मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  गुवाहाटीत आमदारांचे हाल? मारहाण करुन इंजेक्शन दिल्याचा आरोप

गुवाहाटीत आमदारांचे हाल? मारहाण करुन इंजेक्शन दिल्याचा आरोप

Jun 28, 2022, 12:52 PM IST

    • बंडखोरांना अपात्र ठरवण्याची खेळी शिवसेनेने खेळली पण सुप्रीम कोर्टाने बंडखोरांना १२ जुलैपर्यंत दिलासा दिला आहे. अशात पक्ष श्रेष्ठींच्या भेटीगाठी वाढू लागल्या आहे. सोमवारी रात्री कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
नाना पटोले (PTI)

बंडखोरांना अपात्र ठरवण्याची खेळी शिवसेनेने खेळली पण सुप्रीम कोर्टाने बंडखोरांना १२ जुलैपर्यंत दिलासा दिला आहे. अशात पक्ष श्रेष्ठींच्या भेटीगाठी वाढू लागल्या आहे. सोमवारी रात्री कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

    • बंडखोरांना अपात्र ठरवण्याची खेळी शिवसेनेने खेळली पण सुप्रीम कोर्टाने बंडखोरांना १२ जुलैपर्यंत दिलासा दिला आहे. अशात पक्ष श्रेष्ठींच्या भेटीगाठी वाढू लागल्या आहे. सोमवारी रात्री कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

Maharashtra political crisis एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीमुळे शिवसेनेला भगदाड पडले आहे. बंडखोरांच्या विरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे. त्यांची खाती काढून घेण्यात आली. बंडखोरांना अपात्र ठरवण्याची खेळी शिवसेनेने खेळली पण सुप्रीम कोर्टाने बंडखोरांना १२ जुलैपर्यंत दिलासा दिला आहे. अशात पक्ष श्रेष्ठींच्या भेटीगाठी वाढू लागल्या आहे. सोमवारी रात्री कॉँग्रेसचे  प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यांनी त्यांच्याशी सध्याच्या परिस्थीतीवर चर्चा केली. यानंतर त्यांनी माध्यमांशी सवांध साधला. यावेळी गुवाहाटी येथील आमदारांना इंजेक्शन देऊन मारहाण होत असल्याचा आरोप पटोले यांनी केला.

ट्रेंडिंग न्यूज

Panvel Rape: पॉर्न पाहून अल्पवयीन भावाचा मोठ्या बहिणीवर बलात्कार; गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उजेडात!

Mumbai Weather Update: मुंबई, ठाण्यात आज उष्णतेची लाट! मतदारांनो सकाळच्या सत्रात उरकून घ्या मतदान

Maharashtra Weather Update : कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी पावसाचा तर मुंबई, ठाण्यात उष्णतेचा यलो अलर्ट!

रिक्षाचालकाने भाडे नाकारले, जादा भाडे घेतल्यास करा व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार, तातडीने होणार कारवाई

 

एकनाथ शिंदे हे त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार संकटात आले आहे. सरकार अल्पमतात येण्याची शक्यताही तयार झाली आहे. दरम्यान, गुवाहाटीत असलेले अनेक आमदारांना जबरदस्तीने थांबविल्याचा आरोप केला जात आहे. अशातच, नाना पटोले यांनीही हाच आरोप केला आहे. नानापटाले यांनी आमदारांना इंजेक्शन देऊन मारहाण केली जात असल्याचा उल्लेख केला. पटोले म्हणाले, ज्याप्रकारे आमदारांना इंजेक्शन देऊन बेशुद्ध केलं जात आहे, मारहाण केली जात आहे ही गोष्ट लपलेली नाही. एका आमदाराला ५० कोटी देण्याचा प्रयत्न झाला. घोडेबाजार सुरु आहे. यावर आमचे लक्ष आहे. या विरोधात आमची कोर्टात जाण्याची तयारी आहे. आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे, असेही पटोले म्हणाले.

पटोले यांच्या पूर्वी आदित्य ठाकरे यांनीही अशाच प्रकारचा आरोप केला होता. या मागे भाजपचे षडयंत्र असल्याचेही बोलले जात आहे. माष, भाजपने या सर्व प्रकाराशी त्यांचा काही संबंध नसल्याचे सांगत हात वर केले आहे. दरम्यान, आदित्य ठाकरे म्हणाले, सूरतमधून विमानाने गुवाहीटाला नेतानाचे दोन तीन व्हिडीओ समोर आले आहेत. व्हिडीओत काही जण डुलत होते, ते कशामुळे मला माहिती नाही. पण दुसरा व्हिडीओ फार भयानक होता. जे आमदार गेले आहेत किंवा अपहरण करुन नेलं आहे त्यांना कैद्यासारखं हाताला, मानेला पकडून नेलं आहे याचं मला दु:ख वाटते असेही आदित्य ठाकरे म्हणाले होते.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या