मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Kolhapur Crime News : पुणे-बंगळुरू महामार्गावर पोलिसांची मोठी कारवाई, लाखोंची विदेशी दारू जप्त, दोन आरोपींना अटक

Kolhapur Crime News : पुणे-बंगळुरू महामार्गावर पोलिसांची मोठी कारवाई, लाखोंची विदेशी दारू जप्त, दोन आरोपींना अटक

Atik Sikandar Shaikh HT Marathi
May 23, 2023 09:06 AM IST

Kolhapur Crime News : शिरगाव परिसरातील एका हॉटेलमध्ये विदेशी दारुची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी हॉटेलवर छापा मारत मोठी कारवाई केली आहे.

Kolhapur Crime News Marathi
Kolhapur Crime News Marathi (HT_PRINT)

Kolhapur Crime News Marathi : नागपूर-मुंबई महामार्गावरील अपघाताची बातमी ताजी असतानाच आता पुणे-बंगळुरू महामार्गावरून धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ-शिरगाव परिसरात पोलिसांनी छापेमारी करत तब्बल १२ लाख रुपयांची विदेशी दारू जप्त केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आरोपी अवैधरित्या विदेशी दारुची विक्री करत होते. त्याची माहिती मिळताच पोलिसांनी संबंधित हॉटेलवर छापेमारी करत दोन आरोपींना अटक केली आहे. या धक्कादायक घटनेमुळं कोल्हापुरात खळबळ उडाली असून अवैध मद्यविक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. पोलिसांनी जप्त केलेली दारू ही गोव्यातून आणली गेल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-बंगळुरू महामार्गावरील शिरगावच्या एका हॉटेलमध्ये अवैधरित्या विदेशी दारू विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचत शिरगाव परिसरात उभ्या असलेल्या एका ट्रकची चौकशी केली. त्यावेळी त्यात १२ लाखांची विदेशी दारू असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. त्यानंतर पोलिसांनी दारुचा साठा व संबंधित वाहनाला जप्त केलं. तसेच या प्रकरणातील दोन आरोपींनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. किरण कोकाटे आणि स्वप्निल कोरडे अशी आरोपींची नावं आहेत. पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील प्रमुख महामार्गांवर अवैधरित्या मद्यविक्री होत असल्याच्या अनेक घटना समोर आलेल्या आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई-नागपूर जुन्या महामार्गावर पोलिसांनी छापेमारी करत लाखोंची विदेशी दारू जप्त केली होती. त्यानंतर आता पुणे-बंगळुरू महामार्गावरही तब्बल १२ लाख रुपयांची विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे. त्यामुळं राज्यात अवैधरित्या मद्यविक्री करणारी आंतरराज्यीय टोळी सक्रीय असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.

IPL_Entry_Point