मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  पेरूच्या नौदल जहाजाची मुंबईला सदिच्छा भेट; प्रशिक्षणार्थी कॅडेट्सनी गिरवले धडे

पेरूच्या नौदल जहाजाची मुंबईला सदिच्छा भेट; प्रशिक्षणार्थी कॅडेट्सनी गिरवले धडे

Nov 04, 2023, 08:53 PM IST

    • पेरूच्या नौदलाचे ‘बीएपी युनियन’ नावाचे जहाज ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी मुंबईच्या सदिच्छा भेटीवर दाखल झाले आहे. भारत आणि पेरू हे देश यंदा आपल्या राजनैतिक संबंधांचे साठावे वर्ष साजरे करत आहेत. 
Peruvian Sail Training Ship B.A.P. Union in Mumbai on goodwill visit

पेरूच्या नौदलाचे ‘बीएपी युनियन’ नावाचे जहाज ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी मुंबईच्या सदिच्छा भेटीवर दाखल झाले आहे. भारत आणि पेरू हे देश यंदा आपल्या राजनैतिक संबंधांचे साठावे वर्ष साजरे करत आहेत.

    • पेरूच्या नौदलाचे ‘बीएपी युनियन’ नावाचे जहाज ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी मुंबईच्या सदिच्छा भेटीवर दाखल झाले आहे. भारत आणि पेरू हे देश यंदा आपल्या राजनैतिक संबंधांचे साठावे वर्ष साजरे करत आहेत. 

पेरूच्या नौदलाचे ‘बीएपी युनियन’ नावाचे जहाज ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी मुंबईच्या सदिच्छा भेटीवर दाखल झाले आहे. हे जहाज ५ नोव्हेंबरपर्यंत मुंबई बंदरात थांबणार आहे. मुंबई बंदरात आगमन होताच जहाजाकडून भारतीय नौदलाच्या पश्चिम कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ यांच्या ध्वजाला १५ बंदुकींची औपचारिक सलामी देण्यात आली. मुंबई बंदरात प्रथमच येणार्‍या युद्धनौकेद्वारे बंदरातील वरिष्ठ नौदल अधिकार्‍यांना आदराचे प्रतीक म्हणून तोफांची सलामी देण्याची पारंपरिक प्रथा आहे. भारतीय नौदलाच्या बँडकडून पेरूच्या जहाजाचे पारंपारिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. पेरूचे भारतातील राजदूत जेवियर मॅन्युएल पॉलिनीच वेलार्डे हे सध्या मुंबई भेटीवर आहेत. राजदुतांनी 'बीएपी युनियन' या जहाजावर भारतीय नौदलाच्या पश्चिम कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ व्हाइस अॅडमिरलदिनेश के त्रिपाठी यांची भेट घेऊन चर्चा केली.

ट्रेंडिंग न्यूज

रिक्षाचालकाने भाडे नाकारले, जादा भाडे घेतल्यास करा व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार, तातडीने होणार कारवाई

Chiplun Cloudburst Rains: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी! अर्ध्या तासात धडकी भरवणारा पाऊस, मे महिन्यातच नद्यांना पूर

Mumbai Lok sabha : मतदानाच्या पूर्वसंध्येलाच मुंबईत प्रिसायडिंग ऑफिसरचा मृत्यू, होमगार्डला हृदयविकाराचा धक्का

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

‘बीएपी युनियन’ जहाजाचे कमांडिंग ऑफिसर यांनी १ नोव्हेंबर रोजी मुंबईत ‘गौरव स्तंभा’वर जाऊन पुष्पहार अर्पण केले. नौदलाच्या पश्चिम विभागाच्या मुख्यालयाला त्यांनी भेट दिली. पश्चिम नौदल कमांडचे चीफ स्टाफ ऑफिसर (ऑपरेशन्स) रिअर एडमिरल कुणाल सिंग राजकुमार यांचीही भेट घेतली. यावेळी उभयंतांमध्ये परस्पर हितसंबंध, नौदल प्रशिक्षण आणि दोन्ही नौदलांमधील सागरी सहकार्य वाढविण्याच्या मुद्दांवर चर्चा झाली.

On arrival at Mumbai, the ship saluted the flag of Flag Officer Commanding-in-Chief, Western Naval Command by firing of 15 ceremonial gun salvos.

‘बीएपी युनियन’ जहाजाच्या मुंबईतील बंदरातील मुक्कामादरम्यान दोन्ही नौदलाचे अधिकारी एकमेकांशी संवाद साधून नौदल प्रशिक्षणासंदर्भात माहितीची देवाणघेवाण करणार आहे. दोन्ही नौदलांच्या अधिकाऱ्यांनी मुंबईतील गिरगाव चौपाटी येथे समुद्रकिनारा स्वच्छता मोहिमेतही सहभाग घेतला.

भारत आणि पेरू हे देश यंदा आपल्या राजनैतिक संबंधांचे साठावे वर्ष साजरे करत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये उभय देशांमधील हे संबंध अधिक दृढ झाले आहे.

भारत आणि पेरू हे दोन्ही देश जरी एकमेकांपासून लांब, वेगवेगळ्या खंडात वसलेले असले तरी त्यांचे सागरी हितसंबंध एकसमान आहेत. द्विपक्षीय सहकार्य आणखी वृद्धिंगत करण्याचे दोन्ही देशांचे उद्दिष्ट राहिलेले आहे.

 

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या