मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune: लक्ष्मीबाई नागरी पतसंस्थेत पावणे दहा काेटींचा घोटाळा; संचालक व अध्यक्षांची मिलीभगत

Pune: लक्ष्मीबाई नागरी पतसंस्थेत पावणे दहा काेटींचा घोटाळा; संचालक व अध्यक्षांची मिलीभगत

Nov 29, 2022, 05:39 PM IST

  • Laxmibai Credit Co-Operative Society fraud: पुण्यातील कोथरूड येथे असलेली लक्ष्मीबाई पतसंस्थेचे अध्यक्ष आणि संचालकानी पावणे दहा कोटींचा अपहार केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी संचालक राजेंद्र पवार यांना अटक केली आहे.

Pune Crime (HT_PRINT)

Laxmibai Credit Co-Operative Society fraud: पुण्यातील कोथरूड येथे असलेली लक्ष्मीबाई पतसंस्थेचे अध्यक्ष आणि संचालकानी पावणे दहा कोटींचा अपहार केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी संचालक राजेंद्र पवार यांना अटक केली आहे.

  • Laxmibai Credit Co-Operative Society fraud: पुण्यातील कोथरूड येथे असलेली लक्ष्मीबाई पतसंस्थेचे अध्यक्ष आणि संचालकानी पावणे दहा कोटींचा अपहार केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी संचालक राजेंद्र पवार यांना अटक केली आहे.

Laxmibai Credit Co-Operative Society fraud: पुण्यातील काेथरुड भागातील लक्ष्मीबाई नागरी पतसंस्थेच्या अध्यक्षांसह संचालकांनी पावणेदहा काेटी रुपयांची फसवणुक करत ठेवीदारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आर्थिक व सायबर गुन्हे शाखेने पतसंस्थेच्या संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पतसंस्थेचे अध्यक्ष राजेंद्र बाबुराव पवार यांना अटक करण्यात आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Dry days List: मुंबईत 'या' महिन्यात कोणकोणत्या दिवशी मिळणार नाही दारू, किती दिवस दुकान बंद?

Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! येत्या २२ तारखेला 'या' भागातील पाणीपुरवठा १६ तासांसाठी राहणार बंद

Fact Check: लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरे आणि शिंदे गट भाजपमध्ये विलिन होणार? सत्य काय? वाचा!

Navi Mumbai: नववीत शाळा सोडली, युट्यूबवर पाहून नोटा छापायचं शिकला, 'असा' अडकला पोलिसांच्या जाळ्यात!

या घोटाळ्या प्रकरणी अपर विशेष लेखापरीक्षक जे. एस. गायकवाड यांनी काेथरुड पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार लक्ष्मीबाई नागरी पतसंस्थेच्या व्यवस्थापिका रंजना दिपक निकम, नियंत्रक अभिजीत भाेसले, नियंत्रक वैशाली पवार, संचालक चंद्रशेखर दिनकर देशमुख व इतर सहा संचालकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संचालकांवर एमपीआयडी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणुकीचा हा प्रकार १ अाॅगस्ट २०१५ ते ३१ मार्च २०२० यादरम्यान घडलेला आहे. लक्ष्मीबाई नागरी सहकारी पतसंस्थेचे विशेष लेखापरीक्षण करण्याचे आदेश सहकार विभागाने दिलेले हाेते. त्यानुसार पतसंस्थेच्या कारभाराचे सन २०१५ ते २०२० यादरम्यानच्या काळातील लेखापरीक्षण करण्यात आले.

या कालावधीत पतसंस्थेचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी संस्थेतील निधी हा अनामत खात्याद्वारे स्वत:च्या फायद्याकरिता संचालक मंडळाची मंजुरी न देता पदाचा दुरुपयाेग करुन घेतला. त्यासाठी इतरांनी पवार यांना मदत करुन या अपहारामुळे पतसंस्था अडचणीत येणार असून ही गाेष्ट निंबधक कार्यालयास कळवणे गरजेचे हाेते. परंतु तशाप्रकारे कल्पना न देता तसेच नियंत्रक वैशाली पवार व अभिजीत भाेसले यांनी संगनमताने बाेगस कर्ज नावे टाकून अपहार तब्बल पावणे दहा कोटींचा अपहार केला.

 

खात्याची बाकी कमी करुन कमी व्याज अाकारुन अपहार करणे, बँक उचल खात्यावर व्याज आकारणी न करुन अपहार करणे, दुबेरजी व्यवहाराने अनामत येणे, तारण कर्ज याद्वारे संस्थेतील रक्कमेचा अपहार करणे अशा विविध प्रकारे गैरव्यवहार करुन ९ काेटी ७४ लाख ४० हजार गडप करण्यात आल्याचे लेखा परीक्षणाच्या अहवालात पुढे आले आहे. त्यानुसार आर्थिक व सायबर गुन्हे शाखेकडून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या