंडळांकडून दहीहंडी साजरी केली जाणार आहे. त्यामुळे मजुर अड्डा चौक (बुधवार चौक) ते दत्तमंदिर चौक, बेलबाग चौक ते सेवासदन चौक, मजुर अड्डा चौक ते अप्पा बळवंत चौक, महात्मा फुले मंडई, नवी पेठ या ठिकाणी होणाऱ्या दहीहंडी उत्सवासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते.

दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. दरवर्षी लाखो रुपयांची बक्षीसंदेखील देण्यात येतात. पुण्यात वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून काळजी घेतली जात आहे. काही मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या