मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Parbhani Accident: शाळेत जाताना काळाचा घाला, भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; दोन शिक्षकांचा जागीच मृत्यू

Parbhani Accident: शाळेत जाताना काळाचा घाला, भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; दोन शिक्षकांचा जागीच मृत्यू

Mar 14, 2023, 02:28 PM IST

  • Road Accident: निर्मल राष्ट्रीय महामार्गावर भरधाव ट्रकच्या धडकेत दोन शिक्षकांचा जागीच मृत्यू झाला आहे.

Two Wheeler Accident (HT)

Road Accident: निर्मल राष्ट्रीय महामार्गावर भरधाव ट्रकच्या धडकेत दोन शिक्षकांचा जागीच मृत्यू झाला आहे.

  • Road Accident: निर्मल राष्ट्रीय महामार्गावर भरधाव ट्रकच्या धडकेत दोन शिक्षकांचा जागीच मृत्यू झाला आहे.

Parbhani Road Accident: निर्मल राष्ट्रीय महामार्गावर भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरुन शाळेकडे निघालेल्या दोन शिक्षकांचा जागीच मृत्यू झाला आहे. परभणीच्या मानवत शहरामध्ये ही घटना घडली आहे. या घटनेबाबत स्थानिक नागरिकांकडून माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी. या घटनेतील ट्रक चालक पळून गेला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Crime : नाश्ता बनवला नाही म्हणून पत्नीच्या डोक्यात मारला हातोडा; कुर्ला येथील धक्कादायक घटना

Maharashtra Weather Update : राज्याला अवकाळी पावसाने झोडपले! पुणे, साताऱ्यात ऑरेंज तर उर्वरित जिल्ह्यांना यलो अलर्ट

Mumbai Local Mega Block : रविवारी प्रवासाचे नियोजन करताय? लोकलच्या तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक

Pradeep Sharma : एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना आधी जन्मठेप अन् आता ‘सुप्रीम’ दिलासा

रामेश्वर कदम आणि गंगाधर राऊळ अशी या अपघातात मृत्यू झालेल्या शिक्षकांची नावे आहेत. रामेश्वर आणि गंगाधर हे मानवत शहरातील शकुंतला विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत होते. मात्र, नेहमीप्रमाणे आज शाळेकडे जात असताना एका भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. हा इतका भीषण होता की, दोघांचाही जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांना ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. अपघातामध्ये दोन शिक्षकांचा मृत्यू झाला असल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निर्मल राष्ट्रीय महामार्गावर भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. यात दोन शिक्षकांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. दोन्ही शिक्षकांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी मानवत येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

परभणी जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून अपघाताचे प्रमाण वाढले आहे.वाहनचालक आपल्या ताब्यातील गाड्या निष्काळजीपणाने चालवत असल्याने अनेक निष्पापांना आपला जीव गमवावा लागत आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या