मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Navi Mumbai Rape Case : ट्यूशनसाठी पैशांचं आमिष दाखवून शिक्षिकेवर बलात्कार, नवी मुंबईतील संतापजनक घटना

Navi Mumbai Rape Case : ट्यूशनसाठी पैशांचं आमिष दाखवून शिक्षिकेवर बलात्कार, नवी मुंबईतील संतापजनक घटना

May 23, 2023, 10:38 AM IST

    • Navi Mumbai Crime News : आरोपीने महिलेसोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध प्रस्थापित करत तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती.
Navi Mumbai Crime News Marathi (HT_PRINT)

Navi Mumbai Crime News : आरोपीने महिलेसोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध प्रस्थापित करत तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती.

    • Navi Mumbai Crime News : आरोपीने महिलेसोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध प्रस्थापित करत तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती.

Navi Mumbai Crime News Marathi : ट्यूशनसाठी पैसे देण्याचं आमिष दाखवत एका शिक्षिकेसोबत धक्कादायक प्रकार घडल्याची घटना समोर आली आहे. आरोपीने महिलेला पैशांचं आमिष दाखवून वारंवार बलात्कार करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना नवी मुंबईतून समोर आली आहे. त्यानंतर आता पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीला अटक केली आहे. गणेश वर्मा असं आरोपीचं नाव असून तो गेल्या अनेक दिवसांपासून शिक्षक महिलेवर सातत्याने लैंगिक अत्याचार करत होता. पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी गणेश वर्मा याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

Pune Crime : धक्कादायक.. प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या

Pune Weather Updates: उष्णतेच्या लाटेनंतर पुण्यातील तापमानात घट, मे महिन्यात सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद!

Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधाव पोर्शे कारनं दोघांना चिरडलं, जागीच ठार

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी गणेश वर्माने नवी मुंबईतील एका खाजगी ट्यूशनमध्ये काम करत असलेल्या महिलेला पैशांचं आमिष दाखवून प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. त्यानंतर आरोपी गणेशने पीडितेवर सातत्याने शारीरिक संबंध ठेवत महिलेची फसवणूक केली. या प्रकरणाची माहिती कुणाला दिल्यास आरोपीने महिलेला ठार मारण्याची धमकीही दिली. त्यानंतर आरोपीच्या जाचाला कंटाळलेल्या महिलेने थेट आरसीएफ पोलीस स्टेशन गाठत आरोपी गणेश वर्मा याच्याविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणाला गांभीर्याने घेत आरोपी गणेशला अटक केली आहे.

आरोपी गणेश वर्मा याने अनेकदा महिला शिक्षिकेवर चेम्बूर कॅम्पमध्ये अनैसर्गिक बलात्कार केल्याचं पीडितेने तक्रारीत म्हटलं आहे. याशिवाय आरोपीने महिलेला अश्लिल शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती. पीडितेने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याची कोठडीत रवानगी केली आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबईत एका तरुणीचा विनयभंग करण्याची घटना समोर आली होती, त्यानंतर आता महिला शिक्षिकेवर बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आल्यामुळं नवी मुंबईत खळबळ उडाली आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या