मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Crime : बाबो..! चोरट्याने चक्क PMP बसच नेली चोरून, पुण्यात खळबळ

Pune Crime : बाबो..! चोरट्याने चक्क PMP बसच नेली चोरून, पुण्यात खळबळ

Jun 15, 2023, 11:57 PM IST

  • pmp bus stolen : पुण्यातून पी. एम. पी. बस चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चोरट्यांनी सारसबाग परिसरातून पीएमपी बस पळवून नेली.

संग्रहित छायाचित्र

pmp bus stolen : पुण्यातून पी. एम. पी. बस चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चोरट्यांनी सारसबाग परिसरातून पीएमपी बस पळवून नेली.

  • pmp bus stolen : पुण्यातून पी. एम. पी. बस चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चोरट्यांनी सारसबाग परिसरातून पीएमपी बस पळवून नेली.

Pune crime News : आजकाळ कशाची चोरी होईल काही सांगता येत नाही.पुण्यातून पी. एम. पी. बस चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चोरट्यांनी सारसबाग परिसरातून पीएमपी बस पळवून नेली व मार्केट यार्ड परिसरात बस सोडून चोरटे पसार झाले. जाताना चोरट्यांनी बसमधील पाच हजाराची बॅटरी काढून नेल्याचे सांगितले जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Chiplun Cloudburst Rains: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी! अर्ध्या तासात धडकी भरवणारा पाऊस, मे महिन्यातच नद्यांना पूर

Mumbai Lok sabha : मतदानाच्या पूर्वसंध्येलाच मुंबईत प्रिसायडिंग ऑफिसरचा मृत्यू, होमगार्डला हृदयविकाराचा धक्का

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

Pune Crime : धक्कादायक.. प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या

आषाढी वारी पालखी सोहळ्यामुळे बस पार्किंगसाठी जागा उपलब्ध नव्हती. यामुळे पीएमपी बस पूलगेट आगारात न लावता चालकाने सारसबाग परिसरात पार्क केली होती. मात्र बसमधील चावी काढून नेण्यास चालक विसरले. बसमध्ये चावी असल्याचे पाहून चोरट्याने चक्क बस पळवून नेली. मात्र यामुळे शहरात खळबळ माजली.

मार्केट यार्ड परिसरात बस सोडून चोरटा पसार झाला. या प्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पीएमपीच्या स्वारगेट आगारातून धावणाऱ्या बसेस लष्कर भागातील पूलगेट स्थानकात तसेच स्वारगेट भागात लावण्यात येतात. मात्र पालखी सोहळ्यामुळे पूलगेट स्थानकात बस लावण्यास जागा उपलब्ध नसल्याने एका चालकाने रात्री बस सारसबाग परिसरातील सणस मैदान परिसरात लावली होती.

चालक बस सोडताना चावी काढण्यास विसरला होता. बसमध्ये चावी तशीच असल्याचे पाहून चोरट्याने मध्यरात्रीच्या सुमारास बस पळवून नेली. याबाबत पीएमपीच्या स्वारगेट आगारातील सुरक्षा अधिकारी सुरेश सोनवणे यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दरम्यान, बस चोरीस गेल्याचे बुधवारी (१४ जून) लक्षात आल्यानंतर  बसचा शोध घेण्यात आला. तेव्हा बस मार्केट यार्ड आगाराजवळ लावण्यात आल्याचे आढळून आले.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या